आवाज आवाज...
आवाज आवाज...
दिवाळी म्हटलं की भल्या पहाटे नरकचतुर्दशीला उडवलेल्या 'लक्ष्मी बाँब'चा आवाज कानांत घुमतो. आसपासच्या परिसरात अगदी पहाटेपासून उडणारे फटाके दिवाळी चालू झाल्याची वर्दी देत असतात. गेल्या सहा वर्षांपासून मी मस्कत येथे वास्तव्यास आहे. इकडे एकतर दिवाळीची सुट्टी नाही, त्यामुळे जे काही सेलिब्रेशन करायचं ते शुक्रवार-शनिवारच्या वीकांताला. शिवाय इकडे फटाके उडवण्यावर बंदी असल्याने दिवाळीचा म्हणावा तसा 'माहोल' नसतो.
मिसळपाव