लुब्री
हो... कुत्रीच होती ती.
या घरात आम्ही रहायला आलो. यायच्या आधी मागच्या अंगणाला गेट करुन घेतलं. दिवसा बिल्डींगच्या पार्किंगच्या आवारात इकडून तिकडे पळणारं एक कुत्रं दिसायचं वरचेवर.. भटकं..
रहायला आल्यावर काही दिवसानी नवीन करुन घेतलेल्या गेटला लागून असलेल्या भिंतीवर, नुकत्याच दिलेल्या पांढर्या रंगावर मातीचे घासल्यासारखे डाग दिसू लागले. आणि ते वाढायला लागले. कशाने त्या अडचणीच्या जागेत असं होतय काही कळत नव्हतं. मग एके दिवशी दुपारच्या वामकुक्षीच्या शांत वेळी मी काही कारणाने स्वयंपाकघराचे दार उघडून मागे अंगणात गेले.
मिसळपाव