पाप आणि पुण्य
- डॉ. सुधीर रा. देवरे
देवाला आपण माणसासारखं उभं केलं. म्हणजे देवाची मूर्ती आपण माणसाच्या रूपासारखी बनवतो. आपल्याच रूपात आपण त्याला पहात आलोत. राग, लोभ, प्रेम, काही प्रमाणात दोषही माणसासारखेच आपण त्याला बहाल केले. माणूस आनंद व्यक्त करतो वा रागावतो तसा देवही प्रसन्न होतो वा कोपतो. याचा अर्थ माणसाच्या रूपातच सर्व देव आहेत. सगळ्या देवांवर आपण माणसासारख्या नाना तर्हा आरोपीत केल्या. काही देवांना आपण आपल्या वासना सुध्दा बहाल केल्या. माणसापासून आपण देवाला खूप दूर जाऊ दिलं नाही.
माणुसकी हे मानवी समाजाचं मूल्य आहे. संस्कृती सोबत अधिक प्रगल्भ होत गेलेलं तत्व म्हणजे माणुसकी.
मिसळपाव