पुणे मिसळ हॉटेल
स्थळ//पुणे मिसळ हॉटेल..बाहेर पावसाची बुरबुर..
त्याने मस्त मिसळ चापली..चहा घेतला..बिलाचा कागद व बाजुला ठेवलेली छत्री घेवुन तो उठला
व समोरच्या इसमाने त्याला हटकले..
माफ करा आपण माधवराव जोशी का?
नाहि..मी हेमंत देशपांडे..
ओह्ह..मी माधवराव जोशी जी छत्री आपण घेतली ति माझी असुन त्यावर नाव पण लिहिले आहे..
त्यावर खजील होऊन देशपांडेे म्हणाले..ओह्ह माफ करा..तरी प्रष्ण उरतो माझी छ्रत्री कुठे गेली असावी?...
तुम्हि असे करा मनोहर लेले ना विचारा बहुतेक त्यांच्या कडे असावी..मागच्या पावसाळ्यात त्याला दिली होति....
पण आपणास हे सारे कसे माहित???
मिसळपाव