स्वराज्याचा लढा आणि पुरंदरचा तिढा ! ( भाग १)
अश्विन महिन्यातील एक प्रसन्न सकाळ उजाडली. नुकताच वर्षाकाळ संपला होता आणि बंगलोर प्रांतीचा सर्वात मोठा सण दसराही थाटामाटात साजरा झाला. बेंगलोरच्या भुईकोटाला आणि शहाजी राजांना बर्याच काळांनी स्थैर्य मिळाले होते. वेशीच्या दरवाज्यातून एक ताफा बाहेर पड्ला आणि उत्तरेच्या दिशेने निघाला. या ताफ्यात हत्ती, घोडे,अमात्य, अध्यापक सारेजण होते. दोन मेणेही होते. एका हत्तीवर बारा वर्षाचा एक तरणाबांड तेजस्वी युवक बसला होता. एका मेण्यात त्याच्या मातोश्री तर दुसर्या मेण्यात पत्नी होती. हा ताफा होता बेंगलोर प्रांतीचे राजे शहाजी महाराजांची धर्मपत्नी जिजाउ साहेबांचा.
मिसळपाव
शके १७३९ च्या मार्गशीर्ष व. ९ रोजी कोरेगांव येथे इंग्रज आणि मराठे यांचा संग्राम झाला.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून मराठेशााहिस अनिष्ट अशी ग्रहदशा सुरू झाली होती.
शके १७८३ च्या मार्गशीर्ष व. ८ रोजी प्रसिद्ध हिंदु विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांचा जन्म झाला.
यांचे मूळ घराणे मालव प्रांतांतील. माळवा सोडल्यानंतर प्रयाग क्षेत्री या धराण्याने आपले आस्तित्व कायम केलें.
मार्गशीर्ष व. ७ ला श्रीहनुमान रावणाच्या लंकेमध्ये असणाऱ्या सीतेचा शोध लावून परत रामरायापाशी आले आणि त्यांनी सर्व वृत्तांत निवेदन केला.
लंकेंत रावणाच्या अंतःपुरांत असणाऱ्या अशोकवनांतील सीतेचा शोध मोठ्या युक्तीने हनुमानाने लावला आणि तिला रामाची सर्व हकीकत सांगितली. रामास सांगण्यासाठी तिचाहि निरोप घेतला.