Skip to main content

शतशब्दकथा: अंगरखा

लेखक एस यांनी सोमवार, 04/05/2020 02:53 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा तेच आटपाट नगर होते. तोच राजा होता. तेच दरबारी होते. तीच प्रजा होती. तोच लहानगा होता. आणि पुन्हा तोच जादूचा अंगरखा होता. राजा पुन्हा बाहेर पडला. पुन्हा तो मुलगा ओरडला, "राजा नागडा!" राजा संतापला. परत गेला. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार. तिसऱ्या दिवशीही तसंच. हे आता रोजचंच झालं. पब्लिकला त्याचं काही वाटेनासं झालं. कुजबूज चर्चेत बदलली. चर्चा मोठ्या आवाजात. आंदोलने झाली. उठाव झाले. दडपले गेले. राजा काही बधेना. जादूचा अंगरखा घालून फिरणे सोडेना. कुणाचेच ऐकेना. सूज्ञांनी हात टेकले. लोक दुर्लक्ष करू लागले. एक दिवस राजाला विषाणू डसला. राजा आजारी पडला. व्हेंटिलेटरवर गेला.

दोसतार - ४४

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 04/05/2020 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
टंप्या असा काही बोलला असेल यावर विश्वास त्याचा स्वतःचाही बसणार नाही. पण मुख्याध्यापक सर सांगताहेत म्हणजे तो खरेच तसा बोलला असेल हे नक्की.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46560 शिक्षक दिनाला बक्षीस मिळाले म्हणून आईला काय आनंद झाला. तीने मीठ मोहरी ने माझी दृष्टच काढली. मुद्दाम उतरवून टाकलेली मीठ मोहरी चुलीत टाकली. मीठ मोहरी उतरवून टाकणे म्हणजे काय ते कधीच समजत नाही. पण ती उतरून टाकल्या नंतर चुलीत मोहरी तडतडल्याचा जो मस्त वास येतो त्याची सर कशालाच नाही. शिक्षक दिन होऊन गेला . पण तो तिथेच थांबला नाही.

लो.-भी. भाग २

लेखक हृषीकेश पालोदकर यांनी रविवार, 03/05/2020 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
लो.- भी. भाग १ परत मेटलवाडीला जायचा मार्ग पण बंद झाला होता कारण परतीची वाट जास्त गुंतागुंतीची होती. गावातले वाटाडी लोक ज्यावाटेने नेतात ती आपल्याला उमजत नाही. आता उरला एकच पर्याय ...रात्र इथेच काढायची आणि सकाळी वाट शोधून भीमाशंकराचे दर्शन घ्यायचे. त्यात भोळी भावना ही की रात्रीत काही झालच तर भीमाशंकर आहे रक्षणासाठी. नाहीच काही मिळाल तरी सकाळी अनेक गुराखी इथे येतातच,पकडू एखाद्याला. आपण फार जास्त धाडस करतोय असं काही कुणालाच वाटत नव्हते. सर्व काही हसण्या- खिदळण्यात दंग होते. परत एकदा विचार करायला हवा होता नाही का ?