Skip to main content

बदमाश अँथनी स्मिथ भाग २

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 04/09/2018 03:23 या दिवशी प्रकाशित केले.
शिवाजी महाराजांच्या सुरतच्या लुटीच्या कारवाईची मोहीम पाद्री रेव्हरंड एल इस्कालियट एका पत्रात म्हणतो, 'अँथनी स्मिथ सुटून आल्यावर सांगत असे कि काय आणि किती लूट केली होती शिवाने. तो म्हणाला, मी पाहिलं ना, अश्शा थप्प्या लागल्या होत्या पैशांच्या राशींच्या! २० - २५ (हंड्रेड थाउजंड) लाख तरी रोकड लुटले रोकड! शिवाय ३०० हमालांकरवी मोठ्या पिशव्यात, पोत्यात हिरे, मोती, माणके, असे जड जवाहिरे गच्च भरायच्या कामाला लागले होते त्यांचे सैनिक. विरजी व्होरा, जो त्या वेळी जगातला सर्वात श्रीमंत व्यापारी होता त्या एकट्या कडून ८० लाखाचा माल जप्त केला होता.

गोपाळकाल्याच्या निमित्ताने

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 03/09/2018 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
गोपाळकाल्याच्या निमित्ताने  काल मी एक कविता whatsapp वर वाचली. अनेकांकडून ती मला forward झाली होती. अलीकडे जो सण असतो त्याबद्दल कोणा थोरामोठ्यांनी काही म्हंटलेले असते ते किंवा मग असे माहित नसलेले अनेक लेखक-कवी यांच्या शब्दबद्ध झालेल्या भावना आपण आपल्याच मानून एकमेकांना पाठवत असतो. त्यातलीच ही एक कविता..... मात्र ही कविता वाचली आणि अगदी खोल मनाला स्पर्शून गेली.

व्हेज तंदूर

लेखक sandeepa यांनी सोमवार, 03/09/2018 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण महिना सुरु असल्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी व्हेज तंदूरचा प्रयोग करून बघावा असे ठरवले. त्याप्रमाणे ऑफिस सुटल्यावर तडक वखार गाठली आणि एक किलो कोळसा घेतला. सौ.ना विचारून घरी उपलब्ध असलेल्या भाज्यांचा अंदाज घेतला आणि पाव किलो मश्रुम आणि शंभर ग्राम पनीर घेतला. मश्रुम शक्यतो डेअरी मधून घेतल्यास ताजे आणि मॉल पेक्षा कमी किमतीत मिळतात. तर मग असा प्रायोगिक तत्वावरचा प्रयोग सुरु केला......

सुरतच्या वखारीतील बदमाश अँथनी स्मिथ भाग १

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 03/09/2018 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
'त्या अँथनी स्मिथपेक्षा जगात इतका नास्तिक नालायक इसम जगायच्या लायकीचा नसावा' हे वाक्य आहे सुरतच्या कौन्सिल ने इस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या ३१ मार्च १६६५ च्या पत्रातील आहे! गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या Shivaji : His Life and Times या इंग्रजी ग्रंथातून सुरतच्या वखारीतील मुख्य कार्यालयातील हकिकती वाचताना आणखी एका गणंगाची रंजक माहिती हाती आली. ती सादर... त्यामधून शिवाजी महाराजांच्या सूरत लुटीच्या कारवाईची माहिती समजून घ्यायला सोपे जाते. शिवाय त्या निमित्ताने दोन बंगाली इतिहासकारांच्या मधील मतांतरे समजतात.

तीन देवियां - भाग २

लेखक Prakashputra यांनी सोमवार, 03/09/2018 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग इथे वाचा : https://www.misalpav.com/node/43220 मग मी तिला एके ठिकाणी घेऊन गेलो. काय बोलायचे वगैरे तयारी पक्की झाली होती. वातावरण खेळकर करावे म्हणून तिला एक जोक सांगितला, तुम्हाला पण सांगतो ( एकदा दोन मित्र, राम आणि श्याम रेल्वेने प्रवास करत असतात. डब्यात एक पूर्ण टक्कल पडलेला माणूस असतो. राम श्यामला म्हणतो, तू जर त्या माणसाच्या टकलावर मारलेस तर तुला १०० रु देईन. श्याम जातो, त्या माणसाच्या टकलावर जोरात मारतो आणि त्या माणसाला म्हणतो, "अरे काळे तू इकडे कुणीकडे ? ".

