Skip to main content

शिवबा आमचा मल्हारी!

लेखक सई जोशी यांनी मंगळवार, 10/07/2018 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार दुपारची वेळ, साधारण १:३० वाजलेले. सहकुटुंब मराठी picture ला जायचा योग तसा कमीच येतो आमचा, पण ह्यावेळी शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांवरचा picture असल्यामुळे एकत्र बघायचा असे ठरवलेच होते, picture अर्थातच "फर्जंद". तर theater मध्ये पोचलो आणि अजिबात गर्दी दिसेना. जरा वाईटच वाटलं मला. काही दिवसांपूर्वीच "Jurassic World" बघायला गेलो असताना "संजू" साठी १ km लांब असलेली रांग बघितली होती. संजय दत्तवरचा picture बघायला लोकं इतकी गर्दी करतात आणि मावळ्यांवरच्या picture ला नाही ह्याचं वाईट वाटलं बहुदा मला.

वार्‍याची डरकाळी !

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी मंगळवार, 10/07/2018 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
मी कॉलेजमध्ये असतानाची आठवण. आमच्या कॉलेजमध्ये मुलामुलींना व प्राध्यापकांना योगासानांची माहिती व्हावी म्हणून एक सत्र आयोजित केलं होतं. त्यासाठी एक योगशिक्षकआले होते. आमच्या कॉलेजचा बॅडमिंटन हॉल त्यांना त्यासाठी वापरायला दिला होता. आमचे नेहमीचे विषय आपापल्या वर्गांमध्ये चालू होतेच. शिवाय योगाचे देखील. आमचा रसायनशास्त्राचा वर्ग चालू होता. आमच्यापैकी बरेच विद्यार्थी योगासनासाठी गेलेले होते. त्यामुळे आमचंही अभ्यासात फारसं लक्ष नव्हतं. जवळजवळ पन्नास विद्यार्थी आसनं करंत होते. मधेच बॅडमिंटन हॉलमधून प्रचंड गर्जना ऐकू आल्या. कॉलेज दुमदुमलं!

कथा तिसरी - शहज़ादी....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 10/07/2018 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire कथा पहिली - "कुलसूम ज़मानी बेगम...." दुसरी कथा - गुलबानो

शहजादी

मी आत्ता ज्या घरासमोर उभा आहे ज्याच्या भिंती मातीच्या, कच्च्या होत्या आणि त्याचा एक भाग पावसाळ्यात ढासळला होता. दरवाजावर फाटका तुटका एक घाणेरडा पडदा लटकत होता.

डाळ गंडोरी

लेखक shital यांनी मंगळवार, 10/07/2018 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: ४५ मिनिटे लागणारे जिन्नस: १ वाटी तूरडाळ १ मोठी पेंडी(जुडी) आंबटचुका किंवा अंबाडी १-२ हिरवे टोमॅटो १/२ पेंडी (जुडी) पालक ५-६ हिरव्या मिरच्या ३-४ मोठ्या पाकळ्या लसूण १ पेरभर लांबीचा आल्याचा तुकडा साहित्य ब) ५-६ लांब हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे मीठ ५-६ लसूण पाकळ्या पेरभर आल्याचा तुकडा १/२ ते १ वाटी शेंगदाणे १/२ वाटी खोबर्या चे काप साधारण ४-५ टेबल्स्पून तेल क्रमवार पाककृती: साहित्य अ) मधल्या पालेभाज्या निवडून घ्यायच्या. अंबाडीची भाजी घेणार असाल तर फक्त पाने वापरायची. लसूण, आले ओबडधोबड ठेचुन घ्यायचे. मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे. भाज्या धुवुन घ्यायच्या.

कवठेगुलंद ते शिवपुरी अक्कलकोट पदयात्रा.

लेखक खुशि यांनी सोमवार, 09/07/2018 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
।। कवठगुलंद चे गुरुतुल्य नाना ॥ नाना - किर्तनकलाशेखर,किर्तनाचार्य,किर्तनचुडामणी,किर्तनकौस्तुभ,किर्तनभूषण, किर्तनगानकौस्तुभ,किर्तन कलासागरअशा महाराष्ट,मध्यप्रदेश सरकारने दिलेल्या पदव्यांनी विभूषित रेडिओस्टार ह.भ.प.श्री.नारायण श्रीपाद काणे या गुरुतुल्य ऐंशीवर्षांच्या तरूण उत्साही व्यक्तिमत्वाची ओळख,परिचय आणि सहवास या कवठेगुलंद ते शिवपुरी अक्कलकोट पदयात्रेत मला मिळाला ही मैया आणि मोरयाची क्रृपा.नर्मदे हर. नानांच्या घराण्यात पांच पिढ्यांची किर्तन परंपरा आहे भीमसेन जोशीजीं सारख्या गोड पहाडी आवाजाची ईश्वरी देण

