Skip to main content

अनवट किल्ले ३३ : मालेगावचा भुईकोट ( Malegaon Fort )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 25/05/2018 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
मालेगाव हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध तालुक्याचे गाव असून ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. नाशिकच्या ईशान्य दिशेला नाशिक शहरापासुन १०८ कि.मी. अंतरावर ,मालेगाव असून मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ हा मालेगावातून जातो. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर अनेक गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असते.धार्मिक दंगलीमुळे काहीसे बदनाम झालेल्या या गावच्या कोरड्या हवामानामुळे ईथे मोठ्या प्रमाणात यंत्रमागाचा व्यवसाय चालतो. दाट लोकवस्तीच्या खानदेशातील या महत्वाच्या प्राचीन शहरात गिरणा (गिरीपर्णा) आणि मोसम (मोक्षिणी) नद्यांच्या संगमावर मालेगावचा (माहुलीग्राम) देखणा भुईकोट किल्ला आहे.

का करत नाही कुणी उलट सारे

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 25/05/2018 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
का करत नाही कुणी उलट सारे ज्याला त्याला सुख प्यारे हा द्यूत मांडला कुणी ? इथे पटलावरचे प्यादे सारे मंडल डोळ्यांनी दिसते खरे दिसतात नभी चंद्र तारे आवाका दोन नेत्रांचा असा किती ? त्यात सामावले सुखदुःख आणि अश्रू सारे दोन पायावरती उभे धड पुरे असती एका मनाचे खेळ सारे मन शोधूनही सापडत नाही विज्ञानास तरी त्याचे अस्तित्व खरे बघता सरळ कुणी , वाकडी भासे दुनिया वाकडे वागता कुणी सलाम ठोके दुनिया वक्र दृष्टी ग्रहांची ज्या कुंडलीत त्याच ग्रहांची शांती होते इतर ग्रहांचे फळ मिळूनही सारे काही दुर्लक्षित होते बळी द्या त्या कोंबड्या बकऱ्या द्याल का कधी बळी वनराजाचा ?
काव्यरस

राजयोग - ४

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 25/05/2018 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग - १ राजयोग - २ राजयोग - ३ भुवनेश्वरी देवीच्या मंदिराचा सेवक जयसिंह क्षत्रिय कुळातील होता. त्याचे वडील सुचेतसिंह त्रिपुराच्या राजमहालातले जुने सेवक होते. सुचेतसिंहांचा मृत्यू झाला तेव्हा जयसिंह लहान होता. वडिलांच्या पश्चात अनाथ झालेल्या या मुलाला राजाने मंदिरात काम करण्यास नियुक्त केले. मंदिराचे पुजारी रघुपती यांनीच त्याचे पालनपोषण आणि शिक्षण पार पाडले होते.

स्वैपाकघरातून पत्रे २

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 25/05/2018 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय अन्नपूर्णा, जसे शहरात अपार्टमेंट, तसे किचनमध्ये आम्ही. एकावरएक चार, पाच, सहा किंवा आणखी कितीही मजली. तुझ्या choice प्रमाणे. घरातील माणसांच्या संख्येवर लोक माझी खरेदी करतात. तुझ्या घरात आमचे सहा मजले आहेत. पण तू त्यातलेही एक दोन काढून ठेवतेस. म्हणतेस, ‘घरात इतकी कमी माणसे, कशाला सगळे मजले चढवत बसा?’ मग आमच्यातला वरचा मजला काढून ठेवतेस किंवा रिकामा तरी ठेवतेस. मग उरलेल्या सगळ्यांना कुकरमध्ये बसवतेस. आम्ही सहसा बाहेर येतो, ते सुट्टीच्या दिवशी. तो दिवस आमच्या outing चा.

हकिक़त

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 24/05/2018 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
ये शायरी नही दोस्तो हकिक़त है ------ अपने माझी को टटोलता हूँ कभी तो गुजरे हुये सालो में एक रुहानी कहानी दिखायी देती है ------ समंदर के किनारे जानो पें सर रख्खे बैठी हुयी एक भोली, कमसीनसी लडकी दिखती है ------ आज भी उसके चेहरे को देखते ही रुह को जो लम्स होता है मानो ओस से भीगी मिट्टी पैरोंको छू गयी हो ------- उस रात अचानक एक बात समझ आयी थी रोशनी मोहताज होती नही चाँद या सुरज की ------- ये शायरी नही दोस्तो हकिक़त है ------ गर जो वो पास ना हो तो भी साथ रहती है सच कहता हूँ सासोंमे महकती रहती है ------- पुरे बारा सालोंका साथ रहा है उसका और मेरा ... वही भोली, कमसीनसी लडकी ... पहचान तो थी उसकी और मेरी

