जेव्हा तुझ्या बटांना (कथा)
केतनने नेहमीप्रमाणे हाय टाकलं. जाईने उत्तर दिलं. तीही ऑनलाईन होती. बरेच दिवस ते ऑनलाईन बोलत होते. जाईची ब-यापैकी माहिती त्याला कळली होती. तिच्या आवडीनिवडी कळल्या होत्या. तिला एकदा पाहायचं होतं. मनात तुंबलेला प्रश्न विचारायचा होता. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर केतनने विचारलं.
"कधी भेटायचं ?"
"भेटू रे."
हे जाईने तिस-यांदा तरी ऐकवलं होतं. आता मात्र केतन वैतागला.
"भेटू रे, भेटू रे खूप दिवस चाललंय तुझं. नक्की सांग. आपण असं किती दिवस चॅटिंग करणार ? गेले दोन आठवडे तू टाळत आहेस.एकदा भेटूच ना.
मिसळपाव
राष्ट्रपतीचे अंगरक्षक रेजिमेंट ही भारतीय भूदलातील एक ऐतिहासिक रेजिमेंट आहे. या रेजिमेंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला, तो नवी दिल्लीतील विजय चौकात बीटिंग रीट्रिट पाहायला बसलेलो असताना.