Skip to main content

ठकीशी संवाद : नाटकाचा अनुभव

लेखक मन यांनी बुधवार, 06/08/2025 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडेच (खरं तर काही महिन्यांपूर्वी) ठकीशी संवाद बघण्यात आलं. नाटक बघणे, कळणे ह्यामध्ये आपण पुष्कळच कमी पडत असल्याची जाणीव झाली. त्यास कारण पुढील गोष्टी: 1 नाटकातले सुटे सुटे शब्द कळले. वाक्ये कळली नाहीत. अर्थ नीटसा लागला नाही. 2 दोन चार वर्षे ललित कला केंद्र अन काही वर्षे NSD Delhi अन सोबतीला FTII मधले कोर्सेस केले तर कदाचित नाटक समजलं असतं 3 समांतर नाटकाची अशी एक धाटणी, शैली असते. त्यातली काही लक्षणे ह्यात होती. अगदी ठळक होती. (Luck by chance सिनेमात नायकाचा स्पर्धक, द्वेष्टा ज्या शैलीत वावरतो, ती. किंवा "तुघलक" , "अंधा युग" ही हिंदी नाटके ज्या प्रकारे सादर केली जाणं अपेक्षित आहे ती.

रहें ना रहें हम महका करेंगे... एका गीताचे अनेक प्रतिध्वनी!

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 05/08/2025 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना "ठण्डी हवाएँ लहरा के आए.. " (गायिका लता, चित्रपट नौजवान वर्ष १९५१) गाणं माहिती असेल आणि आवडत असेल. "रहें ना रहें हम, महका करेंगे..." (गायिका लता, चित्रपट ममता, वर्ष १९६६) हेसुद्धा अनेकांचं आवडतं गाणं असेल. त्याशिवाय "सागर किनारे दिल ये पुकारे" (गायिका लता- किशोर, चित्रपट सागर, वर्ष १९८५) हे गाणं तर माहिती असेलच. तसंच "हमें और जीने की चाहत ना होती" (गायिका लता- किशोर, चित्रपट अगर तुम ना होते, वर्ष १९८३) हे माहिती असेलच. पण तुम्हांला हे माहिती नसेल की, ह्या चारही गीतांची चाल एकमेकांशी विलक्षण जुळते!

इतिहास्यास्पद (१) स्वातंत्र्यदिनाची कल्पना

लेखक कुमार जावडेकर यांनी सोमवार, 04/08/2025 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
समजा, मैफिलीची सुरुवात भीमसेन, तानसेन, मेहदी हसन, आमिर खुसरो आणि सुधीर फडके यांनी ‘यमन रागाचे प्रकार’ गाऊन केली तर? आमचा कार्यक्रम संस्मरणीय असण्याचं हे कारण होतं. त्याला खास उपस्थिती होती. नाही तर ‘स्वातंत्र्यदिन’ या विषयावर कार्यक्रम करणं यात आता नवलाई राहिली नाहीये. अगदी तो परदेशात साजरा झाला तरी त्यात विशेष असं काही वाटत नाही आजकाल. पण हे स्थळ अनोळखी होतं. उर्वरित जगाला (म्हणजे आम्ही उपस्थित आणि ‘यम टी.व्ही.’ दर्शकांव्यतिरिक्त कुणाला) हे कळणार नव्हतं. असे उपक्रम कुठे योजले जातात ते आता सांगणं आवश्यक आहे. आमच्याकडे तीन महादरवाजे आहेत. एकावर ‘स्वर्ग’ असं लिहिलंय. दुसऱ्यावर ‘नरक’.

शाप की आशीर्वाद?

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 04/08/2025 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
शाप की आशीर्वाद? ========== -राजीव उपाध्ये ...हा मला मिळालेला शाप की आशीर्वाद माहित नाही, पण त्यामुळे टॉक्सिक लोकांच्याकडून माझ्या प्रगतीत अडथळे खुपच निर्माण झाले आहेत. मला मी विठ्ठल सीताराम गुर्जरांचा पणतू आहे (गुर्जरांची सख्खी बहिण माझी सख्खी पणजी) याचं शाळेत असल्यापासून खुप भारी वाटत असे. ९वीत असतांना मी शाळेच्या वार्षिकात त्यांच्यावर लेख लिहायचे ठरवले आणि आजोबांना (आईच्या वडिलांना) सांगितले. आजोबांनी टुणकन उडी मारून मला सर्व मदत करायचे ठरवले.

