तृष्णा भयकथा - भाग २
आधीचा भाग: http://misalpav.com/node/50502
संदिप चित्रा चे घर ज्या भागांत होते त्याला जॅकसन कॉलोनी म्हणायचे. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तलावाच्या बाजूला राहण्यासाठी बांधलेली हि घरे. प्रशस्त रुंद रस्ते, त्याला भले मोठे फुटपाथ, त्याच्या दोन्ही बाजूनं झाडे. जॅक्सन कॉलोनी मध्ये कदाचित २५-३० घरे असतील. फारतर दुमजली. कॉलोनी रोड संपतो तिथून कंपनी कॉलोनी सुरु होत असे, ३-४ ते ७ माजली पर्यंत बिल्डींग्स. इथे बहुतेक खाण कंपनीचे अधिकारी, सरकारी नोकर इत्यादी लोक राहत.
पानात लपलेल्या फुलाला पाहून...
मला झाडावरची फुले तोडावयास आवडत नाही. मी दुसर्यान्या पण तोडू देत नाही.
काव्यरस
थॅलसिमिया : विवाहपूर्व समुपदेशन आणि नैतिकता
नुकताच घडलेला एक किस्सा.
माझ्या मित्राने त्याच्या मुलाच्या लग्नाच्या संदर्भात मला फोन केला. तो म्हणाला," माझ्या मुलासाठी मुलीचे एक स्थळ आलेले आहे. त्या मुलीला नुकताच कोविड होऊन गेला होता आणि त्यादरम्यान तिला रक्तगुठळी होण्याची तक्रारही उद्भवली होती. त्या अनुषंगाने त्या मुलीच्या अन्य काही रक्तचाचण्या केल्या गेल्या. त्यात तिला हिमोग्लोबिनच्या संदर्भात बीटा-थॅलसिमिया ट्रेट हा दोष असल्याचे आढळले होते".
संबंधित मुलीच्या वडिलांनी माझ्या मित्राला ते सर्व रिपोर्ट्स दाखवले. आता त्या मुलीतील तो रक्तदोष पाहता काय करावे असा पेच त्याला पडला.
रॉकेट्री-नंबी इफेक्ट
आर.माधवन दिग्दर्शित,लिखित,निर्मित ‘रॉकेट्री’ सिनेमा पाहण्याचा अमाझोन योग प्राईममुळे मिळाला.
नंबी नारायण हे मूळ केरळातील इस्त्रोतील शास्त्रज्ञ होते. नंबीनी मदुराई येथे बी.टेक.
हाजीर हो !
हाजीर हो ! ...
पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या ,तरूण आणि रुबाबदार पस्तीशीतील राजन काळे नी आपली गाडी आपल्या पार्किंग मध्ये लावली. आपला टाय जरासा सैल केला . समोरच्या आरशात बघून आपले काळेभोर केस जरा सारखे केले. गाडीतून बाहेर पडून ,मागच्या सीट वरून आपली लॅपटॉप ची बॅग घेतली . आपल्या खिशातील मोबाईल काढून तो चालू केला. आजच्या दुपारच्या मीटिंग मध्ये त्याने तो बंद केला होता. मेघनाचे एक दोन मिस काल्स होते. एक दोन मेसेज सुद्धा होते. आता घरी जातोच आहे तेव्हा बोलू असा विचार करून तो पुढे निघाला. सहज घड्याळात बघितले तर रात्रीचे नऊ वाजून गेले होते. आज जरा जास्तच उशीर झाला होता.
सध्या मी काय पाहतोय ? भाग १०
खरं तर गेला आठवडाभर मी डोळ्याच्या इन्फेक्शन ने त्रस्त आहे आणि त्यामुळेच रजेवर देखील आहे. डोळा उघडा ठेवणे कठीण जात होते म्हणुन काही पाहणे देखील नकोसे वाटतं होते.पण वेळ घालवायचा कसा ? कारण कामात व्यस्त राहण्याची नशा मला इतके वर्षात लागलेली आहे !
पुस्तक परिचय: मनात -- भाग १
----
अभियांत्रिकीमधे करियर असूनही पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात रुची जपणारे, किंवा इतर विषयात नाक खुपसणारे, खोऱ्याने सापडतील. अभियंत्यांचा तो अवगुण म्हणावा लागेल, किंवा तार्किक आणि तांत्रिक निश्चिततेचा कंटाळा.
ध्यान- लाखमोलाचं लक्ष!
IMA- परभणीद्वारे ध्यान सत्र
सर्वांना नमस्कार. परभणीमध्ये इंडियन मेडीकल असोशिएशन अर्थात् 'आयएमएच्या' वतीने ध्यान सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. ते सत्र घेतानाचा अनुभव आपल्या सर्वांसोबत शेअर करत आहे. मला हे सत्र घेण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम आयएमए परभणी व डॉ. अनील दिवाण सर, डॉ. जी. एम. चांडक सर, आयएमए परभणीचे अध्यक्ष डॉ. अनील कान्हे सर, श्री. कारेगांवकर सर व सर्वांना धन्यवाद. त्याबरोबर ह्या आयोजनामध्ये अनेक प्रकारे सोबत असलेल्या निरामय परिवाराचेही धन्यवाद.
ब्रह्मानंदी
इ. स. १८५९-६० सालची चिपळूण मधली सकाळ,कदाचीत पावसाळी असावी.
रंगो भट नुकतेच पुजा अर्चना करून पडवितल्या लाकडी झोपाळ्यावर सुपारी कातरत बसले होते. आडकित्याच्या आवाजात झोपाळ्याचा 'कर्र ~, ~कर्र' आसा लयबद्ध आवाज मीसळून नादब्रह्म निर्माण होत होते. रंगो भटाच्या संजाबा वरची शेंडी प्रशिक्षीत नर्तकी प्रमाणे नर्तन करत होती. रंगो भटाची सुद्धा ब्रह्मानंदी टाळी लागली असावी.
तेवढ्यात रूबाबदार लष्करी गणवेशातला एक हरकारा त्यांच्या चौसोपी वाड्याकडे येताना पाहून आजूबाजूच्या वाड्यात खळबळ माजली. सगळे अंदाज घेत होते कुणाकडे हा राक्षस आला आसावा.
मिसळपाव