Skip to main content

वार्तालाप : जीभ आणि सर्वनाश

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 25/01/2023 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
जीभ आपल्या शरीराचा महत्वपूर्ण अवयव आहे. जीभ नसेल तर जेवणाचा स्वाद घेता येणार नाही. जीभ नसेल तर आपण बोलू ही शकत नाही. पण काय बोलावे आणि कसे बोलावे हेच जर आपल्याला कळत नसेल तर मौन राहणे उत्तम. कधी-कधी जीभेतून सुटलेले कटुवचन सर्वनाशाला ही कारणीभूत ठरतात. श्री सार्थ दासबोधात समर्थ अश्याच लोकांसाठी म्हणतात: जनासीं मीत्री करीना। कठिण शब्द बोले नाना। मूर्खपणें आवरेना। कोणीयेकासी॥ 1९/३/१३॥ याचेच एक उदाहरण: महाभारतात राजसूय यज्ञाचा एक प्रसंग आहे. महाराज युधिष्ठिराने राजसूय यज्ञात येण्यासाठी कौरवांना ही निमंत्रण दिले होते.

कथा अधिकच्या गुणसूत्राची

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 25/01/2023 09:17 या दिवशी प्रकाशित केले.

डाउन सिंड्रोम

ok जन्मजात शारीरिक दोषांच्या विविध कारणांमध्ये गुणसूत्रांमधील बिघाड हे एक महत्त्वाचे कारण आहे. अशा प्रकारच्या आजारांमध्ये डाऊन सिंड्रोम(DS) हा सर्वाधिक आढळणारा आजार आहे. मुलांमधील आकलनदुर्बलतेचे ते सर्वाधिक महत्त्वाचे कारण आहे. जॉन डाऊन या ब्रिटिश डॉक्टरवरून नाव दिलेल्या या आजाराचा आधुनिक वैदयकात सुमारे 175 वर्षे अभ्यास झालेला आहे. सुमारे 800 नवजातांपैकी एकाला हा आजार असतो. अशा या बहुपरिचित आजाराचा सविस्तर आढावा या लेखात घेतो.

पैशाचे झाड भाग :-३

लेखक अतरंगी यांनी बुधवार, 25/01/2023 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १. https://www.misalpav.com/node/51032 भाग २ https://www.misalpav.com/node/51038 " अभ्या कुठे आहेस?" " गावातच आहे, का रे?" "विनितला पॅरेलेसिसचा अ‍ॅटॅक आलाय, रुबीला नेलंय. " " निघतो लगेच. पंधरा मिनिटात पोचतो.' एकेचाळीसाव्या वर्षी अ‍ॅटॅक यायला विनितची अनुवंशिक जाडी, त्याचे कामाचे स्वरुप, खाण्या पिण्याच्या सवयी, सगळेच कारणीभुत होते. कमी हालचाल, त्यात त्याला व्यायमाची फार आवड नव्हती. सगळेच जमेल तसे धावत पळत रुबीला पोचले. सगळ्यांनाच हा मोठा धक्का होता.

टेलिस्कोपने धुमकेतू बघण्याचा रोमांचक अनुभव!

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 24/01/2023 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
✪ दुर्बिणीतून धुमकेतू C/2022 E3 (ZTF) शोधण्याचा व बघण्याचा अनुभव ✪ हा धुमकेतू बायनॅक्युलरद्वारे सध्या दिसू शकतो ✪ शहरापासून लांबचं आकाश आणि धुमकेतूची अचूक स्थिती माहित असणे आवश्यक ✪ त्याची स्थिती वेगाने बदलते आहे ✪ १ फेब्रुवारीच्या सुमारास सर्वाधिक तेजस्वी असेल सर्वांना नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की, सध्या एक धुमकेतू- C/2022 E3 (ZTF) बायनॅक्युलरने दिसण्यासारखा आहे. २४ जानेवारीपर्यंत तो नुसत्या डोळ्याने दिसू शकेल, इतका तेजस्वी झालेला नाही आहे. परंतु तो बायनॅक्युलरने किंवा छोट्या टेलिस्कोपने बघता येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला स्वच्छ आणि काळोख असलेलं आकाश लागेल.

लिही रे कधीतरी...

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 24/01/2023 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
लिही रे कधीतरी. काहीही, अगदी काहीssही चालेल. पत्र, कविता, दोनोळीची चिठ्ठी पण पळेल. पण कागदावरच्या शाईला हुंगता आलं पाहिजे. शब्दांवर बोट अस्संss फिरवता आलं पाहिजे. मग कान्याच्या मागे खांब खांब खेळेन, वेलांटीच्या तळ्यात डुबकी मारेन. अनुस्वाराच्या डोक्यावर हलकी थाप.. मात्रेवर चढताना लागेल धाप.. खोडलेलं अक्षर पाहून विचारात पडेन, काय बरं लिहाताना अडखळलं पेन? पण "माझ्यासाठी" लिहिलंस! हे खासंखास जणू प्रत्यक्ष भेटीचाच होईल भास. ....म्हणूनच म्हटलं, लिही की रे कधीतरी....