राजयोग - ३

लेखक रातराणी यांनी गुरुवार, 24/05/2018 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग - १ राजयोग - २ गोविंद माणिकय राजाची सभा सुरु आहे. भुवनेश्वरी देवीच्या मंदिराचे पुजारी राजाच्या दर्शनासाठी आले आहेत. पुजारीजींचं नाव आहे रघुपती. देवीची पूजा झाल्यावर चौदा दिवसांनी मध्यरात्री चौदा देवतांची पूजा केली जाते. या पूजेच्या दिवशी आणि दोन रात्री कुणीही बाहेर पडत नाही, राजासुद्धा नाही. जर राजाला बाहेर जावं लागलं तर त्याला पुजारी सांगतील तो दंड द्यावा लागतो. ह्या पूजेच्या रात्री मंदिरात बळी द्यायची प्रथा आहे. हा बळी राजभवनातून दान म्हणून दिला जातो.

न्याय .... कलियुगातला

लेखक Jayant Naik यांनी गुरुवार, 24/05/2018 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
न्याय – कलियुगातला. स्थळ: सम्राट सूर्यकेतू यांचा दरबार. काळ: इंग्रजांचे भारतात राज्य यायच्या थोड्या आधीचा काळ. सम्राट सूर्यकेतू गंभीर पणे न्यायाधीश राजकुमार रवीन्द्रना म्हणाले, “ राजकुमार आपली न्यायाधीश पदी नेमणूक झाल्यापासून येव्हडा सर्वाना संभ्रमित करणारा विवाद समोर आला नव्हता.. काल आपण वादी आणि प्रतिवादी या दोघांची बाजू ऐकून घेतली. दोन्ही बाजूंच्या साक्षी पण संपल्या आहेत. आता आपण निर्णय देण्याची वेळ आली आहे.

मा.ल.क.-३

लेखक शाली यांनी गुरुवार, 24/05/2018 07:27 या दिवशी प्रकाशित केले.
एका विद्वान महाशयांचा दिवसाचा बहुतेक वेळ त्यांच्या अत्यंत अद्ययावत असलेल्या ग्रंथालयातच जाई. त्यांच्या ग्रंथसंग्रहात देशो-देशीचे अनेक भाषेतले, अनेक विषयांवरचे ग्रंथ होते. त्यांनी स्वतः लिहिलेल्या ग्रंथांनी एक स्वतंत्र कपाट भरलेले होते. काव्य, शास्र, विनोद, व्याकरण, ज्योतिष सारख्या अनेक विषयात ते पारंगत होते. देशाच्या कोणत्याही भागात कुणी अभ्यासक किंवा विद्वान रहातात असे या 'विद्वानमहाशयांना' कळाले की ते तडक आपली प्रवासाची तयारी करत आणि त्या दिशेला मार्गस्थ होत. मग समोरच्या अभ्यासकाला अथवा विद्वानाला ते जाहीर सभा भरवून वादाचे आव्हान करत. मग काय?

इस रंग बदलती दुनिया में !

लेखक शब्दबम्बाळ यांनी गुरुवार, 24/05/2018 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच एका अध्यात्म वगैरेंच्या धाग्यावर इथे एक अवांतर चर्चा सुरु झाली (म्हणजे मीच सुरु केली म्हणा!) त्याला माझं छिद्रान्वेषण कारणीभूत आहे असे काही लोकांचं मत झालं. पण तरीही त्या चर्चेतला मुख्य मुद्दा मला फार महत्वाचा वाटतो. खूप साधा सरळ मुद्दा... एखाद्याची खिल्ली उडवण्यासाठी त्याला फक्त "काळ्या" म्हणणे पुरेसे आहे? आपण बरेच "कॉमेडी" शो पाहतो. त्यातले निम्मे अर्धे विनोद हे शारीरिक व्यंग किंवा रंग (म्हणजेच तो किती काळा आहे त्यानुसार) यावर असतात.

दोसतार-१०

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 24/05/2018 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा https://misalpav.com/node/42617
आईने तीच्या हातातला पुडा पिशवीत ठेवला. या शेंगा बाबाना . तो पुडा तुला. मी पुड्यातल्या चार गरम शेंगा काढून आईला दिल्या. आईने माझ्या हातातला पुडा किती गरम आहे याचा अंदाज घेतला आणि तो माझ्या शर्टच्या खिशात उपडा केला. अर्धवट भिजलेल्या शर्ट मुळे वाजणारी थंडी त्या खिशातल्या गरम शेंगानी एकदम पार पळवून लावली. पुढच्या आठवड्यात पुस्तंक आली आहेत का ते पहायला यायचं ते पाऊस येणार आहे हे बघूनच. हे ठरवूनच टाकले.
पुस्तकं कधी येणार हे माहीत नव्हते. शाळेच्या वर्गात बहुतेकांची हीच परिस्थिती होती.