Skip to main content

भटकन्ती -१०

लेखक इन्ना यांनी रविवार, 25/03/2018 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
भटकन्ती १० भटकेपणा बर्‍याच प्रकाराचा असतो. प्रत्यक्ष पायपीट हा मनापासून आवडणारा प्रकार असला तरी मनातल्या आठवणींबरोबर केलेली भटकंती त्याहून मनाजवळची अन हृद्य! अश्या बर्‍याच जागा आहेत जिथे फक्त मनातच जाता येतं. माझं लहानपणीचं घर. वर्तमानात जिथे आता एक अपार्ट्मेंट उभं आहे. तोक्यामधलं एक सुंदर तळं, त्यात पानगळीच्या सुंदर रंगांचं प्रतिबिंब पाहता पाहता मला मनाचा तळ दिसला होता. लहानपणीचे आजोळचे घर, लहानपणीचीच पर्वती! आठवणीतली सफर. smile हे भटकणं म्हणजे फक्त ती निव्वळ जागा नसून, जागा, माणसं, आवाज, खादाडी, गंध ह्या सगळ्यांच्या आठवणींचं मस्त मिश्रण असतं!

टिपू आणि अकबर

लेखक माहितगार यांनी शनिवार, 24/03/2018 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
स्विकार्यता, आणि स्विकार्यतेसाठी लेजिटीमसी/योग्यतेचे चित्र उभे करणे ही सर्वकालीन राज्यकर्त्यांची गरज असते म्ग काळ कोणताही असो, अकबराचा , टिपूचा , ब्रिटीशांचा ,महात्मा गांधीचा , की आता मोदी आणि राहुल गांधीचा . जयंती कुणाचीही साजरी करता येते. - आपली संस्कृती उदार आहे, विघ्नकर्त्यांच्या पुजेसही मान्यता देते - आपण कुणाच्या जयंत्या साजर्‍या करत आहोत त्या बद्दल इतरांना काही प्रश्नचिन्हे आहेत का या बद्दल सोईस्कर दुर्लक्ष करता येते (किंवा संशयही निर्माण करता येतात) किंवा झाकपाक करता येते पण झाकलेली प्रश्नचिन्हे परत फिरुन येणारच नाहीत असे ही नसावे.

भाग १ : शेतकर्यांच्या हितासाठी काय गरजेचे आहे - पायाभूत सुविधा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 24/03/2018 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
(शेती व्यतिरिक्त अनेक कारक आहे, ज्याच्या परिणाम शेती व शेतकर्यांंवर होतो. यावर प्रकाश टाकण्यासाठी हा उपद्व्याप). आज दिनांक २५.३.२०१८. दिल्लीत रामलीला मैदानात तथाकथित शेतकर्यांचा हितेशी अण्णा हजारे उपोषणावर बसले आहेत. त्यांची एक हास्यास्पद मागणी ६० वरील शेतकर्याला ५००० रुपये महिना पेन्शन मिळाली पाहिजे. आपल्या देशात अधिकांश शेतकरी अल्पभूधारक आणि पार्ट टाईम शेतकरी आहेत. किमान १० कोटी शेतकरी पेन्शन मागतील. वर्षाचे ६ लाख कोटी कुठून येतील कदाचित अण्णांना हि याचे उत्तर माहित नसेल. दुसरी मांग उत्पादन लागत वर ५० टक्के नफा. कोण ठरविणार आणि कोण विकत घेणार. अण्णा सांगू शकत नाही.

आठवणी

लेखक शाली यांनी शुक्रवार, 23/03/2018 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
हे एक साधे व्यक्तीचित्र आहे. जरा मोठे होईल म्हणून दोन भागात टाकायचा विचार होता पण एकाच भागात टाकत आहे. या अगोदर माबो वर टाकले होते. त्या नंतर अजून काही भाग लिहिले पण ते कुठेच टाकले नाही. पहिला हा देतोय. आवडला तर बाकीचेही टाकेन. परवा सहज मंगलकार्यालाया जवळून जाताना कानावर ‘सनईचे’ स्वर पडले आणि नाकाभोवती अनेक वासांचा दरवळ आला. एकदम कळ दाबावी तशा खुप जुन्या आठवणी अचानक मनाभोवती पिंगा घालून गेल्या. काही काही वास माणसाच्या मनात कायमच्या ‘वास’ करून राहतात हे खरय. आणि ते एकटे कधी राहत नाहीत. आलेच तर सोबतीला अनेक आठवणी घेऊन येतात.