सेक्रेड गेम्स: ठो-कळे

लेखक वनफॉरटॅन यांनी सोमवार, 03/09/2018 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय woke लोकांसाठी कंटेंटचं इतकं दुर्भिक्ष्य आहे, की अक्षरश: कोणतीही नवीन कलाकृती मस्त खपून जाते. त्या कलाकृतीला खरोखर चांगलं निर्मितीमूल्य, दर्जेदार लेखन/दिग्दर्शन मिळालं की ती प्रेक्षकांच्या मनात अढळपद मिळवते. ह्यामुळे इतर म्हणाव्या तर बारीक, म्हणाव्या तर गंभीर चुकांकडे सरसकट दुर्लक्ष होतं. (पुढील लेखात पांढऱ्या ठशांत 'रसभंग' आहेत.) नेटफ्लिक्सची सेक्रेड गेम्स ही आजकाल अतिशय चर्चेत असलेली भारतीय मालिका. मालिका त्रैभाषिक आहे. मुख्य पात्रांतले संवाद हिंदी/इंग्रजीत असले तरीही कथा मुंबई पोलिसांभोवती फिरणारी असल्यामुळे मराठीचा वापर इंग्रजीपेक्षा जास्त आहे.

फ्लुओराइड : दातांचे अंगरक्षक

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 03/09/2018 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
(खनिजांचा खजिना : लेखांक ५ ) सूक्ष्म पोषण घटकांपैकी दातांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले हे खनिज. विविध प्रसारमाध्यमांतून आपल्यासमोर फ्लुओराइडयुक्त टूथपेस्टच्या जाहिराती सतत आदळत असतात. त्यातून आपल्याला फ्लुओराइडच्या महत्वाची जाणीव होत असते. निसर्गात ते माती, विशिष्ट खडक आणि पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांत आढळते. अल्प प्रमाणात ते आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. पण, ते अतिरिक्त प्रमाणात शरीरात गेल्यास मात्र तापदायक ठरते. त्याचा सर्वांगीण आढावा या लेखात घेतला आहे. आहारातील स्त्रोत १.

बाह्य बळाने ढकलल्यावर विरोध करणारी व पुन्हा सावरणारी बळे (Restoring and Opposing forces)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी रविवार, 02/09/2018 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
परकीय आक्रमण झालं की त्याला थोपवायला आपलं सैन्य सरसावते, युद्धामध्ये खासकरून सशस्त्र युद्धामध्ये जशास तसं वागावंच लागतं. माणसाला रोग झाला तर त्याचं शरीर व विशेषत: पांढऱ्या रक्तपेशी त्या रोगाशी लढा देऊन पूर्व स्थितीवर येण्याचा प्रयत्न करतात. चांगलं तापलेलं पाणी पुन्हा काही वेळानं थंड होतं. संकटात सापडलेला माणूस आपत्काळात वेगळा वागतो आणि संकट टळलं की पुन्हा आलाच मूळ पदावर. 'पहिले पाढे पंचावन्न ', 'स्वभावाला औषध नसते', 'सूंभ जळला तरीही पीळ जळत नाही' अशा म्हणी उगीच आल्या नसतील. "विक्रमा काय रे हे ? मानवी स्वभाव वगैरे चा विचार करतोयस.. पदार्थ विज्ञान सोडून मानस शास्त्राचा विचार करतोयस आज ?

वॉल्डन...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 02/09/2018 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
- नुकतेच हेन्री डेव्हिड थोरोच्या वॉल्डन या पुस्तकाचा अनुवाद व त्याचे चरित्र लिहून संपवले... बरेच दिवस लिहित होतो. भाषा जुन्या वळणाची असल्यामुळे कळण्यास अवघड वाटली पण या अनुवादाच्या प्रवासात बरेच विचार मंथन घडले. काही गोष्टी पटल्या तर काही नाही. ज्या पटल्या नाहीत त्याचा आता हल्लीच्या युगात काही संदर्भ राहिला नसल्यामुळे. पण ज्या पटल्या त्या मात्र कायमच्या उपयोगी पडणार्‍या आहेत हे निश्चित... असो. त्यातील काही परिच्छेद येथे टाकत आहे.... मी झपाटल्यासारखे ही सगळी पाने लिहिली त्यामुळे प्रकाशक मिळेल का इ इ. विचारच केला नाही.. :-) बघूया आता... मिळाला तर बरे...