Skip to main content

वास्तुशांती ते मनःशांती

लेखक देवू यांनी बुधवार, 08/02/2023 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
मित्राने त्याच्या गावी बऱ्याचदा येण्याचा आग्रह केला होता. एकतर त्याचे गाव बरेच दूर होते आणि हातात असलेल्या कामामुळे दोन ते तीन दिवस सुट्टी काढून जाण्याचा योग येत नव्हता. यावेळेस त्याच्या घराची वास्तुशांती असल्याने त्याचे आमंत्रण स्वीकारले. त्यानिमित्ताने ग्रामीण जीवन प्रत्यक्ष जवळून बघण्याचा अनुभव घ्यायला मिळणार होता. हातातील कामे थोडे जास्त वेळ काम करून पूर्ण केली. सकाळची सहाची बस पकडली आणि दुपारी दोन वाजता मित्राच्या गावी पोहोचलो. बस स्टॅन्ड पासून त्याचे घर चालत फार तर दहा मिनिटाच्या अंतरावर होते, तरीही मित्राने मला घ्यायला गाडी पाठवली होती.

ती व तो 2023

लेखक भागो यांनी मंगळवार, 07/02/2023 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
तो बहुराष्ट्रीय कंपनीत मनेजर होता तर ती एका राष्ट्रीय कंपनीत संगणकाशी छेडछाड करणारी होती. त्याचे लठ्ठ पॅकेज होते. फ्लॅट होता. लांबलचक गाडी होती. हुशार शोफर होता. अजून काय पाहिजे? तर सांगायचा मुद्दा असा की उणीव होती फक्त एक श्रीमती की कलावती की सेवा करे जो पति की ज़रुरत है ज़रुरत है ज़रुरत है. सेवा करे जो पति की? म्हणजे तिला काय तुम्ही नोकरांनी समजता? काय हे प्रतिगामी विचार! पण एकूण पॅकेज भारदस्त असल्यामुळे प्रतिगामी विचार चालवून घ्यायचे. ती!! तिचे “पॅकेज” “उंच, स्लिम आणि सौंदर्यपूर्ण” होते. त्या दोघांची भेट अश्याच कुठल्यातरी सेमिनार प्रसंगी झाली. कुठला सेमिनार? ते महत्वाचे नाही.

हिमाचल प्रदेश :कांगडा व चंबा सहल : भाग ७: डलहौसी परिसर

लेखक गोरगावलेकर यांनी मंगळवार, 07/02/2023 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ६ येथे वाचा काल अंधार पडल्यावर आम्ही डलहौसीला येऊन पोहचलो होतो. समुद्रसपाटीपासून साधारण ६५०० फूट उंचीवरील हे ठिकाण. सध्या अतिशय थंड तरीही खूपच आल्हाददायक वातावरण. ब्रिटिश वास्तुकला, सुंदर चर्च, पाइन्स ,देवदार, ओक, रोडोडेंड्रॉन. अशा अनेक वेगवेगळ्या वनस्पती असलेली दाट झाडी तसेच धौलाधर पर्वतरांगेतील उत्तुंग शिखरे हे येथील प्रमुख आकर्षण. १८४५ च्या अँग्लो-शीख युद्धानंतर पंजाबचे राज्यकर्ते युध्दाच्या खर्चाची नुकसानभरपाई ब्रिटिशांना देण्याबद्दल बांधील होते.

कळतं रे पण..

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 07/02/2023 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
कळतं मला पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, पहिलं पाऊल टाकायचं, दोघांकडून राहून गेलंय. कळतं आता तुझंमाझं उरलं नाही वेडं वय. येताजाता उचकी लागेल अशी आता कुठली सय? कळतं की भरतीनंतर ओहोटी ही येणारच, किती कुणी जवळ येवो दूर तर जाणारच.. तरीही, उठता उठताच आधी पहिला फोनकडे जातो हात, तुझ्या मेसेजशिवाय होते दिवसाची सुरुवात. स्टेटस, डीपी, पोस्ट, फोटो कुठंतरी तर भेटशील खरं? पण डिलिटलेल्या नंबरवर कसं कुणी दिसणार बरं? कधीतरी तर वाजेल रिंग समजावतं एक मन चोवीस तास उगाचंच हाताजवळ असतो फोन! ... सोडायचं म्हटलं तरी सवयी सुटता सुटत नाहीत; जीर्ण शीर्ण झाल्या तरी काही गाठी तुटत नाहीत..

शंभर अदाणी हवे आहेत…

लेखक सुधीर मुतालीक यांनी सोमवार, 06/02/2023 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
...आमच्या शेतकऱ्यांना सरकारचा इथला एखादा निर्णय अमान्य असेल तर आमचे शेतकरी आणि आमचे सरकार काय करायचे ते बघून घेतील. शेतकऱ्यांना अगदी एखादे सरकार पसंत नसेल तर त्यांना ते सरकार खाली खेचायचा देखील नैतिक अधिकार आहे. पण इथल्या शेतकरी आंदोलनामध्ये काड्या घालणारे, ते भडकाविणारे आपल्या देशा बाहेरचे खलनायक होते हे अलीकडे लक्षात आले :टुल किट गॅंग ! महामारी नंतर तर आर्थिक दृष्ट्या सावरलेला भारत हा जगाच्या पाठीवरचा एकमेव बडा देश आहे. केवळ सावरलेलाच नाही तर आर्थिकदृष्ट्या उत्तम स्थिती असणारा आणि प्रगती करत असणारा.

