Skip to main content

लोकमान्य (राजद्रोह खटला)

लेखक Bhakti यांनी बुधवार, 02/04/2025 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
टिळकांच्या या खटल्यापूर्वीच भारतीय लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक दमनाची प्रशासकीय आणि कायदेशीर चौकट ब्रिटिशांनी उभारून ठेवली होती. जी कुठली घडामोड ब्रिटिशांच्या मते त्यांचे भारतावरील नियंत्रण नाकारू पाहणारी ठरू शकेल, त्यामागील व्यक्तींवर 'राजद्रोहा'चे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढत होते. ब्रिटिश सरकारविषयी तिरस्कार वाढविणारे, त्या सरकारचा अवमान करू पाहणारे किंवा त्या सरकारविषयी अप्रीती निर्माण करू पाहणारे कोणतेही वर्तन 'राजद्रोह' ठरविले जाऊ शकत असे. टिळकांवर हा राजद्रोहाचा आरोप एकंदर तीनदा ठेवला गेला. पहिल्यांदा १८९७ मध्ये, नंतर १९०८ आणि लगेच १९१६ मध्ये. १.

गीतारहस्यचिंतन ४ -आधिभौतिकसुखवाद

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 01/04/2025 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
#गीतारहस्य४ #आधिभौतिकसुखवाद दुःखादुद्विजते सर्वः सर्वस्य सुखमीप्सितम् । मभा. शां. १३९.६१ दुःखाचा सर्वांसच कंटाळा असतो आणि सुख सर्वांसच हवे असते. कोणत्याही कर्माचे केवळ बाह्य फल पाहून नीतीचा व अनीतीचा निर्णय करणाऱ्या पक्षास टिळकांनी 'आधिभौतिक सुखवाद' हे नाव दिले आहे. बाह्य फलाहून नीतीमत्तेचा निर्णय होत असतांना ही सोपी पद्‌धत सोडून त्यासाठी आत्मानात्मविचारांत शिरायची गरजच नाही, हे आधिभौतिक सुखवाद्यांचे म्हणणे. त्यामुळे त्यांच्यासाठी अध्यात्म तर अतिशय निरर्थक गोष्ट आहे.

(पावश्या लवकर आलाच आहे तर.....)

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 31/03/2025 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
हे ताडपत्रीवाल्या, गतसाली न खपलेल्या मालावरची धूळ झटक हे पाणीपुरवठा खात्यातल्या टेंडर बाबू, फिल्टर सफाईच्या निविदांच्या नैवेद्यांची ताटे सजव हे वृक्षसंवर्धन खात्यातील खात्यापित्या लोकसेवका, ट्री ट्रिमिंग च्या निमित्ताने कोणते वृक्ष भुईसपाट करायचे ते बिल्डरांबरोबर ठरव हे नगर सेवका, नालेसफाईच्या हातसफाईवरच्या श्वेतपत्रिकेचा कच्चा खर्डा बनवायला घे हे पालक मंत्र्या, महापुरोत्तर अन् भूस्खलनोत्तर सहसंवेदनांचे वार्षिक भावविभोर सांत्वनसंदेश बनवायला घे हे विदग्ध साहित्यिका, मेघदूताची नव्या अंगाने चिरफाड करणारे तुझे लेख आघाडीच्या वृत्तपत्र पुरवणीत छापून आणायला सेटिंग लाव हे हायबरनेटिंग कविवर्या

ग्रोकबद्दलची किरकिर आणि तरूणांमधील कॅन्सर

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 31/03/2025 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रोकबद्दलची किरकिर आणि तरूणांमधील कॅन्सर ========================= भारतीय समाजात अजुनही ए०आय० बद्दल जी किरकिर चालू आहे, त्यामुळे मी खूप व्यथित झालो आहे. त्यात "ग्रोक" या ए०आय० वर बरेच जण चिखलफेक करत असल्याने मला ग्रोक बद्दल उत्सूकता निर्माण झाली आणि तथ्य शोधायला सुरुवात केली. माझ्या ग्रोक बरोबरच्या संवादात त्याने मला कोणतीच तर्‍हेवाईक उत्तरे दिली नाहीत, पण त्याने केलेल्या "लिटरेचर सर्व्हेने" मी अचंबित झालो. नेमके याच वेळेस माझ्या ओळखीच्या एका डॉ०नी मला एका सेमिनारमध्ये व्याख्यान देणार असल्याचे सांगितले.

