पावसाळी भटकंती: आंबे-हातविज, दुर्ग देवराई
ह्यावेळी पावसाळ्यात खूप फिरणं झालं, धुव्वाधार पावसात भंडारदरा, महाबळेश्वर, श्रावणातल्या जलधारांत नाणेघाट, आहुपे, भीमाशंकर आणि आत्ता सरत्या पावसात आंबे-हातविज.
अगदी १० दिवसांपूर्वीच ऐन गणेशोत्सवात आंबे- हातविजला जाणं झालं. खरं तर मूळ प्लॅन होता तो आहुपे घाटात जायचा, पण काही कारणास्तव मंचर ऐवजी पुढे नारायणगावनजीक मित्राच्या गावाला पिंपळवंडीला जावे लागले, तिकडून परत मंचरला जाण्याऐवजी जुन्नर जवळ, आणि जुन्नरवरुन आंबे - हातविज जवळ त्यामुळे तिथे आधी जाऊन मग तिथूनच आहुपेला जाण्याचे ठरवले. हा भाग अति परिचयाचा, नाणेघाटात इकडून अनेकदा गेल्यामुळे संपूर्ण रस्ता माहितीचा.
दिवा
चंद्राची धग क्षीण होत सरता
घेरून ये गारवा
रात्रीचा तम प्राशुनी घुमतसे
वृक्षातळी पारवा
तेजाचे ऋण फेडण्यास भटके
तार्यांसवे काजवा
जीर्णाचे अवशेष येथ कुठले
उन्मेष जेथे नवा
प्रज्ञेचे स्थल-काल अक्ष हटता
भोवंडल्या नेणिवा
अस्ताचे भय भास्करास कुठले
जो चेतनांचा दिवा
अवयव दान
गेले दोन आठवडे वडिलांच्या आजारपणामुळे ICU बाहेर वेळ काढणे चालू आहे. इथे माझ्यासारखे अनेक नातेवाईक बाहेर बसलेले आहेत. इथे अनेक जण आपल्या आप्तांसाठी कोणी अवयव दाता मिळेल का याची वाट बघत, आशेवर बसलेले आहेत. या वेळात काहींचे आप्त दाता भेटल्याने बरे होउन घरी जाताना, तर काहींचा दात्यची वाट बघता बघता मृत्यू होताना, तर काहींसाठी वाट बघताना जे उपचार द्यावे लागतात त्या मधे पैशांचा प्रचंड चुराडा होताना बघतो आहे. काही लोकं पर राज्यतून येउन महिनोंमहीने दात्याची वाट बघत आहेत.
माणूस जिवंतपणी सुद्धा आणि मेल्यावर पण अवयव दान करू शकतो.
साक्षरता, बेरोजगारी आणि आरक्षण
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण साक्षरतेचा बेरोजगारी आणि आरक्षणाची सरळ संबंध आहे. मेकॉले पूर्वीच्या शिक्षण व्यवस्थेत बेरोजगारी नावाचा प्रकार नव्हता. "द ब्युटीफुल ट्री" या पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीने १८३० ते १८५० मध्ये भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत केलेले सर्व्हे उपलब्ध आहे. त्याकाळी देशात सहा लाखांच्या वर गुरुकुल होते. प्रत्येक गावात एक गुरुकुल निश्चित होते. वयाच्या 13 वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना स्थानिक भाषा गणित इत्यादीचे ज्ञान दिले जात होते. सामान्य व्यक्तीसाठी एवढे ज्ञान पुरेसे आहे. त्यानंतर अधिकांश विद्यार्थी त्यांच्या परंपरागत व्यवसायांचे ज्ञान गुरुं कडून प्राप्त करायचे.
सरडा चेला तर नेता गुरू
एकदा जंगलात राहाणाऱ्या सरड्याने शहरात जाऊन लोकांना आपले रंग बदलण्याचे कौशल्य दाखवून वाहवा मिळविण्याच्या विचार केला. सरडा जवळच्या शहरात गेला. तिथे त्याला एका सरकारी बंगल्यात डोक्यावर काळी टोपी घातलेला एक माणूस खुर्चीवर बसलेला दिसला. सरडा त्या माणसं जवळ गेला आणि म्हणाला मी जंगलात राहणारा सरडा आहे. मला रंग बदलण्याची कला अवगत आहे. मी ज्या झाडा फुलावर बसतो त्याच रंगात मिसळून जातो.
सरडा म्हणाला मी तुम्हाला आपली कला दाखवतो. सरडा हिरव्या पानांवर बसला तो हिरवा झाला. सरडा लाल फुलावर बसला तो लाल झाला. अश्या रीतीने सरड्याने वेगवेगळे रंग बदलून त्या माणसाला दाखविले.
ढोल ताशा पथके की वेठबिगारी ?
नमस्कार मंडळी
सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!!
कालच अनंतचतुर्दशी झाली आणि गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशी अवस्था झाली. आधी महिनाभर तयारी आणि मग दहा दिवस जागून कामे करून थकलेले कार्यकर्ते मंडपातच आडवे झाले किंवा श्रमपरिहाराला गेले. पण दिवस भर आणि मग रात्रभर रस्त्यावर वादन करणारी आणि वेगवेगळ्या मानाच्या/ बिनमानाच्या गणपतींसमोर वादन करून सलामी देणारी ढोलपथके कुठे गेली?त्यांचे ते एकसारखे दिसणारे सुंदर झब्बे लेंगे, टोप्या, मुलींच्या नथी, साड्या आणि मुख्य म्हणजे ते अजस्त्र ढोल , कडकडते ताशे ,ते वाजवताना बेधुंद होऊन नाचणारे वादक , नाचणारे झेंडे ते सर्व कुठे गेले?
मिसळपाव