फेंगशुई,कासव आणि चिरंजीव
D mart मध्ये खरेदी करत असताना चिरंजीवांची भुणभुण सुरू होती. त्याला एक काचेचे पारदर्शक रंगाचे कासव आवडले होते. ते त्याला खेळायला हवे होते. मी पाहिले, त्या ठिकाणी फेंगशुईच्या अनेक वस्तू ठेवल्या होत्या. त्यातच ते कासवपण होते. मी नाक मुरडूनच तिथून पुढे निघून गेले. माझा अश्या गोष्टींवर विश्वास नाही मात्र नवरोबांचा आहे. घरी आल्यावर सामान भरून ठेवताना पाहते तो काय! चक्क ते कासव सामानाच्या पिशवीत दिसले. मग लक्षात आले,हा उद्योग चिरंजीव आणि त्याच्या पप्पांचा आहे. दोघांनी मला नकळत खरेदी करून ते घरी आणले होते.
मग दोन दिवस ते कासव कुठे ठेवायचे यावर बापलेकांत वाद सुरू होता.
चित्रपट परीक्षण/रिव्यू : 'Tanhaji: The Unsung Warrior'
श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य उभे केले ते चतुराई, कर्तबगारी, खंबीर नेतृत्व, विचाराची कल्पकता, लढाऊपणा, गनिमी कावा, पराकोटीचा पराक्रम, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाख मोलाची स्वराज्या साठी घाम गाळणारी, पराक्रम आणि बलिदान देणारी माणसं त्यांनी जमा केली. त्यापैकी एक होते “नरवीर तानाजी मालुसरे”. हे नाव उच्चारताच फक्त एक नाव आठवते ते म्हणजे सिंहगड. त्यासोबत महाराजांचे प्रसिद्ध विधान आठवते “गड आला पण सिंह गेला”.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे कित्येक मावळे, सरदार, गनिमीकावा तंत्र, विविध आरपारच्या लढाई, किंवा त्यांच्या मोहिमे वर चित्रपट निघू शकतो.
ज्युनियर सिनियर
- डॉ. सुधीर रा. देवरे
इथल्या प्रत्येक कथेतला ज्युनियर वेगवेगळा आहे. एकच नाही. इथल्या प्रत्येक कथेतला सिनियर वेगवेगळा आहे. एकच नाही. म्हणून तर त्यांच्या वागण्याबोलण्याच्या नाना तर्हाक. विविध जीवननिष्ठा असलेल्या ज्युनियर लोकांची किती नावं ठेवायची. म्हणून प्रातिनिधीक एक ज्युनियर. तसेच सिनियरांचेही.
असाच अजून एक ज्युनियर आपल्या साहित्यकुंज रसिक मंडळात नेहमीच जात असतो. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार बसायची बैठक सजवलेली असते. हॉलची समोरची जागा म्हणजे व्यासपीठ. इथे गाद्या टाकलेल्या असतात. गाद्यांच्या समोर सतरंज्या अंथरलेल्या असतात. सतरंजीनंतर उघड्या फरश्या.
मिसळपाव