मोहाचा विळखा भाग १/३
जगात सातशे कोटीच्या वर लोकसंख्या गेली आहे. २०० देश आहेत. २०० देशात शेकडो कायदेही आहेत.
पण सातशेकोटीतली सर्व माणसे इथून तिथून मात्र सर्वत्र सारखीच आहेत असे वाटावे अशा घटना कायम
घडत असतात. मोहाचा विळखा घालणार्या पॉन्झी स्किम्स ह्या देखील त्यातल्याच एक.
पॉन्झी स्किम्स व तिच्या देशोदेशीच्या अवतारांबद्दल सांगण्याआधी एक सांगावं वाटतं. ते वाचकांनी पक्कं
डोक्यात कोरुन ठेवावं. कदाचित वेडेपणा वाटेल, हे काय लिहिलंय असे वाटेल. पण नीट वाचा.
फसवणार्यांपेक्षा फसले जाणारे जास्त मोठे गुन्हेगार असतात.; बघा वाटलं ना आश्चर्य? तुम्हाला कधी कोणी फसवलं असेल तर थोडासा रागही आला असेल.
मिसळपाव