पैशाचे झाड भाग :-२

लेखक अतरंगी यांनी मंगळवार, 24/01/2023 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
पैशाचे झाड भाग : १. https://www.misalpav.com/node/51032 हो नाही करत शेवटी ऐन वेळी कोणाचेही कॅन्सल न होता, कोणतेही विघ्न न येता, ठरल्याप्रमाणे सगळा गृप कोकण ट्रिपला निघाला. बर्‍याच दिवसांनी सगळे जण एकत्र ट्रिपला निघाल्यामुळे थट्टा मस्करीला पार ऊत आला होता. क्षणाक्षणाला हसण्याचे फवारे फुटत होते. नवे- जुने संदर्भ घेऊन एकेकावर धपाधप जोक्स पडत होते. प्रत्येक वेळेस मुले गाडीतच पेग भरायला लागली की आनंदच्या मनात धाकधूक होत होती. अजून नव्या गाडीची नवलाई संपली नव्हती. पाच जणात दोन खंबे कधी संपले पत्ता पण नाही लागला.

आम्ही जातो आमुच्या गावा (भाग १- व्याप आवरते घेणे)

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 23/01/2023 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, आयुष्याची सांजवेळ सामोरी आलेली आहे. दूरदेशीच्या ‘आपुल्या गावा’ कायमचे जाण्यासाठी वळकटी बांधून आता तयार राहिले पाहिजे आणि तिकडे नेणारा दूत आला की हसतमुखाने त्याला सामोरे गेले पाहिजे. समवयस्क मित्र एकेक करून आपापल्या दूताबरोबर रवाना होत आहेत आणि त्यांच्या तशा जाण्यातून आपलीही वेळ आता फारशी दूर नाही, ही जाणीव प्रबळ होत चालली आहे. तर आपले एकंदरीत व्याप वगैरे आता तरी आवरते घेतलेच पाहिजेत … आता व्याप म्हटले तर ते कोणकोणते ?

मिपा 'अचानक' कट्टा - भाजे लेणी - २२ जानेवारी २०२३

लेखक तुषार काळभोर यांनी सोमवार, 23/01/2023 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
p {text-align:justify;}

संदीप उवाचः

तर सुजाण मिपाकरहो, धाग्याचं नाव वाचून एका अचानक घडलेल्या मिपाकट्ट्याचा वृत्तांत वाचायला मिळणार हे तुम्ही ओळखलच असेल. पण हा अचानक ठरलेला कट्टा सुमारे दोन दिवाळी अंक पाहिलेला आहे. म्हणजे सर्वांची तारीख आणि ठिकाण हे काही केल्या ठरत नव्हते. ते एकदाचे ठरले आणि कट्टा यशस्वीरित्या अगदी मजेत पार पडला. कट्ट्याला प्रचेतस (पूर्वाश्रमीचे वल्ली), प्रशांत (सरपंच), टर्मिनेटर, ज्ञानोबाचे पैजार (पैजारबुवा), तुषार काळभोर (पूर्वाश्रमीचे पैलवान) आणि मी व माझी कन्या मानसी इत्यादी हजर होतो.

शशक- अशीही एक धुंद, गुलाबी सकाळ

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 23/01/2023 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
मी- झालं का ग तुझं? ती - उम्म, अजून नाही रे, तुमचं पुरुषांचं बरं असत. झट की पट काम. लगेच कपडे घालून तयार.बायकांचं तसं नसत ना? आम्हाला वेळ लागतो. मी-ते काय मला माहित नाही? झाली की आता लग्नाला १५ वर्ष. ती - पण उपयोग काय? अजूनही सांगायला लागत सगळं तुला. मी- बायकांना ना असं वाटतं की नवऱ्याने न बोलताच आपल्या मनातलं ओळखावं. ती - जाऊदे तो विषय. सांगून सांगून थकले मी. मी- डॉक्टरांनी काय सांगितलंय लक्षात आहे ना? चिकाटीने प्रयत्न करत राहा. जमेल. ती- त्यांना काय जातंय सांगायला? एकतर मरणाची थंडी. मी- जाऊदे. येणारेस का तू मॉर्निंग वॉकला?नाहीतर मी चाललो.

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ६: कोल्हार- विजयपूरा- सिंदगी (१०१ किमी)

लेखक मार्गी यांनी सोमवार, 23/01/2023 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
✪ “कौसल्या सुप्रजा...” च्या वातावरणात राईडची सुरुवात! ✪ पवनचक्क्या व डोंगराळ प्रदेशातील राईड ✪ ऐतिहासिक विजयपूरा अर्थात् विजापूर! ✪ एरोबिक राईड (फक्त नाकाद्वारे श्वास घेऊन) ✪ सायकलिंगचे मानसिक पैलू ✪ भाषेचा अडथळा?