Skip to main content

एक मधाळ अनुभव

लेखक रम्या यांनी शनिवार, 07/10/2023 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
आज कधी नव्हे तो सोसायटीचा हणमंत वॉचमन ड्युटीवर असताना उभा होता. डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताच्या अंगठ्याने तंबाखू चोळत कंपाउंड जवळच्या एका झाडाच्या शेंड्यावर एकटक नजर लावून होता. बाजूला दोन्ही हातानी एक दांडकं उभं पकडून दोन पायांवर परसाला बसल्या सारखा विष्णू शिपाई निवांत बसला होता. सोसायटीच्या पदाधिकाऱ्याला साजेशा तुसडेपणाने मी डाफरलो, "सुट्टीवर आहात का चेअरमन साहेब?" सोसायटीच्या वाँचमनला साजेशा बेफिकीरपणे तो उत्तरला, "डिवटीवरच हाये साहेब. ते बघितलं का मधल्या फांदीवर?

संगीत प्र(या)वास

लेखक कुमार जावडेकर यांनी बुधवार, 04/10/2023 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडेच एका मित्रासोबत कुठल्या तरी बुवांच्या गायनाला गेलो होतो. त्यांनी 'केदार'चा एक स्वनिर्मित प्रकार गायला. गायकाचं नाव 'खार'कर असल्यानं बहुधा त्याच्या रागाचं नाव 'झुब-केदार' असं असावं असं माझ्या उगाच मनात येऊन गेलं. पण अर्थात, मला ते मित्राला सांगायचं धारिष्ट्य झालं नाही. उगाच (त्याचं ते आडनाव नसलं तरी) तो माझ्यावर खार खायचा. माझी सांगितिक वाटचाल कशी झाली असं जर कुणी विचारलं तर त्यावर 'अगतिक' हेच उत्तर मला पटकन सुचतं. त्या प्रयासाचं 'प्रागतिक'शी (मात्रा जुळत नसल्या तरी) यमक जुळवायचा त्रास मात्र मला टाळावासा वाटतो. प्रथम, संगीत म्हटलं की सूर आले.

‘निपा’ विषाणूचा अतिघातक आजार

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 04/10/2023 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
संसर्गजन्य आजारांमध्ये विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचा वाटा मोठा आहे. यापैकी काही आजार विविध प्राण्यांकडून माणसात संक्रमित होतात. अशा आजारांपैकी एक प्राणघातक आजार म्हणजे ‘निपा’(Nipah) विषाणूचा आजार. विसावे शतक संपण्याच्या सुमारास हा आजार मलेशियातील Sungai Nipah या खेड्यात प्रथम आढळल्याने त्या गावाचे नाव त्याला देण्यात आले आहे. रोगाचा जागतिक इतिहास या आजाराचा पहिला रुग्ण १९९८ मध्ये मलेशियात आढळला. तेव्हा तो तिथे डुकरांची संबंधित असलेल्या लोकांमध्ये सापडला होता. भारतातील पहिला रुग्ण 2001 मध्ये पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे सापडला होता.

कॅपिटल आय आणि स्माॅल आय.

लेखक आजी यांनी बुधवार, 04/10/2023 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
आता मी वानप्रस्थाश्रमात प्रवेश केलाय. सत्तरी ओलांडली. माझ्यासारखे अनेकजण आहेत ज्यांनी साठी, सत्तरी ओलांडली आहे. साठीनंतरच खरं तर वानप्रस्थाश्रम सुरु होतो. कसं वागायचं वानप्रस्थाश्रमात? प्रश्न पडतो ना? त्याची उत्तरे अनेक आहेत. पहिलं म्हणजे आपण मुलाबाळांच्या संसारात "कॅपिटल आय" न होता "स्माॅल आय" व्हायचं. अहंकार, मीपणा झटकून टाकायचा. कॅपिटल आय तरुणपणी असतो. अंगात मस्ती मुसमुसत असते. माज असतो. जोश असतो. मनगटात ताकद असते. मनात ऊर्मी , उत्साह संचारलेला असतो. मी काहीही करेन असा अहंकार असतो. "कर्तुं,अकर्तुं, अन्यथा कर्तुम्"अशी ताकद असते. जिद्द असते . क्षमता असते. कर्तबगारी असते.

कायरोप्रॅक्टिस chiropractic method therapy

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 02/10/2023 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच यु ट्युबवर कायरोप्रॅक्टिस chiropractic method therapy या physiotherapy शी संलग्न असलेल्या थेरपीचे video बघितले . बहुतेक करुन orthopedic problems ( सांधे दुखी , स्नायु आखडणे , bones lock होणे ) , व मायग्रेन ( neuro therapy ) अशा ठिकाणी chiropractic therapy वापरली जाते असे दिसले . या chiropractic therapy क्षेत्रातील तज्ञांना chiropractor कायरोप्रॅक्टर असे ओळखले जाते . हे video बघुन कुतुहल तसेच काही प्रश्न डोक्यात आले . भारतामध्ये कायरोप्रॅक्टिस चा वापर हा परदेशाच्या तुलनेत कमी व अनोळखी आहे का ?

