Skip to main content

श्री शेषाद्री स्वामी - संक्षिप्त परिचय

लेखक मूकवाचक यांनी रविवार, 07/06/2020 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
श्री शेषाद्री स्वामी हे रमण महर्षींना समकालिन असलेले सिद्ध सांप्रदायिक सत्पुरूष होते. रमण महर्षी आणि स्वामींमधे सर्वसामान्यपणे सत्पुरूषांमधे असते तसेच आंतरिक जिव्हाळ्याचे आणि परस्पर आदराचे नाते होते. शेषाद्री स्वामींविषयी उल्लेख केला नाही तर महर्षींच्या चरित्राला पूर्णत्व येत नाही. महर्षींच्या आयुष्यात त्यांच्या भूमिकेला एक अनन्यसाधारण असे महत्व होते. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी सर्वसंगपरित्याग करून रमण महर्षी अरूणाचलाच्या आश्रयाला आले.

लोकडाउन सुरु आहे - भाग अंतिम - ते अतरंगी किस्से १

लेखक श्रीकांतहरणे यांनी रविवार, 07/06/2020 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या अतरंगी स्वभावामुळ अन आमच्या अजब गजब कारनाम्यां मुळ, आमी लवकरच कॉलेज कॅम्पसमध्ये फेमस झालो होतो. मित्र ही आता लय वाढले होते. राहुल्या, दिसाले एक्दम शांत, पण एकदा सुप्तगुण नाई, त मंग तो अमरावतीकर कसला? टपरीवर पोट्याचा गोळका असला, की आमी तिघ तिथं पोहचाच. मग काय बिनकामाच्या गप्पा मारत, एक, एक कटिंग चा कदी होऊन जाचा समाजातच नसे. हळूहळू आमच्या दोस्त्याच्या डोक्यात प्रकाश पळाले लागला. "अबे!! लेका, हे त फुकटे, कधी चहाले पैसे काढत नाई." झाल आता खरी मजा. आमी टपरीवर आलो, कि यायले चा पाजाचा नाई, अस पोट्टे ठरवूनच असायचे.

बिन स्प्राऊट कोंबडी

लेखक चौकस२१२ यांनी रविवार, 07/06/2020 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: - बिन स्प्राऊट - कोंबडी ( लांबट काप करावे ) - कोरडी तांबडी मिरची - ताजी मोठी तांबडी मिरची ( शक्यतो तिखट नसावी ...) - पातीचा कांदा - लसूण काप - लांबट कापलेला कांदा - काजू - शेंगदाण्याचे तेल - सोया सॉस कोंबडी लसूण आणि थोडे सोया सॉस मध्ये भिजवूं १-२ तास ठेवावे प्रथम मोठ्या वॊक मध्ये मध्यम आचेवर तेल तापवून त्यात कोरड्या मिरची चे तुकडे तळून घावेत व बाजूला काढून ठेवावे ( तेलास मिर्चांचा स्वाद लागेल ) नंतर या तेलात काजू तळून घायवेत व बाजूला काढून ठेवावे, जे थोडे तेल उरले आहे ते हि बाजूला काढावे - आच चांगली मोठी करावी आणि वॊक चांगलाच तापवू द्यावा ..

दोसतार - ४८

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 07/06/2020 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
अशा सहा उदबत्त्यांची एक मोठी माळ करायची. आणि पलंगाखाली ठेवायची. सहव्या उदबत्तीच्या शेवटच्या टोकाला मोठ्ठा दंड्या फटाका वातीला बांधून ठेवायचा. सहावी उदबत्ती शेवटच्या टोकापर्यंत यायला सकाळचे पाच साडेपाच होणार. दंड्या फटाका उडणार. येवढा मोठा दंड्या फटका अगदी पलंगाखाली ढाम्म करून उडाल्यावर कुंभकर्णाला सुद्धा जाग यायला पाहिजे. मागील दुवा http://misalpav.com/node/46878 लवकर उठायचे म्हणून कुंभकर्णाला जाग आणायचा गजर स्वतःसाठीच लावल्यावर झोपी गेलो. आपल्याला सकाळी तानुमामाच्याही अगोदर नक्की जाग येणार . तानुमामा सकाळी काहितरी गम्मत करणार म्हणतोय.

DDLJ

लेखक चिनार यांनी शनिवार, 06/06/2020 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
#दिलवाले_दुल्हनिया_ले_जायेंगे टीव्हीवर डीडीएलजे सुरु आहे. राज (शारक्या) नुकताच युरोप टूर वरून परतला आहे. आपण सिमरनच्या प्रेमात आहोत हे त्याला आता कन्फर्म झालंय. तो स्विमिंग पूलजवळ बसलाय. तेवढ्यात त्याचे वडील अनुपम खेर तिथे येतात. शारक्याच्या हातात 'बीयर'चा टिन देतात. आणि मी शेगावचं दर्शन घेऊन आल्यावर वडील ज्या कॅज्युअलतेने मला, "किती वेळ लागला बे दर्शनाले?" असं विचारायचे त्याच कॅज्युअलतेने ते शारक्याला विचारतात, "लडकी का नाम क्या है?" हातात बीयरचा टिन आणून देणं वगैरे तर कहर आहे. आम्ही शेगावचा प्रसाद वडिलांच्या हातात देताना डाव्या हाताने दिला म्हणूनसुद्धा शिव्या खाल्ल्या आहेत.