स्मृतींची चाळता पाने --ठाणे आणि नातीगोती
आधीचे भाग
स्मृतींची चाळता पाने --मुक्काम पोस्ट लालबाग
स्मृतींची चाळता पाने -अनगाव
स्मृतींची चाळता पाने -अनगाव 2
जून १९५२ मध्ये आईला नाहूर रोड येथील शाळेत बदली मिळाली व मला मो.ह. विद्यालय ठाणे येथे ८ वि मध्ये प्रवेश मिळाला.
काबो पॅलेस / राजभवन आणि गोव्यातील किल्ल्यांचा आढावा
गोवा म्हणलं, की सगळ्याना आठवतो तो निळाशार समुद्र, चंदेरी वाळू, हिरव्या गर्द माडांच्या गर्दीतून डोकावणारे मंदिरांचे रंगीत कळस आणि चर्चेचे पांढरे मनोरे,मासळीचा स्वाद दुणा...
सरतील कधी शोष शोषितांचे!
खंड पहिला
भाग – २.
तिने सकाळी उठून अंगणात सडा सारवण केले. आंघोळ उरकून तुळशीला पाणी घातले. अजून सगळे घर शांत झोपेत होते. लवकरच म्हशीचे दूध काढायला गडी येईल. नंतर हरकाम्या नोकर, स्वयंपाकाची बाई, एकेक राबता सुरू होईल. बाईने सगळ्यांचा चहा, ताजे दूध शेगडीवर चढवले की मग ती जागे होणाऱ्या मुलाबाळांकडे लक्ष पुरवायला मोकळी. भरलेले सुखी घर होते ते. दोन भाऊ, या दोघी जावा, लहान मोठे मिळून नऊ बाळगोपाल शिवाय त्यांचे आजी आजोबा. ती मोठी जाऊ म्हणून घरातली मुख्य जबाबदारी तिच्यावरच होती. सगळ्यांना तिच्या प्रेमळ अधिकाराची इतकी सवय झाली होती, की तिच्याशिवाय घरातले पान हलत नव्हते. धाकटी जाऊ सगळी मदत करायची.
भिक्षां देहि च पार्वति
अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे ।
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥
माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः ।
बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् ॥
जगदगुरु शंकराचायांनी रचलेल्या अन्नपूर्णा स्तोत्रातील हे शेवटची दोन कडवी. शेवटून का सुरुवात केली असा प्रश्न पडणे साहजिक आहे . बाकीच्या १० कडव्यांमध्ये देवीच्या स्वरूपाचं आणि गुणांचं वर्णन केलं आहे.
मी पाहिलंय...
मी पाहिल्यात इच्छा आकांक्षांच्या कळ्या.
उमलताना फुलताना, मस्त बहरताना.
काहींना झाडावरच कोमेजताना.
काहींना निर्माल्य होताना.
मी पाहिलेत निर्धाराचे पाषाण.
अविचल स्तब्ध असताना.
प्रयत्नांचे घण चिकाटीने सोसतांना.
मूर्ती बनून श्रद्धास्थानी बसताना.
मी पाहिलंय सदा भुकेल्या अहंकाराला.
अधाशीपणे सुख उपभोगताना.
कधी सोयीस्कर मस्तक झुकवताना.
कधी दैवाकडे जोगवा मागताना.
मी पाहिलेत बुद्धीचे गगनचुंबी मनोरे.
अंतराळाला गवसणी घालताना.
हव्व्यासाच्या नादी लागताना.
जमिनीशी नातं तोडून टाकताना.
मी पाहिलेत प्रतिभेचे सूर्य.
संपदेचं तेज उत्सर्जताना.
काही उगवताना, आकाशात तळपताना.
काही आळसाच्या अंधारात मावळुन हरवताना.
सरतील कधी शोष शोषितांचे!
