माझी पहिली सायकल राईड
माझ्या नवऱ्याला श्रीनिवासला सायकल चालवण्याचं फार वेड आहे. मी केव्हाही त्याला कुठे जाऊया म्हटलं कि लगेच त्याच पुढचं वाक्य 'सायकल ने जाऊया' हेच असतं. मी ४ चाकी गाडी चालवायला लागल्यावर ४ चाकीवर फिदा होऊन प्रसंगी एकटीसुद्धा फिरायला लागले. पण श्रीनिवास काही चिकाटी सोडायला तयार नव्हता. माझ्या सासर आणि माहेरच्या घरामध्ये फक्त ३५ किमीच अंतरआहे. केव्हाही त्याला आईकडे जाऊया म्हटलं कि सायकलने जाऊया हे ठरलेलं. त्याच्या जोडीने मी हळू हळू सायकलिंगला सुरवात केली होती पण ३५किमी तेही मधले घाट पार करून जाण्याची कल्पना करवेना.
मिसळपाव