Skip to main content

सनकी भाग ३

लेखक शब्दांगी यांनी शनिवार, 11/01/2020 08:08 या दिवशी प्रकाशित केले.
शिवीन ठाकूर म्हणजे एक खूप मोठं नाव होत. शिवीन आणि काया दोन ध्रुवच जणू.शिवीन एक मोठ्या बापाचा मुलगा मुंबईतील सगळ्यात मोठया फॅशन हाऊसचा मालक व नावाजलेल्या फॅशन डिझायनरचा मुलगा. त्याच्या वडिलांचे नाव कुणाल ठाकूर त्यांना केटी म्हणून फॅशनच्या दुनियेत ओळखले जायचे. फॅशन हाऊसचे नाव के.टी. फॅशन हाऊस असे होते. शिवीन हा हॅपी गो लकी तरुण होता.

प्रवास एक अनुभव

लेखक शब्दांगी यांनी शनिवार, 11/01/2020 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
निशा , उषा , आसिफा आणि जया चार बाल मैत्रिणींचा ग्रुप सगळ्या जवळ- जवळ पंचेचाळीशीच्या आसपास असतील . सगळ्या आपल्या आयुष्यात बऱ्यापैकी स्थिर झाल्या होत्या . सगळ्यांची मूल मोठी झालेली त्यातल्या काही तर चक्क आज्या सुध्दा झालेल्या . आता संसाराच्या जबाबदारीतून जरा मोकळ्या झाल्या होत्या .मग दर वर्षी ठरवून कुठ तरी फिरायला जात असत .या वेळेस ही असाच बेत ठरला होता . चौघी रेल्वे हायस्कूलमध्ये शिकलेल्या त्या काळाच्या म्हणजेच 1983 -84 च्या प्रथेप्रमाणे कोणाचं सातवीत तर कोणाचं आठवीत , तर कोणाचं नववी तर दहावीत लग्न झालेले .

सुडंबन: (आंघोळ: एक उत्साहवर्धक क्रिया)

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 11/01/2020 05:41 या दिवशी प्रकाशित केले.
सुडंबन: (आंघोळ: एक उत्साहवर्धक क्रिया) मला आंघोळ फार आवडते. अगदी आवडच आहे म्हणा ना! फार म्हणजे फारच. लहाणपणी मी बळजबरी पाण्याच्या लहान टबात बसत असे असे घरचे सांगतात. ते माझ्या अगदीच लहाणपणी असावे. शालेय वयातदेखील मी अगदी थंडीतही सकाळी आंघोळ करूनच शाळेत जात असे. आंघोळीच्या बाबतीतला चटपटीतपणा माझ्या अंगाअंगात मुरलेला आहे. गरम असू दे किंवा गार असू दे, कोणतेही पाणी मला आंघोळीसाठी अन शरीराला मानवते. गरम पाण्यासाठी आता अनेक सोई झालेल्या आहेत.

एपिक चॅनेल वरील एक उल्लेखनीय मालिका

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 10/01/2020 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
एपिक चॅनेल वरील एक उल्लेखनीय मालिका कलियुग - एक आरंभ दिनांक १८ नोव्हेंबर पासून एपिक या चॅनेल वर रात्री ८.३०वाजता "कलयुग - एक आरंभ " या नावाची अतिशय उत्तम मालिका सुरु झाली आहे. मालिका ऍनिमेशन प्रकारात मोडत असली तरी लहानांसोबत मोठ्यांनीही आवर्जून बघावी अशी हि मालिका आहे. उलट मोठ्यांना त्यातले संदर्भ पटकन कळतील. आम्ही देखील जरा उशिराच हि मालिका बघायला सुरवात केली. पण आता मात्र सर्वाना हि मालिका बघण्याची विनंती करतो. महाभारतावर आधारित अशी हि मालिका आपल्याला अनेक विचार करायला भाग पाडते.

कूर्ग डायरीज ४

लेखक अभिरुप यांनी शुक्रवार, 10/01/2020 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
कूर्ग डायरीज ४ दिवस पहिला सूर्य उगवायच्या आतच मला जाग आली. आज कूर्ग मधील आमची ही पहिलीच सकाळ. रात्री छान झोप झाल्याने ताजे तवाने वाटत होते. बाहेर येऊन पहिले तर बाहेरचे दृष्य खूपच विहंगम होते. सगळीकडे अगदी घनदाट धुक्याची चादर ओढली गेली आहे असे वाटावे इतके सुंदर दृष्य होते ते. असे वाटत होते की जणू काही आपण आकाशातील ढगांमध्येच संचार करीत आहोत. हे दृष्य पाहून मुलींना उठवले हा अनुभव घेण्यासाठी. त्याही खूप खुश झाल्या ते धुके पाहून. सर्व विधी आटपून नाश्त्यासाठी रिसॉर्टच्या किचनजवळ आलो. नाश्ता खूपच चविष्ट होता.

