बाहेरील रुपाला आतील विषयाइतकेच महत्त्व
अगदी आताआतापर्यंत अशी समजूत होती की, कसे दिसता यापेक्षा कसे आहात हे महत्त्वाचे आहे. काही प्रमाणात हे खरे आहे. काही प्रमाणात खोटे. खोटे अशाकरता की, आपण सगळे राहतो अशा समाजात ज्यात डोळे आहेत. कोणतीही गोष्ट कशी आहे याची जाणीव होण्यापूर्वी डोळे ती पाहतात. पहिली प्रतिमा डोळ्यात उमटते. म्हणजेच, दिसणे महत्त्वाचे आहे. हे दिसणे छान असेल तर पुढे जाण्याचा निर्णय लवकर होतो.
कोणताही व्यवसाय किंवा कार्याचे क्षेत्र बाहेरून कसे दिसते, यावर त्याचे यश काही प्रमाणात अवलंबून असते. व्यवसाय बाहेरून चांगला दिसत गेला तर त्याच्या यशात कमीतकमी दहा टक्के वाढ नक्की होते.
मिसळपाव