सावज-शशक(शत शब्द पेक्षा थोडेच जास्त)

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 06/02/2023 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
ती- तू माझे व्हाट्सअप संदेश बघितले आणी तेंव्हापासून डोके फिरल्या सारखे वागतोयस. दररोज कटकट,भांडणे, वैताग आलाय.... ती- मी कितीवेळा सांगीतले तू समजतोस तसे काहीच नाही. तो-त्याला बागेत बोलव,प्रथम लांबून बघेन आणी मग काय करायचे ते ठरवेन ...... तो दुर कोपर्‍यात आडोशाला बसून सावजाची वाट बघत बसला होता. अचानक,पंजाबी पोशाख,चंदेरी केसांची फॅशनेबल बाॅयकट,ओठावर हल्की गुलाबी लिपस्टिक,रंग पोतलेला चेहरा अशी एक सौंदर्यवती त्याच्याच दिशेने येत होती. अचानक तिने त्याला आवाज दिला, "ए तू पेठेतला रोहनच ना! ऐकोणसत्तर बॅच...नुमवी.... मी "भवानी", तुझ्याच वर्गातली..." अय्या..!!!!

वेताळ टेकडी-ए आर ए आय टेकडीचा सत्यानाश

लेखक अनंतफंदी यांनी सोमवार, 06/02/2023 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी पाय मोकळे करावे म्हणुन म्हटले जरा लांबवर फिरायला जावे. कौतुकाने कोथरुडच्या वेताळ टेकडी/परमहंस्/ए आर ए आय टेकडीवर फिरायला गेलो. बरीच मंडळी वरच्या दिशेने चढत होती. चढावर तुरळक झाडी होती. पण म्हटले सध्या हिवाळा आहे, पावसाळ्यात पुन्हा हिरवेगार होईलच की. वर जाऊन भिंतीपलीकडे गेलो मात्र सगळी कडे धूर पसरलेला दिसत होता. कोथरुड कचरा डेपो एका बाजुला असल्याने पहीले वाटले त्याचा- धूर असावा. पण नाही, पुढे गेल्यावर लक्षात आले की काही हौशी थेरडे मुद्दाम थिकठिकाणी गवत एकत्र करुन जाळत होते. विचारले का? तर म्हणे आम्ही ईथे खूप झाडे लावली आहेत, ती जागा मोकळी व्हावी म्हणुन.

विहीर

लेखक आजी यांनी सोमवार, 06/02/2023 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
"विश्वास ठेवा अगर ठेवू नका,पण हे सत्य आहे." मी आता जी हकीकत सांगणार आहे,तिची सुरुवात वर दिलेल्या टिपिकल वाक्याने करावी असा मोह मला होतोय. पण तशी मी करत नाहीये. मी तर म्हणेन "विश्वास ठेवाच. कारण ही सत्य आहे. कारण मी हे डोळ्यांनी पाहिले आहे. खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. पुण्यासारख्या शहरांचाही त्यावेळी आजच्याइतका विस्तार झाला नव्हता. त्याच पुण्याजवळचं एक खेडं. ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणारं. लहानशी वस्ती. त्या एरियात जमीन स्वस्त मिळायची. आता ती जागा अगदी मध्यवर्ती समजली जात असेल. माझ्या ओळखीचं एक जोडपं. दिलीप आणि प्रतिमा. प्रतिमा माझी मैत्रीण.

(मराठी भाषा गौरव दिन २०२३ - विडंबन विशेष!)

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 04/02/2023 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी बेहत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही ! - चालचलाऊ गीता, जयकृष्ण केशव उपाध्ये
विडंबन.. मराठी वाङमयामधील एक विशेष प्रकार. एखाद्या लोकप्रिय रचनेचे (बहुतेकदा विनोदी अथवा उपहासात्मक) अनुकरण, अशी विडंबनाची साधारण व्याख्या करता येईल. मराठी लेखनात दर्जेदार विडंबनाची दीर्घ परंपरा आहे.

अव्यक्त

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 03/02/2023 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
मोकलाया मन बोझील माझे, विश्वास शोधत राहीलो मी अनाकलनीय,अविश्वसनीय सारे चूपचाप बघत राहीलो मी अष्टावधानी होतो तरिही,अनभिज्ञ राहीलो मी ती(संधी) समोर होती,तरिही निशब्द राहीलो मी अविरत,उद्रेक भावनांचा,सावरत राहीलो मी बांध व्यर्थ आत्मविश्वासाचा, बांधत राहीलो मी बाळगून उगा तमा जगाची,निरंतर अव्यक्तच राहीलो मी भेटेल कुणी मनकवडा,निरंतर वाट पहात राहीलो मी भ्रमनिरास झालो अंती,मग माझाच न राहीलो मी दिव्यांग नव्हतो तरीही अव्यक्तच राहीलो मी २७-१-२०२३
काव्यरस