अपहरण - भाग ३
भाग २ - https://misalpav.com/node/51954
या घटनेला बरोबर एक आठवडा झाल्यादिवशी न्यू यॉर्क हेराल्ड वृत्तपत्रात एक जाहीरनामा छापण्यात आला. हा मसुदा कोणीतरी जाहिरात म्हणून पाच डॉलर्सच्या मोबदल्याबरोबर त्या वृत्तपत्राकडे पाठवला होता. त्यावर शिक्का होता, न्यू यॉर्क टपाल खाते, विभाग २. त्यावर पाठवणाऱ्याचा नावपत्ता नव्हता.
"अमेरिकन नागरिकांसाठी जाहीरनामा.
आम्ही तुमच्या राष्ट्राध्यक्षांचं त्यांच्या पत्नीसहित अपहरण केलं आहे. खंडणी मिळेपर्यंत ते आमच्या ताब्यात राहतील.
मिसळपाव
पाकिस्तानला एकत्र करत होता ईस्लाम आणि त्याला तोडत होती विविधता. प्रत्येक प्रांताची संस्कृती वेगळी होती. बरं, भौगोलिक अंतरही पूर्व पाकिस्तान नी पश्चीम पाकिस्तानात बरंच होतं आणी मध्यभागी होता भारत. आता दिल्लीहून ट्रेन पकडून पाकिस्तानी मुत्सद्दी किंवा सैनिक कलकत्ता आणि ढाक्याला कसे जाऊ शकनार होते? मात्र, सामान्य नागरिक भारतीय रेल्वेनेच सीमा ओलांडून पूर्व पाकिस्तानात जात असत. एका पाकिस्तानी माणसाच्या म्हणण्यानुसार, हे खूप महाग पडायचे, नी गरजही नव्हती.व्यापारी ट्रक भारतामार्गेच पाकिस्तानात जात असत.
कुठंतरी छोटी ट्रीप करून येऊ असं ठरवत असताना अलिबागला जाण्याचं निश्चित झालं. मी अलिबागला पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळं वेगळं ठिकाण-परिसर पाहता येणार असल्यामुळं उत्साहित वाटत होतं. त्यातच बऱ्याच वर्षांनी मुंबईशिवाय अन्य ठिकाणचा समुद्र पाहायला मिळणार होता.