Skip to main content

गावाकडची गोष्ट

लेखक दिनु गवळी यांनी शनिवार, 18/08/2018 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
अरे .. ! ये दिनू अरे थांब कि थोडा वेळ मला पण यायचं आहे . तू असा एकटाच कसा चालला पण दिनू च लक्ष आज कुणाकडेच नव्हतं त्याला आज काहीही करून त्या गावाबाहेरच्या पडक्या विहिरीचं रहस्य शोधायचं होत मागील एक महिन्या पासून त्या विहिरीजवळ मेलेली मांजर दररोज टाकलेली असायची .

आभाळ

लेखक शब्दवेडी यांनी शनिवार, 18/08/2018 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्याविना घर खायला उठतं मला. तू असताना जांभळीच्या पांनातून येणारं वारं सोबत शहारे घेऊन येतं आणि तू नसताना, मनाला कापरं भरवतं. तू नसल्याच्या जाणीवेनी माझा भूप भैरवी बनतो आणि मागे उरतात फक्त काही आर्त स्वर – काळीज चिरत जाणारे. तुला कितपत कळेल माझी भाषा, माझी आर्तता, माझ्या भावना, नाही माहिती मला. तरीपण तुला सांगावासं वाटतं, तू माझा आधार आहेस. माझं आभाळ आहेस. म्हणशील मला तू खुळचट आणि विचारशील “अगं वेडे, आभाळ कधी आधार देऊ शकतं का?” इतरांना नाही देऊ शकणार कदाचित पण तू आहेस माझं आभाळ आणि आधारपण! लोकांना जगण्यासाठी डोक्यावरती छप्पर लागतं, एक निवारा लागतो, चार भिंती लागतात.

आमचे अण्णा!-१

लेखक VINOD J. BEDGE यांनी शनिवार, 18/08/2018 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे अण्णा!-१ आमचे अण्णा म्हणजे माझे आजोबा एक अतरंगी व्यक्तिमत्व,एकदम दिलखुलास. सात बहिणींच्या नंतर झाले असल्याने पणजोबांनी लाडावून ठेवलेले त्यामुळे सगळे रंगढंग,मजामस्ती आणि काय काय असतील ते सगळे अनुभव गाठीला असलेले. तसं आमचं गाव कवठेमहांकाळ तालुक्यातलं आता दुष्काळी पण आजोबांच्या वेळी पाऊसपाणी चांगल असलेलं त्यामुळे हळद ,पानाच मळा, ज्वारी,असं सधन आणि चार पैसे राखून असलेले लोक, एकंदर सुखी म्हणावं असं गाव. तर असे हे एकुलते चिरंजीव आणि त्यांचे एक आप्पा नावाचे मित्र फुल धिंगाणा करायचे.

पावसाचं गीत

लेखक चांदणशेला यांनी शनिवार, 18/08/2018 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
हिरव्या रानात पाखरांची वस्ती पावसाचं गीत कंठातून गाती नभात उतरले रंग सावळे मेघात लपले आभाळ निळे पसरला माथ्यावर ढगांचा मांडव पिसाट झाडांवरती विजांचे तांडव शिवारात सरकते वाऱ्याची लाट माती पाहते पाऊसओली वाट

भद्र किल्ला (अहमदाबाद- गुजरात)

लेखक गणेश विजय काळे यांनी शुक्रवार, 17/08/2018 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
भद्र (Bhadra Fort)किल्ल्याची माहिती पाहण्याआधी आपण हा किल्ला ज्या अहमदाबाद शहरात आहे त्याचा थोडक्यात इतिहास पाहूया….. ११ व्या शतकात साबरमती नदीच्याकाठी आशाभिल्ल राजाने “आशावल” नावाचे गाव वसविले.पुढे कर्णसोळंकी राजाने हे गाव जिंकले आणि याचे “कर्णावती” असे नामकरण झाले.सुमारे शतकभर येथे हिंदू राजे राज्य करीत होते.परंतु तेराव्या शतकात मुस्लीम राजाचे आक्रमण झाले.१४-१५ व्या शतकात सुरवातीस बहामनी वंशाचा आणि गुलबर्गयाचा सुलतान अहमदशाह या राजाने राज्य केले.इ.स. १४११ मध्ये या कर्णावती शहराचे नाव बदलून अहमदाबाद असे करून अहमदशाहाने येथे आपली राजधानी वसवली.

