Skip to main content

आज काय घडले... पौष व. १४ सुभाष 'चंद्रा'स ग्रहण?

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 14/02/2021 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
shubhashchandra शके १८६२ च्या पौष व. १४ रोजी वंगभूमीचे सुपुत्र सुभाषचंद्र हे आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्याचा पुकारा सर्व देशभर झाला. १६ जानेवारीपासून मौन धारण करून ते आपल्या खोलीत चिंतनात मग्न झालेले होते. व्याघ्राजिनावर बसून 'गीता', 'चंडी' व इतर धर्मग्रंथांचे पारायण करीत ते संन्यस्त वृत्तीने वागत होते. दि.

आज काय घडले... पौष व. १३ शहाजहान बादशहाचे निधन !

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 14/02/2021 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
shahanjahan शके १५८७ च्या पौष व. १३ रोजी मोगलांचा पांचवा बादशहा शहाजहान याचे निधन झाले. शहाबुद्दीन मुहमद किरान उर्फ शहाजहान हा जहांगीर ऊर्फ सलीमचा जोधपूरच्या राजकन्येपासून झालेला पुत्र होय. सन १६२८ मध्ये हा गादीवर आला.

आज काय घडले... पौष व. ११ न्या. रानडे यांचे निधन

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 14/02/2021 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... पौष व. ११ न्या. रानडे यांचे निधन शके १८२२ च्या पौष व. ११ रोजी हिंदुस्थानांतील सुप्रसिद्ध समाजसुधारक, विख्यात राजकारणी, दूरदृष्टीचे विवेचक व स्वतंत्र भारताचे द्रष्टे न्यायमूर्ति माधव गोविंद रानडे यांचे निधन झाले. राजकीय, सामाजिक, धार्मिक, औद्योगिक, आर्थिक इत्यादि अनेक क्षेत्रांत माधवरावांनी मार्गदर्शन केले. हिंदी अर्थशास्त्राचे ते तर जनकच होते. आयुष्यातील शेवटच्या दिवसांतहि यांचे लक्ष सार्वजनिक कार्यात गुंतून.राहिले होते. लाहोरच्या सामाजिक परिषदेस जातां आले नाही म्हणून यांना मनस्वी वाईट वाटले.

आमचा Valentine Week - मोठी तिची साऊली

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शनिवार, 13/02/2021 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
तीरगी की अपनी ज़िद है जुगनुओं की अपनी ज़िद | ठोकरों की अपनी ज़िद है हौसलों की अपनी ज़िद || - प्रबुद्ध सौरभ महान व्यक्तीला चांगल्या व्यक्तीपासून वेगळं करणारा हा एकमेव गुण - जि़द! एखादी गोष्ट मिळवण्यासाठीचा हट्टीपणा. यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करण्याचा चिवटपणा. यश मिळवण्यासाठी वाटेल ते आव्हान स्वीकारण्याचं धाडस. महान लोकांची एक जमात असते ती संकटांच्या नजरेला नजर भिडवून त्याच्याशी दोन हात करणार्‍यांची. पण काही लोकं तर त्याही पुढे जाऊन आव्हानांसमोर, संकटांसमोर धैर्यानी सोडा.... उर्मटपणानी, माजात उभी राहतात.

अडगळीतला साप (कथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी शनिवार, 13/02/2021 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
अडगळीतला साप (कथा) तसा तो दोन दिवसांपूर्वीच माझ्या नजरेस पडला होता. पण तेव्हा मी त्याकडे दुर्लक्ष केले. त्या रात्रीच्या मंद प्रकशात, मला बहुतेक त्याची शेपटी दिसली असावी. पण मी अर्धवट झोपेच्या अवस्थेत असल्याने, त्याकडे निरखून पाहिले नाही. असेल एखादी दोरी, ती लोंबत असेल अशी बोळवण करून, मी झोपलो होतो. खरेतर सकाळी उठल्यावर, वर पत्र्याकडे पाहणे माझे काम होते. त्या पत्र्याच्या कोपऱ्यावर, रात्री आपण काहीतरी पाहिले होते. तेव्हा ती आपल्याला दोरी वाटली, पण सकाळी उठल्यावर तेथे दोरी असायला हवी होती. पण घाईगडबडीत मी ते सगळे विसरून गेलो. आणि तो तिथेच वरती, त्या पत्र्याच्या अडगळीत, तसाच बसून राहिला होता.

कहानी पूरी फिल्मी हैं!