आपल्याच तिरडीसाठी आपणच पैसे द्यायचं

लेखक खिलजि यांनी सोमवार, 09/07/2018 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
कॅन्सर हा आता ग्रँड रोग झाला साल मरणाला पण सोन्याचा भाव आला बळीराजाला दाखवून अमिष कंपन्या पेरतायत शेतामध्ये विष औषधे तत्पर सेवेस रुग्णांसाठी थोडे पुढं ढकलण्यासाठी दिवस एकास होतो खरा पण जुंपले जाते सारे कुटुंब कुणी विकतात शेतीवाडी तर गिधाडांचे खिसे तुडुंब आलो इथवर विज्ञान घेऊनि जुने दिले केव्हाच टाकून तेच सोने होते, माझ्या बाळा ताजे खायचा अन शिळे द्यायचा फेकून सरकार असो कुठलंही कर मात्र नेमाने घेतात कायद्याच्या नावाने बोंब सारी येनकेन प्रकारे फक्त बळी जातात कुठे दडली मेख सारी भलतीकडेच सुरु इलाज त्याचा बळीराजाचा खांदा वापरून सरकार प्रजेवरच नेम धरी तर म

तो आणि ती.... यशोदा! (भाग 3)

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 09/07/2018 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
(खूप प्रयत्न करूनही पहिल्या दोन भागांचे दुवे जोडणे जमले नाही. क्षमस्व! दुवे कसे जोडता येतील यासाठी व्य. नि. कोणी केला तर खूप मदत होईल. धन्यवाद!) तो आणि ती............ यशोदा! "गोपाला.... प्रत्येक स्त्रीला बाळाला जन्म देतानाच्या वेदना कायम लक्षात राहातात आणि त्याहूनही जास्त लक्षात राहात ते बाळाचा जन्म घेताच पहिला आलेला रडण्याचा पहिला आवाज. मी  मात्र जन्म देताना पूर्ण ग्लानीत होते... जाग आली तेव्हा तू कुशीत होतास. जन्मतःच आपल्या उजव्या पायाचा अंगठा तोंडात घालून चोखत होतास. तुला पहाताच माझा उर भरून आला आणि काहीही कळण्याच्या आत मी तुला पदराखाली घेतला.

२००० ? ८८ ? २१ वे शतक ? ईश्वरी समानता, धर्म आणि प्रवेशाची चर्चा !

लेखक माहितगार यांनी सोमवार, 09/07/2018 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
* ह्या धाग्यात राजकारण्याचे उल्लेख आले आहेत पण राजकारण हा ह्या धाग्याचा विषय नाही हे प्रतिसाद देताना लक्षात घ्यावे हि नम्र विनंती लक्षात घेऊन अनुषंगिका व्यतरीक्त राजकीय अवांतरे टाळावीत. *** नमनाला घडाभर, अस्मादिकांचा एक अनुभव *** एका आफ्रीकन देशातील एका आफ्रीकन कंपनीच्या ऑफीस मध्ये एक आफ्रीकन स्त्री, एक बिझनेस डील पूर्ण होतो. तोंडी आदेश निघतात, कागदपत्रांची पुर्तता करण्यात स्टाफ गर्क होतो, चहाची पण ऑर्डर होते. बिझनेस मिटींग मध्ये हाच मधला थोडासा वेळ बिझनेस शिवाय चर्चा - (सहसा अविवाद्य कारण बाकी मिटींगचा उद्देश औपचारीकच असतो) -होण्याची शक्यता असते, तसे इथेही झाले .

भांड्याला भांड

लेखक जागु यांनी सोमवार, 09/07/2018 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज स्वयंपाक करता करता अचानक मनात विचार आला तो स्वयंपाक घरातील भांड्यांचा. आपल्या स्वयंपाक घरात भांडी एकमेकांच्या साथीने, गुण्यागोविंद्याने चविष्ट आणि कलात्मक पदार्थ बनवण्यासाठी किती संगठित होऊन काम करत असतात. त्यातील काही ठरलेल्या जोड्या म्हणजे पोळीपाट-लाटणं, तवा-कालथा, कढई-झारा, खल-बत्ता, चमचा-वाटी. थोड्या आधीच्या काळात गेलो तर कप-बशी, पाटा-वरवंटा, तांब्या-पेला, उखळ-मूस ही भांडी किंवा साधनेही कायम एकमेकांच्या साथीनेच काम करायची. तसं पाहील तर प्रत्येक भांड्याला धडपड करावी लागते अस नाही, जसं की वाटी-चमचा. वाटीतील पदार्थाचा आस्वाद देण्यासाठी चमच्यालाच धावाधाव करावी लागते.

जफर पनाही : अ लव्ह लेटर टू द सिनेमा… (पूर्वार्ध )

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी सोमवार, 09/07/2018 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या देशात जर एक असा कलाकार असेल ज्याचे चित्रपट नेहमीच आंतरराष्ट्रीय स्थरावर नावाजले गेले आहेत आणि जातात. त्याला आतापर्यंत जवळपास २५ हून अधिक अतिशय प्रतिष्ठेचे पुरस्कार किंवा सन्मान मिळाले आहेत, ज्याचे चित्रपट जगातल्या सर्व मोठ्या चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवले जातात, तर त्या कलाकाराचं त्याच्या देशात काय स्थान असेल? देशातल्या सरकार कडून त्याला मिळणारी वागणूक कशी असेल? ते त्याच्या चित्रपट बनवण्यावर किंवा लिखाण करण्यावर २० वर्ष बंदी नक्कीच घालणार नाहीत… पण समजा हा कलाकार इराण सारख्या कट्टर मुस्लीम राष्ट्रातला असेल तर?