एक दीर्घकथा सुरू करीत आहे. हजारो वर्षांच्या कालपटावर ही घडली आहे, व पुढे घडणार आहे. माणसे बदलतील, स्थलकाल बदलतील.. पण माणूस बदलणार नाही.. नक्की? बघूयात..
भाग - १ उपोद्घात
कोणास ठाऊक, कदाचित विधात्यानेच घडविले असेल. डार्विनने शब्दांत मांडले येवढेच. प्राणीजातिलाच कशाला बदनाम करायचे? निसर्ग सुद्धा टिकू न शकणारे मोडून तोडून नवी निर्मिती घडवित असतो. जमिन प्रबळ आहे तोवर घट्टपणे मांड टाकून खदखदत्या अंगाराच्या छाताडावर बसून राहते. पण ती जरा कमी पडली की ज्वालामुखी तिच्या चिथड्या करून अग्नीलोळांचे राज्य तिथे स्थापन करतो. मैलोंमैल वाहणाऱ्या नदीला सागर पूर्णपणे गिळून स्वाहा करतो.
आरसा
झालं गेलं गंगेला मिळालं,
विचार करू नये फारसा.
बाकी सगळे ऐकतात हो,
पण ऐकत नाही तो फक्त आरसा.
आरशाची एक मोठी गंमत असते,
त्यात पाहिल्यावाचून राहवत नाही.
प्रतिबिंब नव्हे प्रखर सत्य ते,
अधिक काळ पाहवत नाही.
आरशावर का चिडू मी,
तो थोडीच आठवणी साठवत होता.
पण त्याच्या कडे पाहताना नेहेमी,
मला माझा भूतकाळ आठवत होता.
हल्ली आरशात मी बघतच नाही,
कारण मग नंतर मन रमतच नाही.
आता कल्पनेतच जगीन म्हणतो,
सत्याला सामोरं जाणं जमतच नाही.
आरशापासून पळत होतो,
माझ्या सावलीला हसताना पाहून हबकलो.
"स्वतःपासून कुठे पाळतोयस?"
ऐकून ती व मी जागीच थबकलो.
मामलेदार नावाचं गारूड
काल मामलेदार मिसळ चे जनक गेले आणि प्रकर्षाने तात्याची आठवण झाली. ज्या संकेतस्थळाचं नाव मिसळपाव आहे त्यावर मामलेदार मिसळ विषयी काही तरी लिहावे अशी अतीव इच्छा झाली.
या संकेतस्थळाचा जनक तात्या अभ्यंकर आणि मामलेदार मिसळ म्हणजे तात्याचा जीव की प्राण.
बाहेरून आलेल्या कुण्या जालमित्राला मामलेदार ला घेऊन जाणं हा तात्याचा छंदच.
काल लक्ष्मण शेठ गेले आणि सर्व प्रसारमाध्यमांनी त्याची आवर्जून दखल घेतली, खास करून व्हॉट्स ॲप वर अनेकांनी मामलेदार मिसळ वर भरभरून लिहिलं. मामलेदार मिसळ ही ठाणे शहराची एक ओळखच.
आमंत्रण हे त्याचं जरा कौटुंबिक सामाजिक रूप.
गोव्याचा इतिहास भाग -२ ( शिवोत्तर काल )
संभाजी राजांचा उदय
मराठी राज्याचा पाया घालणारा स्वातंत्र्यसुर्य ३ एप्रिल १६८० ला अस्तंगत झाला. पोर्तुगीजाना महाराजांची एवढी भीती होती की त्यानी महाराजांच्या ताब्यात असलेल्या मुलखावर कधीही सरळ हल्ला चढवला नाही. कोकण आणि गोव्यातल्या नद्या, जंगलं, दर्या, डोंगरांनी भरलेल्या दुर्गम प्रदेशात महाराजांचे गनिमी काव्याचे तंत्र अतिशय यशस्वी ठरले. त्याना थोडा अवधी मिळाला असता तर त्यांनी पोर्तुगीजांना गोव्यातून उखडून काढलं असतं हे निश्चित.
मिसळपाव