रिमाताईना भावपूर्ण श्रद्धांजली.
रिमाताई लागू यांचा आज प्रथम स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या एका चित्रपटाच्या आठवणीने त्यांना श्रद्धांजली वाहात आहे.
आपली माणसं हा मल्टीस्टारर चित्रपट १९८२ साली आला होता.
मेलोड्रॅमॅटिक परंतु या जगात घडू शकेल किंवा घडलेली असेल अशी मधुकर तोरडमल यांची कथा. सुधीर भट यांचे समर्थ दिग्दर्शन ,उत्तम गीते आणि पार्श्वसंगीत आणि रिमा लागू व अशोक सराफ यांचा अष्टपैलू अभिनय यामुळे हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरला.
कथा तशी साधीच ..... नायक (अशोक सराफ) व नायिका (रिमा) आपल्या संयुक्त कुटुंबात एक मध्यमवर्गीय जीवन जगात असतात. नायक कारखान्यात काम करीत असतो.
मिसळपाव