श्री गणेश लेखमाला २०२४ - आली गौराई अंगणी
आली गौराई अंगणी..
“गऊ, त्या झाडाच्या जवळ नको गं जाऊ सारखी. सोड एकटं त्याला थोडा वेळ.” आई खिडकीतून बघत ओरडली.
“झाडांशीही बोलावं. कळतं त्यांना सगळं. पुस्तकात आहे आमच्या. आईला काही कळत नाही, हो नं?” नवीनच लावलेल्या प्राजक्ताच्या रोपट्यापाशी गऊचं हितगुज चालूच होतं. तोवर आई तिथे पोहोचलीच. तिला लेकीची झाडांवरची माया आणि हट्टी स्वभाव दोन्ही चांगलंच माहीत होतं.
“अगं हो, पण तुझ्या बोलण्याकडे लक्ष देण्यासाठी त्याला थोडं स्थिर तर होऊ दे इथे. आपली माती सोडून आलंय ते इकडे. भांबावलं असेल.. आणि असंही.. एकदा झाड लावलं की थोडा वेळ काळजी घ्यावी.
मिसळपाव