लेखक चिनार यांनी शनिवार, 13/02/2021 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
फेसबुकवर सिनेमागली नावाचा एक ग्रुप आम्ही चालवतो. त्यावर नुकतीच कहानी पूरी फिल्मी हैं ह्या नावाची स्पर्धा घेतली.. त्यानिमित्ताने लिहिलेलं.. #CinemaGully #कहानी_पूरी_फिल्मी_हैं "राजहंसाचे चालणे जगी झालेया शहाणे, म्हणून काय कोणी चालूच नये की काय!" ह्याच चालीवर आम्ही म्हणतो, 'राज अन राहूलचे तराने, ऐकले कितीदा जगाने! म्हणून आमचे गाऱ्हाणे, ऐकूच नये की काय! परमेश्वराने अफाट न्यूनगंड, अमाप वेंधळेपणा आणि अनंत निर्लज्जपणा देऊन जे फार कमी नमूने पृथ्वीवर पाठवले त्यापैकी आम्ही एक! आम्ही नव्हतो राजसारखे स्मार्ट, प्रेमसारखे लोभस अन राहूलसारखे आगाऊ!

गावाकडच्या गोष्टी : २

लेखक साहना यांनी शनिवार, 13/02/2021 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
गावांत देवळे खूप पण चांगले चारित्र्य असलेले आणि शुचिर्भूतपणा सांभाळून असणारे भटजी कमी अशी स्थिती झाली आणि दुष्काळांत तेरावा महिना प्रमाणे गावांतील अत्यंत आदरणीय आणि गुरुतुल्य भटजी श्री जोशी बुवा ह्यांचे निधन झाले. जोशीबुआंचे सुपुत्र अतिशय धार्मिक असले तरी विश्व हिंदू परिषदेची मोठी जबाबदारी घेऊन ते उत्तर भारतांत फिरत असत त्यामुळे देवळांतील पुढचा भटजी कोण असा प्रसंग निर्माण झाला. देवळाच्या कमिटीने भरपूर विचार करून शेवटी काही नावे शॉर्टलिस्ट केली आणि मग एका भटजीला नियुक्त केले. ह्या भटजींचे नाव वामन भटजी आणि नावाप्रमाणेच मूर्ती खूपच लहान होती. ह्यांची पत्नी आणि दोन मुली गावांत आल्या.

गावाच्या गोष्टी : १

लेखक साहना यांनी शनिवार, 13/02/2021 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
थिएटर हा प्रकार लहानपणी खूप पॉप्युलर होता. कष्टकरी समाज आठवड्याला एक तरी चित्रपट पाहायचा. आमच्या घरी टीव्ही असल्याने आम्हाला मनोरंजनाची साधने होती पण थेटर मध्ये जाऊन चित्रपट मी लहानपणी असा पहिलाच नव्हता. पहिले कारण म्हणजे थेटर दूर होते आणि तिथे जाण्यासाठी वाहन वगैरे करून जावे लागत असे. त्याशिवाय तो भाग शहराचा एकट्या दुकटीने किंवा इतर मुलांबरोबर जावा असाही नव्हता. आणि चित्रपटासाठी गर्दी असायची आणि हि गर्दी बहुतेक करून कष्टकरी लोकांची असायची. आठवडाभर कुठेतरी शारीरिक कष्टाची कामे करून आता मनोरंजनासाठी आलेली हि मंडळी. त्यांच्या घोळक्यांत मिक्स होणे आमच्या घराच्या लोकांना विशेष प्रिय नव्हते.

प्रवास (भाग 7)

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 12/02/2021 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास भाग 7 "काय वाटतं पवार... काय रहस्य असणार या वाड्याचं?" वाड्याच्या दिशेने निघाल्या नंतर राठींनी पावरला विचारलं. पवार देखील तोच विचार करत होता. रस्त्यावरची नजर ढळू न देता तो बोलायला लागला;"साहेब, काही कळत नाही. तो आनंद एकटा आला नव्हता हे नक्की. त्याच्या गाडीतल्या सॅक्स वरूनच ते कळतं. त्यात गर्ल फ्रेंड असताना थर्टीफस्टला कोणी एकटं का येईल? पण पाच जण होते... म्हणजे एकटं जोडपं नाही. याचा अर्थ जोडप्यामध्ये होणारी भांडणं झालेली नाहीत. मग मित्र कोण होते? सिनेमावाले असतील की अजून कोणी? दिनू म्हणाला कोणीतरी मुलगी... याचा अर्थ आनंदची मैत्रीण सिनेमावाली नाही. नाहीतर दिनूने ओळखली असतीचं.