पिन (लेडीज स्पेशल)
पिन
आम्ही बायकांनी कितीही ठरवलं तरी पिनशिवाय आमच पान हलत नाही.
पिन म्हणाल की डोळ्यासमोर अनेक प्रकार उभे राहतात.सेफ्टी पिन,टिक टोक पिन,डोक्याची पिन,साडी पिन.
घरी किती जरी पिनांचा साठा असला तरी लग्न समारंभाला एक जरी वेळेवर सापडेल तर शपथ!मग मागामाग सुरु होते.आणि जिच्याकडे पर्स उघडल्यावर जास्त साठा असेल आणि जी सर्वाना पिन पुरवते ती सर्वात श्रीमंत बाई असते.
काय आहे तुझ्या ...माझ्यात ???
काय आहे तुझ्या ....माझ्यात
मैत्री,आपुलकी की अजुन काही?
माझ्या जे मनात असतं ते तुझ्या बोलण्यातुन जाणवतं..
तुला जे करावसं वाटतं ते माझ्या कृृतीतून
झळकतं..
काहीतरी पुर्वजन्मीचं नातं असावं
आपल्यात ..
नाहीतर उगाच का इतकी ओढ आहे ....
तुला माझी अन् मला तुझी ...
खरचं .....ए....मागच्या जन्मी कोण असेल मी तुझी ??
सखी,सोबतीण की अजुन कोणी??
एक परिंदा..
एक परिंदा..
(प्रेरणा: "उडतं पाखरू" by Tejal Krishnakumar Raut )
(ही कथा वाचण्याआधी तेजलची कथा वाचावी म्हणजे व्यवस्थित संदर्भ मिळेल. लिंक खाली दिली आहे.)
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10157613613946232&id=688691…
कॉम्प्युटरच्या नादात आपल्याला कॉलेजला उशीर होतोय हे राहुलच्या लक्षात येईपर्यंत घड्याळात पावणेदहा वाजले होते. साडेदहाचं पहिलं लेक्चर असतं. त्याच्याआधी तिला गाठायचं म्हणजे सव्वादहापर्यंत कॉलेजमध्ये पोहोचायला हवं. राहुल धावतच रूमच्या बाहेर येऊन बाथरुमकडे पळाला.
हाय काय अन् नाय काय!
मला चांगलंच ठाऊकाये, की चित्रबित्र मला बिल्कुलच काढता येत नाही. पण तरीही..
एकदा मी तुझं चित्र काढणार आहे. बघंच तू.
सोप्पं तर आहे. हाय काय अन् नाय काय!
आधी दहाचा आकडा काढेन. हं पण त्यातला एक जरा पसरटच.
का म्हंजे काय? तुझ्या कपाळावरच्या इतक्या सगळ्या आठ्या मावायला नकोत का?
आणि त्यावरचा शुन्य थोडा चपटा, मला चिडवतानाचा तुझा मिश्किलपणा पुरेपूर भरलेला.
नाकाच्या जागी आठाची तिरकी रेषा काढताना हात जरा मी मोकळाच सोडेन. कित्ती कित्ती तिरकेपणा तो? कळायला नको?
यारों मैने पंगा ले लिया...
यारों मैने पंगा ले लिया...
पेरणा चिनारसेठ चा हा लेख वाचून मलाही माझ्या मनात खोलवर दडून बसलेल्या गाण्याविषयी लिहावे असे वाटले आमचे परममित्र चिनारशेठ किंवा इतर कोणत्याही रसिकाच्या भावना दुखावण्याचा आमचा कदापी उद्देश नाही अनेक वर्षांपूर्वी घरात नविन टेपरेकॉर्डर आल्यावर मोहम्मद अजिज, साधनाताई, अनुराधा ताई, अलका ताई, कुमारदा, उदित नारायण ह्यांच्या कॅसेट्सही लगोलग आल्या.पेन इकॉनॉमी..
