Skip to main content

दवणीय अंडी - अंडे २रे - नात्यांची श्रीमंती

लेखक आदिजोशी यांनी शुक्रवार, 03/11/2017 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
एसीने थंडगार झालेल्या आपल्या रूममधल्या गुबगुबीत गादीवर ब्लँकेट ओढून झोपलेल्या बंड्याने अजून एकदा कूस बदलली. त्याला काही तरी टोचल्याची भावना झाली. अर्धवट झोपेत असल्याने 'सुख टोचत असेल' असा विचार मनात येऊन त्याने ब्लँकेटखाली हात घातल्यावर टोचणारी वस्तू सुख नसून चार्जरची पीन आहे हे त्याच्या लक्षात आले. आजकाल बंड्या जरा अस्वस्थच असे. ह्याच्याशी त्याला पडलेल्या केट्यांचा काही संबंध नव्हता. इन जनरच आयुष्य वैराण आहे अशी भावना त्याच्या मनात दाटून येत असेल. सद्ध्या फेबु आणि वॉअॅ वर वाजवीपेक्षा जास्तच पडीक असल्याने ही भावना वरचेवर त्याला छळत असे.

दिवाळी अंक 2017

लेखक बोबो यांनी शुक्रवार, 03/11/2017 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी !! कळविण्यास आनंद होतो की, यावर्षी खालील आठ दिवाळी अंकांमध्ये माझ्या कथा प्रकाशित झाल्या आहेत. १. आवाज - 'सनी दिवानी, आबा बंगाली आणि सदा' ही हलकीफुलकी कथा २. जत्रा - 'मिसळ खाणारी मुलगी' ही खुसखुशीत प्रेमकथा ३. धनंजय - 'पॉईंग' ही मनोरंजक विज्ञान कथा ४. मेहता मराठी ग्रंथजगत - 'सूड नावाची डिश' ही रहस्यकथा ५. सा. वार्तासूत्र (मराठी साहित्य परिषदेच्या कथास्पर्धेतील पारितोषिक विजेती कथा) - 'देखी जमाने की यारी' ही प्रेमकथा ६. वर्ल्ड सामना - 'नियतीचा संकेत' ही हलकीफुलकी प्रेमकथा ७.

#मिपाफिटनेस - मी आज केलेला व्यायाम - समाप्त

लेखक मोदक यांनी शुक्रवार, 03/11/2017 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
. नमस्कार मंडळी.. बरोबर एक वर्षांपूर्वी मी आज केलेला व्यायाम...!! या उपक्रमाची सुरूवात झाली. धागा टाकण्यापूर्वी हा उपक्रम कितपत यशस्वी होईल ही शंका होतीच. पण सर्वांनी उत्साहाने प्रतिसाद दिला आणि रोजचा व्यायाम नोंदवायला सुरूवात केली. नियमीत व्यायामपटूंचे धाग्यावर येणारे प्रतिसाद पाहून अनेकांनी व्यायाम सुरू केल्याचे, फार कांही नांही तर चालणे सुरू केले आणि धाग्याचा फायदा होत आहे हे आवर्जून कळवले.

हिवाळी भटकंती: ट्रिक्स आणि टिप्स !

लेखक दुर्गविहारी यांनी गुरुवार, 02/11/2017 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच पावसाळा संपलेला असतो, सर्वांनाच उत्साहाचे टॉनिक पाजणारा दिवाळीचा मोठा सण ही झालेला असतो आणि अशातच एका प्रसन्न सकाळी अचानक गारवा जाणवु लागतो. ईतक्या दिवस न एकु येणारी कुठल्यातरी दुरवरच्या मंदिरातील काकड आरती आणि लांबवर धावणार्‍या रेल्वेची शिट्टी एकु येउ लागते. हळुवार थंडीची चाहुल लागते आणि जाणीव होते, आली एकदाची थंडी. मन प्रसन्न करणारा हा काळ. पावसाच्या रिपरिपीमुळे कंटाळलेले मन सुखावते. अगदी घरकोंबड्या मंडळींनाही उत्साहात मॉर्निंगवॉकसाठी घराबाहेर बाहेर काढणारा हा काळ. भरपुर सुकामेवा खाउन शरीराच्या बलाची वर्षभरासाठी बेगमी करायला लावणारा हा काळ. वर्षातले हे चार महिने मोठे प्रसन्न असतात.

विकासाच्या गोष्टी. .

लेखक vcdatrange यांनी गुरुवार, 02/11/2017 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
मोखाड्यातलं एकदम दरीतला पाडा ' आमले ' गाव. जंगलात वसलेलं. वाड्याहुन खोडाळ्याकडे जाणार्‍या बाजुला हमरस्ता सोडुन दरीत उतरायचं. इनमिन ६५ कुटुंब. गावाशेजारुन वाहणार्‍या नदीमुळे पावसाळ्यातला चार महिने बाहेरच्या जगाशी संपर्क नाही अशी अवस्था होती, अगदी मागच्या वर्षापर्यंत. आता नदीवर लोखंडी पुल टाकलाय चालत जाण्यासाठी.

