सगळ्या मिपाकरांना नमस्कार ....
मी पुण्यात राहते ... पुढील एक वर्षभरात माझ्या फॅमिली आणि relatives बरोबर परदेशी फिरायला जायचा विचार आहे ... आमचा ९-१० जणांचा ग्रुप असेल ...ह्या यादीमध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, Singapore , Thiland , मलेशिया, बाली ह्यापैकी एक देश निवडून प्रवास करायचा विचार आहे ...USA ला एकटीने प्रवास मी केला आहे पण टुरिस्ट म्हणून नाही ... मध्यंतरीच्या काळात वीणा वर्ल्ड आणि केसरी बद्दल चौकशी केली होती ... दोन्ही टूर कंपनी बद्दल चांगली आणि वाईट अशी दोन्ही मत आहेत ... अर्थात ती तशी असणार हे हि मान्य ...