पेन..
कितीही प्रामाणिकपणाचा आव आणला तरी आयुष्यात एका गोष्टीची चोरी आपण सगळ्यांनीच केलीये/अजूनही करतो...
पेन !!!
ह्यात प्रामुख्याने दोन प्रकार येतात,
चोरी केलेला पेन आणि जवळ राहून गेलेला पेन...
आठवणीने वापस केलेला पेन ही कॅटेगरी आता नामशेष झालीये..एवढासा पेन, त्यात काय वापस करायचं?
'चोरी गेलेले पेन' ही एक पॅरालल इकॉनॉमी आहे. ह्यांच व्हॅल्यूएशन रिलायन्सच्या मार्केट कॅपिटल एवढं नक्कीच असेल.हर्षद मेहता सिरीजमध्ये शेयर मार्केट आणि मनी मार्केट ह्यांचा उल्लेख आहे. ह्यांच्याच आसपास, पण न दिसणारं एक पेन मार्केटसुद्धा आहे. प्लॅटफॉर्म नंबर पौने दस सारखं!
आज काय घडले ... पौष शु. ५ तैमूरलंगाची भारतावर स्वारी !
शके १२७० च्या पौष शु. ५ रोजी मनुष्यजातीचा शत्रु म्हणून प्रसिद्ध असलेला तैमूरलंग याने हिंदुस्थानवर स्वारी करून दिल्ली जिकली !
तैमूरलंग जातीने तुर्क असून त्याच्या ठिकाणी तीव्र बुद्धि व अचाट धाडस या गुणांचे वास्तव्य होते. पूर्वायुष्यात अनेक प्रकारच्या संकटांना तोंड देऊन हा ऐश्वर्यास चढला.शनिपीठ दर्शन
आपल्या महाराष्ट्रात देवींची साडेतीन शक्तीपीठं आहेत. तशीच भारतात शनि देवाची पण साडेसात शक्तीपीठं आहेत.
त्यातील साडेतीन शक्तीपीठं स्वतः प्रभु रामचंद्रांनी स्थापन केलेली आहेत.
एक मध्यप्रदेशातलं उज्जैन सोडलं तर बाकी अडीच नाशिक व बीड जिल्ह्यात. आम्ही तीघी मैत्रिणींनी हि अडीच पीठं तरी जाऊन येऊ असं ठरवलं.
तसंही लाॅकडाऊन पासून म्हणजे मार्च 2020 नंतर भटकंती बंदच होती. आताशा सगळं नाॅर्मल होतय हळुहळू तर आपण योग्य काळजी घेऊन जाऊन येऊ असं म्हणून निघालो.
जानेवारी महिना असूनही जास्त थंडी नव्हती. सकाळी सहाला च मोकळ्या रस्त्यांवर आमच्या चक्रधरांनी गाडी सुसाट सोडली.
सर्जेकोट किल्ला , सर्जेकोट बंदर , शिंपला बेट
सर्जेकोट किल्ला , सर्जेकोट बंदर , शिंपला बेट
तीन दिवसाच्या स्वर्गीय कोकणच्या रोडट्रीप मध्ये आज जातोय तिसऱ्या दिवसाच्या प्रवासावर, आज आम्ही जातोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळ असलेल्या सर्जेकोट या गावात. मालवण पासून ९ किलोमीटर असलेलं हे गाव. तळाशील नदी आणि अरबी समुद्राच्यावर संगमावर असलेलं हे गाव . इथे १६६८ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सर्जेकोट किल्ला आहे तसेच सर्जेकोट बंदर , शिंपला बेट , कवडा बेट अशी ठिकाणे पाहायला मिळतात.
सर्जेकोट किल्ला - छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६८ च्या दरम्यान सिंधुदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी ३ किल्ले बांधले, राजकोट , पद्मदुर्ग आणि हा सर्जेकोट.
मिसळपाव