पावसाळी भटकंती: वर्धनगड ( Vardhangad)

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 17/08/2018 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
एतिहासिक कागदपत्रे वाचताना खुप काळजी घ्यावी लागते, कारण जसा मराठीमधे श्लेष अलंकार आहे, ज्यामधे एकाच वाक्याचे दोन अर्थ निघतात, तसेच मोडी लिपीच्या लिहीण्याच्या सलगतेमुळे कदाचित चुकीचा निष्कर्श निघू शकतो. नेमकी अशीच एक घटना वर्धनगड किल्ल्याबाबत झाली असावी. जेधे शकावली या शिवचरित्राच्या दृष्टीने महत्वाच्या आणि अस्सल साधनामधे एक उल्लेख आहे, "राजश्रीवर्धनगडास जाउन संपुर्ण उष्माकाल राहिले". १२ आक्टोंबर ते नोव्हेंबर १६६१ असे महिनाभर शिवाजी महाराज या गडावर मुक्कामाला होते. पण नेमक्या कोणत्या गडावर असा प्रश्न महत्वाचा आहे.

ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ११

लेखक टर्मीनेटर यांनी शुक्रवार, 17/08/2018 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
/* W3.CSS 4.13 June 2019 by Jan Egil and Borge Refsnes */ html{box-sizing:border-box}*,*:before,*:after{box-sizing:inherit} /* Extract from normalize.css by Nicolas Gallagher and Jonathan Neal git.io/normalize */ html{-ms-text-size-adjust:100%;-webkit-text-size-adjust:100%}body{margin:0} article,aside,details,figcaption,figure,footer,header,main,menu,nav,section{display:block}summary{display:

सबका साथ सबका विकासाचे आद्य पुरुष - स्वर्गीय अटलजी

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 17/08/2018 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
मी भाग्यशाली होतो, १९९७ मध्ये प्रधानमंत्री कार्यालयात पोस्टिंग झाली. अटलजी प्रधानमंत्री झाले आणि कार्यालयात एक वेगळीच चेतना आली. कामाचा बोझा एकदम वाढलला. सरकारी दफ्तरात नूतन कल्पना साकारताना, भरपूर कागदी कार्य करावे लागतेच. सकाळी ९ ते रात्री ९ वाजायचे कधी कळायचे नाही. पण देशासाठी आपण काही ठोस कार्य करत आहोत या जाणीवेने त्या कामातहि आनंदच मिळत होता. सबका साथ, सबका विकास याचा अर्थ काय. स्व. अटलजींनी अनेक राजनीतिक दलांना आपल्या सोबत घेऊन सरकार चालवली म्हणजे विकास होतो. नाही. देशात विभिन्न राजनीतिक आणि धार्मिक समूहांना आरक्षण दिल्याने सर्वांचा विकास होतो. नाही.

श्रीहरिश्चंद्रेश्वर मंदिर

लेखक गणेश विजय काळे यांनी शुक्रवार, 17/08/2018 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
“हरिश्चंद्र” हे नाव उच्चारले कि एकतर राजा हरिश्चंद्र आणि त्यावर आधारलेला पहिला मूकपट आठवतो नाहीतर डोंगर भटक्यांसाठी आवडते ठिकाण आणि त्यांच्यासाठी असलेले “पंढरपूर” म्हणजे हरिश्चंद्रगड .पण याच नावाने महाराष्ट्रात असलेले श्रीहरिश्चंद्रेश्वर मंदिर मात्र सगळ्यांसाठी अल्प परिचित आहे आणि हे मंदिर आपल्याच महाराष्ट्रात जुन्नर या तालुक्यात दडलेले आहे .स्वतःच्या वाहनाने जर कधी भिमाशंकरला जात असाल तर, थोडासा वेळ काढून मुद्दाम हे मंदिर पाहण्यास काहीच हरकत नाही.या मंदिराचा थोडक्यात परिचय करून देण्याचा हा माझा पहिला प्रयत्न. पुणे भिमाशंकर महामार्गावर मंचर या गावाच्या पश्चिमेस १२ कि. मी.

कळलावी

लेखक vcdatrange यांनी गुरुवार, 16/08/2018 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
सुलभ प्रसूतीसाठी आदिवासी आणि पारंपरिक औषधी पद्धतीमध्ये मुळाचा लेप ओटीपोटावर लावला जातो. बाळंतिणीला प्रसूतीच्या वेळी कळा आणण्यासाठी वापर होत असल्याने या वनस्पतीला "कळलावी' म्हटले जाते. ा कळलावीच्या फुलांच्या पाकळ्यांची टोके तांबडी व मधला भाग पिवळा असल्याने अग्निज्वाला असल्याचा भास होतो. अग्निज्वालाप्रमाणे असणार्‍या या पाकळ्या दुरून समईत ज्योती तेवल्याप्रमाणे दिसतात, म्हणूनच या वनस्पतीला ‘अग्निशिखा’ असेही म्हणतात. पावसाळा सोडून इतर ऋतुत याचे कंद जमिनित जिवंत असतात.