डॉ.एम.एस.स्वामिनाथन (१)

लेखक Bhakti यांनी शनिवार, 30/09/2023 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
A भारतीय हरितक्रांतीचे जनक आणि जगाला 'झिरो हंगर' या परिस्थितीत आणणारे डॉ.

गो केकू गो! -२

लेखक भागो यांनी शुक्रवार, 29/09/2023 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
“मुरुगन, यू देअर? ऐक तुझ्यासाठी काम आहे. प्लान असा आहे, मुंबई वरून अमेरिका, अमेरिकेतून दुबई, दुबईतून इराक, इराक मधून उझबेकिस्तान. तिकडून अफगाणिस्तान नंतर आउटर मंगोलिया, मधेच एक वेळ ऑस्ट्रेलिया, पुन्हा अफगाणिस्तान...” एव्हढे आढेवेढे, एव्हढा द्राविडी प्राणायाम. ग्रेमॅनचे प्लानिंग हे असं असतं. केकूही आता शिकलाय. किराणा भुसार दुकानात तो हेच डावपेच वापरतो. आधी हवा पाण्याच्या गप्पा. नंतर लक्स, पार्ले-जी, शाम्पूचे सशे अशी सटर फटर स्टेशन घेत गाडी एकदम बासमती तांदुळावर, “बासमती काय भाव?” दुकानदार चमकून खरा भाव बोलून जातो. असो. “ते समजलं. शेवटी कुठे जायचं ते बोला.” “ओके, शेवटी पाकिस्तान.

कथेला नाव सुचवा

लेखक म्हया बिलंदर यांनी शुक्रवार, 29/09/2023 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसांनी टेकडीवर मॉर्निंग वॉक ला आलो होतो. थोडी चढण मग थोडीफार सपाटी, पुन्हा चढण आणि वर पठार. पठारावर तास भर चाललं कि घरच्या वाटेला लागणं हा कोव्हीड आधीचा नित्यक्रम होता. कोव्हीड मध्ये व्हेंटिलेटर वरून सुखरूप आलोय. अजूनही काही त्रास आहेत असे वाटते. आधीचा तोच स्टॅमिना परत कमावण्यासाठी टेकडीवरचा मॉर्निंग वॉक पुन्हा सुरु केला. लोकसहभागातून आधीची माळरान टेकडी भरपूर झाडे लावून फुलवलेली दिसली. लौकर उगवणारी, मोठी होणारी बरीच झाडं नजरेस पडली. निरनिराळे पक्षी त्यांचे मनमोहक आवाज सारं काही सुखावणारं होतं. टेकडीवर, टप्या टप्यावर ५ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बसवलेल्या दिसल्या.

ललितबंध -लेखक रा.चि.ढेरे (ऐसी अक्षरे... मेळवीन -१२)

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 29/09/2023 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वत्र धर्म, संस्कृती याविषयी उथळ चर्चांना उधाण आलेले असताना.रा.चि.ढेरे यांचे ललितबंध (प्रकाशित २०१७)हे पुस्तक वाचणे म्हणजे केवळ सुखद अनुभव होता.ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ विचारू नये अशी म्हण विनाकारण आहे ,हे पुस्तक वाचतांना पटते.कारण एकंदरीत मज सारख्या मुळातून मुळाच्या शोधाची आवड असणाऱ्या वाचकाला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात.

गो केकू गो! -१

लेखक भागो यांनी गुरुवार, 28/09/2023 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
गो केकू गो! “रावडी केशव कुलकर्णी(केकू)” Fully Configured. Level 3 entered. Scene 1. ready to go. Start New Session. ID No. ID zx 120 2792023 T=00 “Go Keku. Go.” बत्तीसगडचा राजवाडा. राजकुंवर केशव कोचावर पहुडले आहेत. पायाशी एक क्लास वन दासी केशवच्या पायाच्या नखांना पॉलिश करून “सर” आणत आहे. केशव विचार करतोय. काल रात्री तर हीच होती ना. हीचं नाव काय बरं असावं? काही का असेना. दिसायला काही वाईट नव्हती. गोरा पान रंग. चाफेकळी अपरं नाक. कुरळे कुरळे काळे भोर लांबसडक केस. पण केशव अफाट बोअर्ड. सुंदर सुंदर ललना ही नेहमीची गोष्ट झाली होती.