सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर आणि हरिश्चंद्रगड : भाग २
भाग १ येथे वाचा
सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर आणि हरिश्चंद्रगड : भाग 1
आज थोडी उशिराच जाग आली. सूर्य उगवला नसला तरी चांगलाच उजेड झाला होता. ब्रश केला, तोंड वगैरे धुतले. बाकी प्रातःर्विधीसाठी शौचालय वगैरे काही नाही. पाण्याची बाटली भरून माळरानावरच झुडुपांच्या जाळीत जायचे.
सर्व आटोपून चहा घेतला आणि कोकण कडा पाहण्यासाठी निघालो. कडा अगदी बाजूलाच आहे.
मिसळपाव