|| छत्रपती संभाजीराजे यांचे अप्रकाशित दुर्मिळ चित्र ||
आज १४ मे - इंग्रजी तारखेनुसार छत्रपती संभाजी महाराजांची जयंती (जन्म १४ मे १६५७). यानिमित्त संभाजी महाराजांशी संबंधित माझे संशोधन आज महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित झाले आहे. बातमीत सगळे बारकावे देणे शक्य नसते, म्हणून हा एक विशेष लेख - बातमीच्या तुलनेत इथे प्रतिक्रियांतून भरपूर शिकायला मिळते, तेंव्हा आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा.
===
छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द हि १६८० ते १६८९ अशी फक्त नऊ वर्षांची होती, पण या थोडक्या कालावधीतच त्यांनी फार मोठा पराक्रम गाजवलेला आहे. दुर्दैवाने मराठ्यांच्या ह्या पराक्रमी छत्रपतीची अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच चित्रे आजवर उजेडात आली आहेत.
मिसळपाव