Skip to main content

'तंबोरा' एक जीवलग - ९

लेखक गौरीबाई गोवेकर नवीन यांनी शुक्रवार, 24/01/2020 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
सारांश काय तर गळ्यात सूर हवा. सच्चा सूर निरागसच असतो. त्याला बळेच निरागस करता येत नाही. त्या गाण्यात त्यांना बहूतेक, 'माझ्या कंठात असा निरागस सूर वसूदेत' असं गणपतीला म्हणायचं असावं. माझ्या गळ्यातला सूर निरागस होवो याला काही अर्थ नाही. म्हणजे आधी लुच्च्या होता तो निरागस होवो. अशक्य. काहीजण अस्सा निरागस सूर आधीच्या भागात सांगितलेल्या सगळ्या गुणवत्तेसकट कंठात घेऊनच जन्माला येतात. याला दैवी नाही तर काय म्हणावे! हे लिहिताना अशा मी काही ऐकलेल्या गवय्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणि सूर कानात गुंजतो आहे. त्या आगोदर मी न ऐकलेल्या पण ज्यांच्या सुराबद्दल ऐकलेल्या गवय्यांबद्दल.

भाग ११ अंधारछाया प्रकरण १० - ‘बगतो थोड दीस. मला चोरी मारी करावीशी वाटतिया! ही फुसकी! काय गज वाकवतीया का कुल्प तोडतीया?

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 24/01/2020 12:27 या दिवशी प्रकाशित केले.

अंधारछाया

दहा मंगला गुरूजींना आलो भेटून सांगलीहून. अजून सत्तेचाळीस माळा व्हायच्या होत्या. गुरूजी म्हणाले, ‘आता तीच करेल जप स्वतः. पाहू काय होतय ते. ही मंतरलेली विभूती देतोय ती फक्त सकाळी लावा. फरक दिसेल. नंतर हे आणि गुरूजी बसले होते बराच वेळ गप्पा मारत. मी बेबीला घेऊन, ब्रेड थोडी भाजीबीजी घेऊन स्टँडवर गेले. हे म्हणाले, ‘लॉर्ड्समधे कटींग वगैरे करून येतो. सावकाश’. बेबी हात पाय धुवून बसली देवासमोर. माळ हातात घेऊन. म्हणाली, ‘करू सुरू माळा? तू आणि मी दोघीही म्हणूया बरोबरच! ‘चला, आज हात धरून म्हणावे लागले नाही म्हणायचे’.

साडेसातीतले वास्तविक उपाय!

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 24/01/2020 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो! आज दिनांक २४/१/२०२० रोजी सकाळी ९.५४ पासून शनी मकर राशीत प्रवेश करेल.याचाच अर्थ असा की वृश्चिक राशीची साडेसाती संपेल आणि कुंभ राशीची साडेसाती सुरु होईल.म्हणजेच एकूणात धनु,मकर,कुंभ या तीन राशींना साडेसाती असेल. साडेसाती आली की सोशल मिडियावर "घाबरुन जाऊ नका.शनीला अभिषेक करा,शनिवार करा अडचणी कमी होतील वगैरे वगैरे त्यात लिहिलेलं आढळेल.एवढंच नाही तर पुढे शनी हा हाडाचा शिक्षक आहे, तो कष्ट देऊन शिकवतो तिथपासून ते आपल्या पूर्वकर्मांची फळेच साडेसातीत मिळत असतात"वगैरे तत्वज्ञान वाटल्याचेही आढळेल. पण वास्तवात असं आहे का?

'तंबोरा' एक जीवलग - ८

लेखक गौरीबाई गोवेकर नवीन यांनी गुरुवार, 23/01/2020 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
आज बर्‍याच दिवसांनी आले इथं. दिवाळी अंकातील माझा लेख तुम्ही सगळ्यांनी भरभरून वाचला, आवडला, हे पाहून बरे वाटले. नंतर काही कारणाने माझी भ्रमंती सुरू होती. ती आतापर्यंत. मग लिहायला जमले नाही. तरी चुकल्याचुकल्यासारखे वाटत होते. हवाही प्रतिकूल पडली होती त्या मुळे प्रकृतीचे आढेवेढे नेहमीचेच त्यातून आताच जरा सावरलेय पुढे लिहिण्याची थोडी उमेद वाटते आहे असो. तालिम सुरू झाली इथपर्यंत लिहिले होते. काही हकिकतीही सांगितल्या होत्या. गाणार्‍याच्या आयुष्यात असे किस्से हकिकती असायच्याच.

भाग १० अंधारछाया प्रकरण ९ - आत्ता पर्यंत मेलेले जर मानगुटीवर बसायचे म्हणाले, तर प्रत्येकाला एक एक तरी घ्यावा लागेल उरावर!