Polymathic Aversion Syndrome चे निदान

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 02/08/2025 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
 Polymathic Aversion Syndrome चे निदान या विषयी मार्गदर्शन समजा अ ही व्यक्ती वेगवेगळ्या आवडीच्या विषयात रस घेते आणि जीवन आनंदाने व्यतीत करते. आणि ब ही अ हया व्यक्तीला सर्वज्ञ समजते आणि सतत किरकिर आणि ब चा द्वेष करत राहते ( ब ला अ चे अस्तित्व सहन होत नाही). अ च्या प्रत्येक पोस्ट्वर ब ला काही तरी शिटल्याशिवाय दिवस जात नाही. या विकृतीला वैद्यकीय परिभाषेत **"Polymathic Aversion Syndrome"** असे म्हणता येईल असे वाटते.

दिवाळी अंक २०२५ - आवाहन

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 01/08/2025 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही यंदाच्या मिसळपाव दिवाळी अंकासाठी (२०२५) साहित्य मागवत आहोत. दिवाळी अंकासाठी लेखन पाठवा असे आवाहन लिहिण्यासाठीच फार वेळ घेतला आणि कालापव्यय केला, तर ते प्रकाशित होणार कधी, तुम्ही त्यानंतर लिहिणार कधी आणि ते आमच्यापर्यंत येऊन आम्ही त्यावर किरकोळ संपादकीय संस्कार आणि सजावट करणार कधी? अशा विचाराने मिपाकर सदस्यांसाठी आणि मिपा वाचकांसाठी हे छोटेसे निवेदन प्रकाशित करत आहोत. लेखन युनिकोड टेक्स्ट याच स्वरूपाचे असावे.

किमेरा संशोधन: निसर्गातील ढवळाढवळ?

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 31/07/2025 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
किमेरा संशोधन: निसर्गातील ढवळाढवळ? --राजीव उपाध्ये ए०आय० या तंत्रज्ञानाने जागतिक पातळीवर मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. जी राष्ट्रे अशा तंत्रज्ञानाला लवकर स्वीकारतील त्यांना एकूणच जागतिक वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ’अनफेअर ॲडव्हाण्टेज’ मिळणार हे निश्चित आहे. या तंत्रज्ञानाबरोबरच आणखी एक विज्ञानशाखा चीन सारख्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रांमध्ये वेगाने विकसित पावत आहे. ती म्हणजे कृत्रीम जीवशास्त्र. अलिकडेच वाचनात आलेल्या काही बातम्यावरून असे लक्षात येते की कृत्रीम जीवशास्त्रातील प्रगती काही राष्ट्रांना असाच अमर्याद फायदा मिळवून देईल.

ऑपरेशन सिंदूर: अमेरिकेने पाकिस्तानला दगा दिला

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 30/07/2025 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध शेरखान आणि तवाकी सारखेच आहे. अमेरिकेच्या षड्यंत्रात पाकिस्तान नेहमीच अमेरिकेची मदत करत आला आहे. अफगाणिस्तान वर आक्रमण करण्यासाठी पाकिस्तान ने विमानळे अमेरिकेला उधार दिले होते. सर्वप्रकारची सैन्य मदत ही केली होती. वैश्विक राजनीति मध्ये एक म्हण आहे, अमेरिकेपासून अमेरिकेच्या शत्रूला जेवढा धोका नाही त्यापेक्षा जास्त धोका मित्राला असतो. ऑपरेशन सिंदूर मध्ये ही हे दिसून आले. 9 मेच्या रात्री अमेरिकेच्या उपराष्ट्रपती जे डी वेंस ने भारताच्या पंतप्रधान मोदीजींना सूचना दिली की पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करणार आहे.

नाग पंचमी

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 29/07/2025 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
नाग,साप हे सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे Reptilia क्लासमध्ये जरी येत असले तरी पाण्यात पोहण्याची,श्वास घेण्याची,पाण्यातही अंडे देण्याची क्षमता amphibians प्रमाणे आहे. उत्क्रांतीमध्ये survival of the fittest असं डार्विनने सांगितले आहेच.पण याबाबत जनुकीय माहिती मिळवणं खुपच रोमांचित असते. या सापाने जगण्याच्या लढाईत काय केले मग?