Skip to main content

आयुबोवेन रत्नद्वीप -- भाग ८

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शनिवार, 01/12/2018 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी सुद्धा लवकरच जाग आली. काल संध्याकाळी स्विमिंग पूलमध्ये पोहणे झाले असल्याने आज समुद्रात पोहायला जाण्याचा कार्यक्रम होता. त्याप्रमाणे झटपट तयार होऊन समुद्रावर गेलो. आमच्या हॉटेलसारखीच किनाऱ्याला लागून इतरही हॉटेल होती आणि त्यातले पर्यटक समुद्रावर फिरायला किंवा डुंबायला किंवा जॉगिंग ला बाहेर पडलेले दिसत होते.वेळ भरतीची होती आणि समुद्रकिनारा बराच उतरता होता त्यामुळे लाटांचा जोरही जास्त वाटत होता. विशेष करून परतीच्या लाटेला जास्त ओढ होती. त्यामुळे कमरेपेक्षा जास्त पाण्यात जायचे नाही असे आधीच ठरवून टाकले.

बोका ए आझम ओंकार पत्कीची एक्झिट

लेखक प्रास यांनी शुक्रवार, 30/11/2018 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववरच्या श्री गणेश लेखमालेतील लेखाच्या निमित्ताने पहिल्यांना व्यनिमध्ये भेटलास आणि कळलं, आपण एकमेकांपासून एक किलोमीटरहूनही कमी अंतरावर राहतोय. मग काय, आपण दुस-याच दिवशी शिवाजी पार्काजवळच्या गोल्डनमध्ये ऐन गणपती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर गप्पा ठोकायला भेटलो. तेव्हाच कळलं की माझे आजोबा तुझ्या आईचे शिक्षक आणि तुझी आई नि माझी आत्या वर्गमैत्रीणी, आपलं मैत्रही तिथेच पक्क जुळलं. मिसळपाव डाॅट काॅमच्या माध्यमातून जुळलेलं मैत्र पुढे गाढंच होत गेलं. रात्रं रात्रं चालणा-या चर्चा, वाद, गप्पा, तुझ्याकडच्या माहितीच्या खजिन्यामुळे कधीच कंटाळवाण्या झाल्या नाहीत.

भेट

लेखक कविता१९७८ यांनी शुक्रवार, 30/11/2018 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
खरतर हे लिखाण आधीच लिहुन ठेवलं होतं पण बोका — ए — आझमच्या दुखद बातमीने अचानक स्मशान वैराग्य आल्यासारखं झालंय , सतत हे आठवतंय.... भेट... एक ठरवुन न ठरवलेली.... असेल कदाचित ती मागच्या जन्मी ठरलेली, किंवा त्याहुन आधीची... नाहीतर उगाच का माणसे येतात समोरासमोर काहीही लागेबांधे नसताना? उगाच का पहिल्यांदा पाहिल्यावर जन्मोजन्मीची खुण पटते? चेहरा जरी बदलला असला तरीही आत्मा आत्म्याला बरोबर ओळखतो. कुणाला पाहुन आनंद होतो तर कुणाला पाहुन राग येतो. आधी पाहिलेच नाही तर अशा भावनांचं कारणच काय? कदाचित सर्वच आहोत प्रवासी , अनादि काळापासुन , काळाचा फेरा आला की लागतो प्रवासाला.

यूं ही चला चल राही - भाग 2

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 30/11/2018 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
10th November, 2018 दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. आम्ही ४.३० ला उठून तयार होऊन ठरल्याप्रमाणे ५. ३० ला सुमंताचं घर सोडलं. थंडी नसली तरी हवेत थोडा गारवा होता. चिपळूणहून बाजारपेठेतून रस्ता जातो तो डायरेक्ट मुंबई – गोवा हायवेला परशुराम घाटाच्या पायथ्याशी पोचतो. सुमंता आम्हाला तिथपर्यंत सोडायला आला. त्याला बाय करून आम्ही घाट चढायला सुरवात केली. अजूनही सगळीकडे काळोख होता. डोक्यावर हेडलाईट्स होते. सायकलला ब्लिंकर लावलेले होते. तरीही प्रचंड धुके त्या हेडलाईटच्या मध्ये येत होते. हेडलाईट वापरायची सवय नसल्याने रस्त्यातले खड्डे चुकवायला जमत नव्हतं. पण येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमुळे काम भागत होत.

ओंकार पत्की - काही आठवणी....

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 29/11/2018 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
ओंकारवर लेख लिहायला घेतला होता, पण काय लिहू आणि काय नाही असं झालं.... या केवळ त्याच्या आठवतात तशा आठवणी.... त्याची आणि माझी मैत्री गेल्या तीस - बत्तीस वर्षांची. मला आठवतं आम्ही सहावीत असताना तो आमच्या शाळेत आला आणि पहिल्या दिवसापासून असा काही रमला होता की जणू माँटेसरीपासूनच आमच्याबरोबर होता! तेव्हापासूनच तो असा बिनधास्त आणि काहीसा विक्षिप्त होता. पुढे सातवी - आठवी दोन वर्ष आम्ही एका बेंचवर शेजारी बसत असल्याने बडबड केल्यामुळे कित्येकदा एकत्रं शिक्षा भोगली असेल याचा हिशेबच नाही! मला आठवतं सातवीत असताना त्याच्या हात फ्रॅक्चर झाला होता.

बोकाशेठना श्रद्धाजली !!

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 29/11/2018 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर बोका-ए-आझम उर्फ ओंकार पत्की यांना चारेक वर्षांपूर्वी पहिल्यांदा भेटलो. त्यानंतरही कट्ट्यानिमित्ताने वारंवार भेटी होत राह्यल्या, अधुन मधून फोनवरही बोलणं व्हायचं. अगदी पहिल्या भेटीपासून दिलखुलासपणे बोलणारा माणूस. पण आज दुपारची त्यांच्या निधनाची बातमी माझ्यासाठी अगदी अनपेक्षित आली आणि 'मोसाद' ही लेखमालिका डोळ्यासमोर झटकन उभी राह्यली. माझ्यासारखेच इथले बहुतांश मिपाकर त्यांच्या लेखमालिकेचे फॅन आहेत. मोसाद, स्केअरक्रो अशा अनेक उत्कृष्ट लेखमालिकांची मेजवानी त्यांच्या लेखनीतून आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळाली. बोकाशेठना माझ्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !!

बोका-ए-आझमला भावपूर्ण श्रध्दांजली

लेखक गॅरी ट्रुमन यांनी गुरुवार, 29/11/2018 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
बोका गेला. अरे ४२ हे काय जायचे वय होते का?त्याला झालेल्या आजाराविषयी ६-७ महिन्यांपासूनच कल्पना होती आणि त्यातून तो बरा होणे फारच कठिण आहे हे पण माहित होते. तरीही मानवी वेडं मन शेवटपर्यंत हार मानायला तयार होत नाही. अगदी कालपर्यंत वाटत होते की काहीतरी चमत्कार होईल आणि एक दिवस व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर त्याचे मेसेज बघायला मिळतील.