रा.स्व.सं.शताब्दी वर्ष अभिनंदन

लेखक बाजीगर यांनी रविवार, 30/03/2025 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
रा.स्व.सं.शताब्दी वर्ष अभिनंदन (1925--2025) हा गुढी पाडवा नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS शताब्दी वर्ष मोदी जी करणार साजरा सहर्ष ।। मरणप्राय,मुर्दाड हिंदूंना डॉ.हेगडेवार यांनी दिला हिंदुत्ववाद ... चाणक्या सारखा केला खानग्रेस शी वाद ।। खानग्रेस ने केली, अनेक वेळा बंदी, राष्ट्रप्रेमी RSS सदैव देशाला वंदी ।। स्वयंसेवक करतात, निःस्वार्थी काम, कामातच ते, शोधतात राम ।। रा.स्व.सं.जगातील ही सर्वात मोठी संघटना, RSS शताब्दी वर्ष ही आहे मोठी घटना ।।

पावश्या लवकर आलाय का......!!!!

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 30/03/2025 06:06 या दिवशी प्रकाशित केले.
gudhi ---- हिंदू नूतन वर्षाच्या मिपाकरांना हार्दिक शुभेछा . ------ चैत्र महिना सुरू होण्यापूर्वीच वैशाख वणवा जाणवू लागलाय.यावर्षी जरा लवकर उन्हाळा आलाय का? संक्रांती नंतर दुपार तापू लागली. होळी येण्या आगोदरच माठ, डेरे, पंखे सुरू झालेत.वातानुकूलित यंत्रांची खरेदी तपासणी, दुरूस्ती सुरू झाली आहे.कागदी लिंबू, काकड्या यांचे भाव कडाडले आहेत.टरबूज, खरबूज बाजारात मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.मार्तंडाने आता पासूनच आग पाखडायला सुरूवात केली आहे.

'भारताच्या ललाटरेषा' -लेखक- शं .रा.देवळे (ऐसी अक्षरे -२४)

लेखक Bhakti यांनी शनिवार, 29/03/2025 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
सिंधूनदी sindhu हिमालयातील मानसरोवर जलाशयातून निघालेला सिंधूचा तो स्रोत तेथून सरळ वायव्येकडे धावत जातो. काश्मीरच्या लद्दाख भागातून हिमालयाला वळसा घालून काराकोरम पर्वताच्या पायथ्याशी जातो. गिलगिटजवळून ही नदी दक्षिणेकडे वळते. तेथे सिंधूला स्वाती नदी येऊन मिळते.

बाजाराचा कल : ३१ मार्चचा आठवडा

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 29/03/2025 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
बाजाराचा कल : ३१ मार्चचा आठवडा ==================== मंडळी, नवीन आर्थिक वर्षाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! या खेपेला युयुत्सुनेट चुकलं की बरोबर ठरलं हे ठरवणं मला अवघड जातंय. कारण मला ज्या पातळीपासून बाजार उलट फिरेल असं वाटत होते, ती पातळी झुगारून २३८६९ ला जाऊन उलट फिरलं (हा उलट फिरण्याचा भाग खरा ठरला कारण युयुत्सुनेटला तेव्हढेच म्ह० पुढची दिशा ओळखायला शिकवले आहे). पण रेंजच्या बाबतीत हुलकावणी दिली. आठवडा अखेरीस बंद होताना आठवड्याच्या ओपन जवळच बाजार बंद झाला आहे. माझ्यामते ही त्रुटी "क्षम्य" आहे कारण पातळीचा अंदाज माझा होता, युयुत्सुनेटचा नव्हता.

सौगात-ए-मोदी

लेखक बाजीगर यांनी गुरुवार, 27/03/2025 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणे सौगात-ए-मोदी भाजपा देणार ईदी !! कमी करण्या हेट, मोदी देणार भेट ।। विरोध रेवडी संस्कृतीला, काय म्हणावे या कृती ला? नको हे लांगुलचालन, आठवा बटेंगे कटेंगे स्लोगन ।। मते मिळणार नाहीत, नाही का तुम्हा माहित ।। करदात्यांचा अपमान, थांबवा फुकट सामान ।।