Skip to main content

अभी ना जाओ छोडकर...

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 04/04/2018 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच बाहेर रात्र धो धो कोसळत होती. त्यातून पावसालाही मुहूर्त मिळाला होता. त्याचं तर आज डोकंच सटकलं होतं. अख्ख्या महिन्याचा बॅकलॉग भरून काढायचा निर्धारच केल्यासारखा तो ओतत होता. दार उघडलं जात नव्हतं. बहुधा पावसामुळेच फुगलं असावं. थोडी खटपट करून त्यानं लॅच उघडलं आणि दोघं आत आले. चिंब भिजले होते. तो जरा जास्तच. तिनं पटकन आत जाऊन त्याच्यासाठी टॉवेल आणला. ``डोकं पुसून देऊ का मी?`` तिनं आस्थेनं विचारलं. उत्तरादाखल त्यानं फक्त तिच्या हातातून टॉवेल घेतला आणि तो डोकं पुसू लागला. ``कॉफी घेणारेस? की....`` तिनं टेबलावरच्या बाटलीकडे इशारा करत विचारलं. ``नको. कॉफीच कर.

पुस्तक परिचय : इस्रायलची मोसाद

लेखक सटकाजी यांनी बुधवार, 04/04/2018 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
नाव : इस्रायलची मोसाद लेखक : पंकज कालुवाला प्रकाशक : परम मित्र पब्लिकेशन 'गुप्तचर यंत्रणा' , एखाद्या साम्राज्याचा किंवा देशाचा अविभाज्य घटक. या विषयाबाबत जनमानसांत प्रचंड कुतूहल असले तरी नावाप्रमाणे गुप्तपणे कार्यरत असलेल्या 'गुप्तचर विभागावर' तुलनेने लिखाण कमी झाले आहे. बऱ्याच काळापासून 'ज्यू' समाज कायम चर्चेत राहत आला आहे.

फापटमुक्त तर्कसुसंगत रामायण , चर्चा भाग -१

लेखक माहितगार यांनी बुधवार, 04/04/2018 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
* लेखात मांडलेले काही विचार तर्कसुसंगत असले, आणि लेखनाचा उद्धेश चांगला असला तरीही गैरसमज करून घेण्यास वेळा लागत नाही, त्यामुळे दोन्ही टोकांच्या व्यक्तींना काही मांडणी अवघड जाऊ शकतात. ज्यांच्या भावना वगैरे दुखावणारा नाहीत, आणि विचाराला विचाराने प्रतिवादावर विश्वास असेल अशांनीच पुढे वाचण्याचा विचार करावा इतरांनी टळावे हि नम्र विनंती . . * ज्यांना लेखाची लांबी खुपते त्यांच्यासाठी माझा लेखनाचा उद्देश संक्षेपाने शेवटच्या परिचछेदात दिला आहेच .

गुंतवणूक

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी बुधवार, 04/04/2018 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
हातसन डेअरीची बॅलन्सशिट चाळता चाळता मनाला हिसका बसला आणि एकदम आठवलं- कार्तिकातल्या पहाटे गाय व्यालेली, इनकॅन्डेसन्ट पिवळ्या उजेडात कडब्यावर पडलेलं ओलसर वासरू चाटत असलेली, सैरभैर तिच्या उष्ण उछ्वासानं, तुझी छाती भरून गेलेली. तेव्हा तुझ्या पाठीवर थंडीच्या चांदण्या शिरशिरल्या. --- जोखमीचे हिशोब मांडता मांडता जिवंत ठेवायला तुला, त्या क्षणांची हमी कधीच पुरणार नाही हे पक्कं ठाऊक होतं तुला, आणि तशाच शुभ्र आठवणींमुळे सरत्या पावसाळ्यातली एखादी सेपिया संध्याकाळ तुझ्या डोळ्यांना जाणवते आणि तुला वठू देत नाही. --- कॅबच्या दारातनं उतरताना तुझ्या शहरातही, सातवीणीचा आवाहक गंध आला तुला, मॅकार्थीच्या पिच

Dead Man's Hand - ३

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 03/04/2018 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
रोहित आपल्या समोर असलेल्या फाईलमधलं प्रियाच्या मोबाईलचं रेकॉर्ड पाहत होता. २२ डिसेंबरला प्रिया घरातून निघाल्यापासून ते २४ तारखेच्या सकाळी तिचा मृतदेह आढळून येईपर्यंत तिला आलेला प्रत्येक फोन, मेसेज आणि त्यावेळी तिच्या फोनचं नेमकं लोकेशन त्याने काळजीपूर्वक तपासलं होतं. प्रियाचे कुटुंबिय, तिच्या मैत्रिणी, ऑफीसमधले सहकारी, धीरज आणि त्याचे मित्रं यांचे नंबर त्याच्यापाशी होते. त्यापैकी तिच्या कॉल आणि मेसेज रेकॉर्डमध्ये सापडलेल्या नंबर्स वरुन आणि मोबाईलच्या लोकेशनवरुन या दोन दिवसांतल्या तिच्या हालचालींचा अंदाज बांधण्याचा तो प्रयत्नं करत होता.

