हिममानव यती - सत्य की मिथक?
हिममानव यती
----------------------------------------
२२ सप्टेंबर १९२१
लेफ्टनंट कर्नल चार्ल्स हॉवर्ड-बरी याच्या नेतृत्वात असलेल्या ब्रिटीश एव्हरेस्ट मोहीमेतल्या सदस्यांपैकी स्वत: हॉवर्ड-बरी, जॉर्ज मॅलरी, गाय बलॉक, हेन्री मोर्सहेड, सँडी वॉलस्टन, एडवर्ड व्हीलर हे सहाजण सव्वीस शेर्पा पोर्टर्ससह पहाटे ४ वाजता २०,००० फूट उंचीवरच्या आपल्या कँपमधून बाहेर पडून लाखपा ला खिंडीच्या मार्गाला लागले होते. हॉवर्ड-बरीची ही एव्हरेस्ट मोहीम शिखरावर प्रत्यक्षं चढाईचा प्रयत्नं करण्यापेक्षा एव्हरेस्ट परिसराची आणि आजूबाजूच्या शिखरांची माहिती गोळा करण्याच्या दृष्टीने आखण्यात आली होती.
भारतीय न्यायपालिकेची विक्षिप्तता
कदाचित कोणतंच नियंत्रण नसल्यामुळं भारतीय न्यायपालिका रसातळाला गेलेली असू शकते. कदाचित इतर देशांच्या मानाने खूप चांगली असू शकते. कदाचित इतर अन्य संस्थांपेक्षाही बरबटलेली असू शकते. देशात न्याय आहे अशी सर्वसाधारण जनभावना केवळ एक चालत आलेली प्रथा म्हणून जीवंत असावी. तसं न्यायपालिकेच्या बाबतीत "संस्था विथ डिफरन्स" नावाचा काही प्रकार नसावा. मला इथे विक्षिप्त म्हणजे चांगल्या, वाईट, लॉजिकल, इल्लॉजिकल, परस्परविरोधी, आपल्याच अन्य न्यायालयाच्या वा बेंचच्या विरोधी, संविधानविरोधी, देशविरोधी, इ इ घटना अभिप्रेत आहेत.
कविची गाडी
कवि गाडीत बसून आहे
गाडी सुसाट धावते आहे
गाडी माणसांना तुडवते आहे
हाडांच्या चिंध्या करते आहे
शब्द हवेत फेकते आहे
कल्पनांचे भुंगे सोडते आहे
कवि गाडीत बसून आहे
गाडी सुसाट धावते आहे
'शब्द बापुडे केवळ वारा'
म्हणून गेला एक येडा
त्या येड्याला काय ठावी
जालाची किमया नाही गावी
आता वाराही न दवडावी
फुकटात 'काव्ये' प्रसिद्ध व्हावी
कवि गाडीत बसून आहे
गाडी सुसाट धावते आहे
काव्यरस
अनवट किल्ले ३१: एश्वर्यसंपन्न गाळणा ( Galana )
बहुतेकदा महाराष्ट्रातील किल्ले म्हणले कि पर्यटकांचा नाराजीचा सुर असतो, कि खुप पडझड झाली आहे, बघण्यासारखे काही शिल्लक नाही. वास्तविक या गडकोटांनी अखेरच्या सैनिकापर्यंत दिलेली झुंज हिच यांच्या लढाउपणाची पावती. पण तरीही एखादा सुस्थितीतील तटबंदी असणारा, बुलंद, भक्कम बुरुजांचे कवच बाळगणारा, फारसी, देवनागरी आणि चक्क ईंग्लिश शिलालेख असणारा, तुलनेने चढायला सोपा असणारा असा गड पहायचा असेल तर नाशिक जिल्ह्यातील गाळणा हा किल्ला तुम्हाला पाहिलाच पाहिजे.
हा असा राम की ज्याच्या हजार सीता
मुखवटे त्याचे दिखाऊ, प्रिय तुला प्राणाहुनी
मात्र तो अपुलाच चेहेरा बघू न धजतो दर्पणी !
मृगजळाचे भरुनी पेले पाजले त्याने तुला
स्वार्थ अन भोगात त्याचा जीव पुरता गुंतला
प्रेषिताचे पाय कसले? मातीची ती ढेकळे !
पूज्य तो बनतोय केवळ आंधळ्या भक्ती मुळे
अजुनी नाही वेळ गेली, सोड त्याची संगत
सोड ते हतवीर्य जगणे, सोड उष्टी पंगत
आतला आवाज सांगे, ऐक मग ते सांगणे
"कवडीमोले विकू नको तू लाखमोलाचे जिणे"
........(स्वयंघोषित बाबा, बापू, महाराज, माताजी यांच्या अंधभक्तांस समर्पित)
सालं, आज जीव कासावीस झालाय
सालं, आज जीव कासावीस झालाय
तिकडं अकरा कळ्यांचा विनाकारण बळी गेलाय
आज मी पण एक बाप आहे
पण खरं सांगू मित्रानो
या देशात बाप होणं , श्राप आहे
केलं असेल त्यांनीही त्यांच्या मुलांना टाटा बाय बाय
त्यांना थोडंच ठाऊक होतं
पुढे होणार आहे काय ?
त्या माउलींचा तीळतीळ तुटला असेल जीव
पण इथे कोणालाच पडली नाही आहे त्याची जाणीव
आजूबाजूच्या लोकांनी केली असेल चौकशी
आपली मुलं कुठे आणि आहेत कशी ?
जो तो आपापलं बघून सांत्वनाला गेला असेल
थोडा वेळ रडेल तिथं आणि परत कामाला लागेल
त्या मायबापाचे अश्रू असेच ओघळत राहतील
बाराव्यानंतरही आणि भरणीलाही
पुन्हा कुठे तरी अजून कळ्या खुरडल्या जातील
बातम्
काव्यरस
मला भेटलेले रुग्ण - १५
http://www.misalpav.com/node/42182
६ वर्षाची मुलगी घेऊन आला होता , दम्याचा त्रास बराच वाढलाय म्हणून सांगीतलं आणि पुढे काय करायचं हे विचारतांना त्याला निघायची घाई झालेली होती ...... मी इन्हेलर्स कसे वाढवायचे सांगीतले आणि घाई असेल तर सवडीने या म्हणालो .... तर म्हणाला “डाॅक्टर हिच्या आईची डिलीव्हरी आहे आज म्हणून मधल्या सुटीत आलो मी , घरी एकटीच असते ही म्हणून घेऊन आलो....
मिसळपाव