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 23/01/2020 12:27 या दिवशी प्रकाशित केले.

अंधारछाया

नऊ दादा मंगला आत बेबीकडून जप करून घेत होती. पडल्या पडल्या मी विचार करत होतो. आता यापुढे काय होईल? या संबंधी. भूत-पिशाच निकट नहीं आवै । महाबीर जब नाम सुनावै ।। हनुमान चालिसातील चरण आठवला! वाटले की ही भूत पिश्शाच योनी आपण मानतो! एखाद्याचा आत्मा अतृप्त राहिला की त्याची वासनापूर्ती होईतो आत्मा फिरत राहातो अंतरिक्षात. आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो. या जन्माची फळे पुढच्या जन्मात भोगायची असे आपले शास्त्र सांगते. पुर्वीचे बारा जन्म आपण कोण कोण होतो याची स्मृती बहिणाबाई सारखी अडाणी संतबाई ही सांगते! इंग्लंड-अमेरिकेतही लोक आहेत बरेच ते ही आठवतात आपला पुर्वजन्म!

सनकी भाग ७

लेखक शब्दांगी यांनी बुधवार, 22/01/2020 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
काया ऑफिस मध्ये गेली तिने फेंट गुलाबी कलरचा शॉर्ट असा वनपीस घातला होता. तो ड्रेस तिला खुलून दिसत होता. ती कॅबिनमध्ये जाऊन बसली ना बसली तो पर्यंत इंटरकॉम फोन वाजला तिने जरा वैतागुणच तो उचलला. रिसेप्शनिस्टने सांगीतले की रिचा सरनाईक मिटिंगसाठी आलेत मॅडम. कायाने तिला पाठव असे सांगीतले. रिचा नॉक करून कायाच्या कॅबिनमध्ये गेली.काया रिचाला नखशिखांत न्याहाळत होती. रिचाने स्काय ब्लू कलरचा शर्ट व नेव्ही ब्लु कलरचा मिनी स्कर्ट घातला होता. तिचे गोरे पाय अगदी उठून दिसत होते. लांब सडक केस गालावर रूळत होते. तिने केलेला लाईट मेकअप तिचा चेहरा आणखिनच खुलवत होता.

एक उनाड भटकंती (सुरुवात)

लेखक श्वेता२४ यांनी बुधवार, 22/01/2020 17:00 या दिवशी प्रकाशित केले.



आई झाल्यानंतर स्त्रीच्या आयुष्यात अनेक बदल होतात. सर्वात महत्वाचा बदल म्हणजे आलेल्या बाळानुसार आपण आपले सर्व आयुष्य जुळवून घेतो. झोपणे,उठणे, खाणे , पिणे या सर्वांबरोबरच अजुन एक बंधन येते ते फिरण्यावर. कुठेही जायचे म्हणले की, बाळाचा जामानिमा सोबत घेऊन जायचा कंटाळा येतो. शिवाय त्याला अंगावर घेऊन फिरायला लागते त्यामुळे हात दुखतात ते वेगळेच.



बोर्डाची परीक्षा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी बुधवार, 22/01/2020 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
बोर्डाची परीक्षा बालकथा - वयोगट मोठा -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मँगो मस्तानी पिताना माझ्या डोळ्यांत पाणीच आलं !... तुम्ही म्हणाल कसं काय ? मँगो मस्तानी तिखट होती का तिचा घोट घेताना ठसका लागतो ? थांबा , तुम्हाला अख्खी स्टोरीच सांगतो. दहावीची प्रिलिम झाली , रिझल्ट लागला आणि मी स्वतःच दचकलो. मला पासष्ठ टक्के पडले होते. फक्त. तसे ऐंशीपर्यंत पडायला हवे होते. तेवढा मी आहे बरं का ! हे झालं माझं . पण आमचे बापूसाहेब !

दोसतार - ३४

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 22/01/2020 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही सगळे शिक्षक होऊन शाळा चालवणार. वैजुच्या सूचनेचे टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत केले. मस्त कल्पना होती. सगळ्यानाच आवडली. कोणी कोणता तास घ्यायचा याच्या सूचना येवू लागल्या. माधुरी गाण्याचा तास घेणार होती. आपी गणीताचा, सुधीर इंग्रजीचा, अजित इतिहासाचा, महेश भौतीक शास्त्राचा. टम्प्याने तर आपण शाळेची तास संपल्या नंतरची घंटा वाजवणार असल्याचे जाहीर केले. शाळा सुटे पर्यंत आठवी ब चा अर्ग त्या दिवशी शाळा चालवणर असल्याचे सर्व शाळाभर झाले होते.
शिक्षक दिन पुढच्या आठवड्यात होता. मुख्याध्यापक सरांनापण ही कल्पना आवडली.