II तिने पेन मागितलं, मी हात दिला II

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 03/04/2018 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
तिने पेन मागितलं मी हात दिला तिने शिवी घातली मी स्माईल दिली ती धावून आली मी मिठीत घेतली ती शांत झाली हळूच प्रेमात पडली आधी मी वेडा होतो आता ती पण झाली माझी गांधीगिरी प्रेमात कामी आली आता ती हात मागते मी पेन देतो मी शिवी घालतो ती स्माईल देते मी धावून जातो ती मिठीत घेते प्रेम हे असं गड्या हळूहळू होते सिद्धेश्वर विलास पाटणकर

रानवारा...

लेखक विशुमित यांनी मंगळवार, 03/04/2018 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
रानवारा... माझ्या प्रीतीचा उबारा...!! मन माझं सारखं कलकल करतंय, चूक करून म्हणतंय सलतंय फुंकर घालतो त्याच्यावर, रानवारा... माझ्या प्रीतीचा उबारा...!! तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे, धडपड जशी आत तशी बाहेर आहे, आधार देतो त्याच्यासाठी, रानवारा... माझ्या प्रीतीचा उबारा...!! अवघड किती मिलन तुझं आणि माझं, आड येती दुनियेची रीति रिवाज, जात धर्म मानत नाही, रानवारा... माझ्या प्रीतीचा उबारा...!!

बिथरलेले हिंदूत्व

लेखक नर्मदेतला गोटा यांनी मंगळवार, 03/04/2018 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यपूर्व काळामधे त्या वेळच्या इंग्रज राज्यकर्त्यांनी हिंदू आणि मुसलमानांमधे डावं-उजवं करण्याचा प्रयत्न केला. अनेकदा हिंदूंना डावलून मुसलमानांना झुकतं माप दिलं गेलं. यामुळे हिंदूंमधे आपल्याला डावललं जातं आहे अशी एक सुप्त भावना होती. यातूनच हिंदूत्वाच्या राजकारणाला सुरुवात झाली. सावरकरांनी भारतीय राजकारणामधे हिंदूत्वाचा ठळकपणे उच्चार केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा हेसुद्धा हिंदूत्वाचाच आधार घेत होते. संघाची राजकीय शाखा असलेल्या भारतीय जनसंघाने सुद्धा हिंदूत्वाचे राजकारण केले.

असा पिझ्झा बेस द्या मज आणुनि सजविन मी जो चीझ टॉपिंगज् ने

लेखक चामुंडराय यांनी मंगळवार, 03/04/2018 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
असा पिझ्झा बेस द्या मज आणुनि सजविन मी जो चीझ टॉपिंगज् ने बेक करुनि त्यास ओव्हन मध्ये खाईन मी तो आनंदाने थिन क्रस्ट वा थिक असो वा मिट असो वा मिटलेस असो वा शर्करावगुंठित सोडयासंगे खाईन मी तो आनंदाने हाय कॅलरी लो फायबर तयाला एक्स्ट्रा चिजचा थर पोषणमूल्ये असो नसो वा खाईन मी तो आनंदाने मिट लव्हर्स वा मार्गारिटा वरती एक्स्ट्रा चीझ मारा नानाविध टॉपिंग्ज संगे खाईन मी तो आनंदाने चीज असो वा व्हेजि असो वा स्मॉल मीडियम लार्ज असो वा चिकन टिक्का वा चिकरोनी खाईन मी तो आनंदाने चीज-न-कॉर्न, मार्गारिटा पेरी-पेरी अथवा फियेस्टा पॅराडाईज वा पनीर मखानी खाईन मी तो आनंदाने पनीर तंदुरी, चिकन विंग्ज अन गार्ल

तंदुरुस्त की नादुरुस्त ? : भाग ६ (गरोदरपण)

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 03/04/2018 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या) भाग ६ (अंतिम) : गर्भवतीच्या चाचण्या गरोदरपण ही स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील बाब. आपण आई होणार याची चाहूल लागल्यापासून ते प्रत्यक्ष बाळाचा जन्म होईपर्यंत ती कशा अवस्थांतून जाते ते बघा. आनंद, हुरहूर, काळजी, घालमेल, ‘त्या’ वेदना आणि अखेर परमानंद ! पण हा गोड शेवट तेव्हाच होऊ शकतो जेव्हा एक निरोगी मूल जन्मास येते. जर या प्रक्रियेत काही बिघाड झाला आणि एखादा गंभीर विकार अथवा विकृती असलेले मूल निपजले तर? तर तिच्या वाट्याला येते फक्त दुःख आणि दुःखच.