भाग १ अंधारछाया धारावाहिक कादंबरी - प्रस्तावना

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 10/01/2020 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
 प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या छायेत अंधार लपलेला असतो. त्याचा शोध घेणारी सत्यघटनांवर आधारित कादंबरी  एक अभिप्राय... आत्मनिवेदनातून फुलत जाणारी कथा वस्तू, बोली भाषेतील वाक्य रचना, सर्व पात्रे रोजच्या घसटीतील असल्या सारखी आहेत. लेखन ‘जसे घडले तसे’ या स्वरूपात आहे. त्यात अतिशयोक्ती वा वातावरण निर्मितीसाठी रंगवून केलेले वर्णन नाही. योग्य गुरूच्या मार्गदर्शनामुळे चिकाटी, दृढ श्रद्धेच्या जोरावर आसुरी शक्तींशी समर्थपणे लढा देता येतो व विजय मिळवता येतो.

मटार ,बटाटा, टोमॅटो

लेखक नूतन यांनी शुक्रवार, 10/01/2020 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
सालाबादप्रमाणे थंडीचा मोसम आला. मुंबईची थंडी म्हणजे औट घटकेचं राज्य ! तेवढीच मजा लुटावी म्हणून बासनातले स्वेटर ,शाली बाहेर काढल्या आणि सकाळी सकाळीच कुठलीही सबब न ऐकता , जरा हट्टानेच , स-पति फेरफटका मारायला बाहेर पडले. मस्त फिरून प्रसन्न मनाने घरी निघालो. एव्हाना ताज्या तजेलदार, नानाविध प्रकारच्या भाज्या हातगाड्यांवर लादून जाणारे विक्रेते ठायी ठायी दिसू लागले होते. आज अंगात जरा जास्तच ऊत्साह संचारला होता. पावलं आपोआपच हिरव्यागार मटारच्या शेंगांच्या ढीगांनी भरलेल्या गाडीसमोर येऊन थांबली.

जिक्रे मीर !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 10/01/2020 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! मधेच एकदम झटका आल्यासारखे मीर तकी मीरच्या "जिक्रेमीर" या पुस्तकाचे मराठीत भाषांतर करायला घेतले आणि पूर्णही केले. थोड्याच दिवसात ते मी छापणार आहे. ज्यांना पाहिजे आहे त्यांनी कृपया प्रतिक्रियेत लिहावे म्हणजे त्या प्रमाणात प्रती छापता येतील. या पुस्तकासाठी लिहिलेले "मनोगत" खाली देत आहे.. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर उर्दूसदृश जी कॅलिग्राफी केली आहे ती आपल्या "आभ्या" ने.

सनकी भाग २

लेखक शब्दांगी यांनी शुक्रवार, 10/01/2020 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
काया जयसिंग हे एक गूढ व्यक्तिमत्त्व. गव्हाळ तरी सावळेपणाची झाक असलेला रंग, गोल चेहरा, पिंगट रंगाचे टपोरे गहिरे डोळे, नाक चाफेकळी , खांद्यापर्यंत रूळणारा स्टेप कट, सडपातळ व सुडौल बांधा, एकूण दिसायला आकर्षक अशी काया. सनकी म्हणून कुप्रसिद्ध असलेली.एका नावाजलेल्या फॅशन हाऊसची मालकीण पण हे नाव ,प्रसिद्धी व यश तिला असच मिळाले नव्हते किंवा ती कोणत्या मोठ्या बापाची मुलगी ही नव्हती तर ती इथपर्यंत तिच्या मेहनतीने पोहोचली होती. काया एका मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगी पण तिला कपड्याचे लहानपणा पासून आकर्षण होते. म्हणून ती बारावी नंतर फॅशन डिझायनिंगकडे वळली.

दोसतार - ३२

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 10/01/2020 07:36 या दिवशी प्रकाशित केले.
डिटेक्टीव्ह घंटाकर्ण बरोबर होता. आम्ही तीघांनीही एकमेकांकडे पाहिले हसलो. हाताची घडी घातली तोंडावर बोट ठेवले. आळी मीळी गुप चिळी करत वर्गाकडे चालू लागलो.
मागील दुवा http://misalpav.com/node/45891 शाळेत कसले ना कसले कार्यक्रम साजरे होतच असतात. त्याला दिन म्हणतात. कधी कसला दिन तर कधी कसली पौर्णिमा कधी कुणाची जयंती . निमीत्त काहिही असो कार्यक्रम ठरलेला असतो. सकाळी गेट जवळच्या मुख्य फलकावर आज काय आहे ते लिहीलेले असते. समजा जयंती वगैरे असेल तर ज्यांची जयंती असेल त्यांचा फोटो, त्याला हार .