विडंबीत अंडे - भाग 1

लेखक आनन्दा यांनी गुरुवार, 02/11/2017 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
'विडंबीत अंडे' हा वाक्प्रचार मराठी भाषेला अर्पण करणार्‍या समस्त गुरुजनांना म्हणजे मला स्वतःलाच कोपरापासून नमस्कार करून ह्या लेखमालेतील पहिले ख्याल आपल्यासमोर घालताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. अंडे १ले - एक कॉल कट करा फार दिवसांनी परवा अड्ड्यावर जायचा योग आला. सगळे उटाणटवळे भेटले. पण मध्यंतरीच्या काळात आमचे लग्न झाल्यामुळे आमच्यात आणि त्यांच्यात एक अदॄष्य अशी कम्युनिकेशन गॅप तयार झाली होती. नक्की काय बिनसलंय हे कळत नव्हतं. कालौघात काही गोष्टी बदलल्या होत्या...

काल: क्रीडति (भाग १) - आठवड्याचे सात दिवस.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी गुरुवार, 02/11/2017 04:23 या दिवशी प्रकाशित केले.
काल: क्रीडति (भाग १) - आठवड्याचे सात दिवस. आठवड्याच्या सात दिवसांची व्यवस्था आहे तशी का आहे ह्याचा विचार करायला कोणी कधी थांबतो काय? रविवारनंतर सोमवार, त्यानंतर मंगळवार इत्यादि सात दिवसांच्या परंपरेचे रहाटगाडगे आपल्या विचारांचा इतका अविभाज्य भाग झाले आहे की आहे ते तसे का आहे हा विचारण्यायोग्य प्रश्न आहे हेहि आपणास सुचत नाही. आठवड्यात दिवस सात का, रविवारनंतर सोमवार यावा, सोमवारनंतर मंगळवार यावा ही व्यवस्था कोणी, कधी आणि कोठे निर्माण केली असे प्रश्न विचार केल्यास निर्माण होतात. ह्या प्रश्नांची उत्तरे, मला माहीत आहेत तशी, देण्याचा प्रयत्न ह्या लेखामध्ये केला आहे.

दवणीय अंडी - अंडे १ले - एक कॉल स्वतःला

लेखक आदिजोशी यांनी बुधवार, 01/11/2017 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
'दवणीय अंडे' हा वाक्प्रचार मराठी भाषेला अर्पण करणार्‍या समस्त गुरुजनांच्या उलट्या पायांना कोपरापासून नमस्कार करून ह्या लेखमालेतील पहिले अंडे आपल्यासमोर घालताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

अंडे १ले - एक कॉल स्वतःला

फार दिवसांनी परवा कट्ट्यावर जायचा योग आला. सगळे उटाणटवळे भेटले. पण मध्यंतरीच्या काळात आम्ही कार्यमग्न असल्यामुळे आमच्यात आणि त्यांच्यात एक अदॄष्य अशी कम्युनिकेशन गॅप तयार झाली होती. नक्की काय बिनसलंय हे कळत नव्हतं. कालौघात काही गोष्टी बदलल्या होत्या...

भाषांची स्थिती आणि परिस्थिती

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 01/11/2017 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे (साडेपाच वर्षातून पहिल्यांदा एक ब्लॉग वेळेवर ठरलेल्या दिवशी देता आला नाही. 15-10-2017 पासूनचा पंधरवाडा खाडा गेला.) जगात़ील सर्व भाषांची संख्या अमूक इतक़ी आहे असे काटेकोर सांगता येणार नसले तरी ती सुमारे 7000 इतकी आहे असा अंदाज वर्तवता येतो. जगातील भाषांपैकी अर्ध्याअधिक भाषा जेमतेम 2500 लोकांपेक्षा कमी लोक बोलतात. अंदमान- निकोबार बेटांवरील ओंगे आणि जारवा जमातीतील लोक तर शंभरांपेक्षाही कमी आहेत. 2050 पर्यंत जगातील निम्म्यापेक्षा अधिक भाषा समूळ मृतप्राय होतील.

...मी दोन काटं खाल्ल्यात कळकीच

लेखक हेमंत ववले यांनी बुधवार, 01/11/2017 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
“काही तरीच बरका ! तुमच वय ९० वर्षे असणे शक्यच नाही”, रामा धनगराला मध्येच थांबवत मी जरा मिश्किलपणे म्हंटले. त्यावर रामा धनगर थोडा थबकला. आता त्याच्या पुढे प्रश्न होता की कस काय पटवुन द्यायचे की त्याचे वय ९० ची आसपासच आहे असे. पश्चिमघाटाच्या घाटमाथ्यावर भोर्डी गावात आम्ही दोन वर्षापुर्वी बांबु(मेस जातीचा) ची लागवड केली. रविवारी पर्यटकांची पुण्यात रवानगी केल्यावर मी आणि सुनिल सिंगापुर रोड कडे फेरफटका मारुन, बांबुंची वाढ कशी आहे ते पाहण्यासाठी आमच्या जागेत गेलो. सगळ्या शिवारात फेरफटका मारुन झाला. वाटेने पुन्हा चढ चढुन सिंगापुर रोड ला येण्यासाठी थोडी चढण होती. त्यामुळे आमचा वेग कमी थोडा मंदावला.