ताज्या घडामोडी - भाग २८

लेखक कपिलमुनी यांनी शुक्रवार, 23/03/2018 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
राजकीय पक्षांना 1976 नंतर मिळालेल्या परदेशी देणग्यांची आता चौकशी होणार नाही. या संदर्भातल्या दुरुस्तीचे विधेयक लोकसभेत कोणत्याही चर्चेविना बुधवारी मंजूर करण्यात आले. भाजप सरकारने यापूर्वी वित्त विधेयक 2016 च्या माध्यमातून परदेशी देणगी नियमन कायदा (FCRA) मध्ये दुरुस्त्या केल्या होत्या. ज्यामुळे राजकीय पक्षांना परदेशी कंपन्यांकडून देणग्या मिळवणं सोपं झालं होतं. पण 1976 पासून राजकीय पक्षांना मिळालेल्या परदेशी देणग्यांच्या चौकशीची शक्यता कायम होती. पण ती शक्यताही बुधवारी मंजूर झालेल्या दुरुस्ती विधेयकाने संपवली आहे.

सोया चंक्स आणि खजुराचे पौष्टीक लाडू

लेखक श्वेता२४ यांनी शुक्रवार, 23/03/2018 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
सोया चंक्स आणि खजुराचे लाडू मुलाला डब्यात देण्यासाठी एखैदा पौष्टीक पाककृती शोधत होते. घरात सोयाबीन चंक्सचे पीठ व खजूर शिल्लक होते. त्याचा वापर करायचे ठरविले .

आधुनिक दृष्टिकोनातून रामायण

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी शुक्रवार, 23/03/2018 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
'खरे सुपरमॅन - आमचे आप्पा' या लेखात ज्या आप्पांचा (माझ्या सासर्यांचा) उल्लेख आहे त्यांनी गेल्या महिन्यात ASCOP साठी एक लेख लिहिला होता. 'आधुनिक दृष्टिकोनातून रामायण'. तो मी इथे पोस्ट करीत आहे. पण त्या आधी थोडी प्रस्तावना. आप्पा आता सत्त्याण्णव वर्षांचे झाले आहेत पण तोच उत्साह आणि स्पष्ट विचारशक्ती तशीच कायम आहे. माझ्यासारख्या साधारण वाचकांनी वाचलेल्या व ऐकलेल्या रामायणात बर्याच उपकथा आहेत. मात्र मूळ संस्कृत रामायणात काय लिहिलेलं आहे हे आपल्या पैकी फारच थोड्या जणांना माहीत असेल. माझ्या सासूबाई (आई) संस्कृत पंडिता. सासरे (आप्पा) यांचं संस्कृत अतिशय उत्तम.

उन्हाळी भटकंती: जंगली जयगड ( Jangli Jaigad )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 23/03/2018 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
महाबळेश्वर येथे उगम पावलेली कोयना नदी सुरवातीला पश्चिमवाहीनी होते, मात्र सह्याद्रीच्या रांगेमुळे ती सुरवातीला दक्षिणवाहिनी आणि नंतर पुर्वेकडे वळते. प्रतापगड, मधुमकरंदगड यांना सामावणारी सह्याद्रीची मुख्य रांग आणि वनकुसवडे पठार यांच्या मधल्या अनुकुल भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेउन १९६२ मधे कोयना धरणाची उभारणी झाली. कठीण बेसाल्टच दगडापासून बनलेल्या सह्याद्रीला आतून पोखरून वीजनिर्मितीसाठी टप्पा १ व २ उभारले गेले.