सुरस आणि चमत्कारिक
ग्रीष्माच्या उग्र सहस्त्ररश्मींनी रुक्ष झालेल्या हिरण्यगर्भा मेदिनीला पर्जन्यधारांच्या सुखद आगमनाची चाहूल लागली होती. नैऋत्येकडून वाहणार्या शीतलक वातलहरी अधिकाधिक प्रबल होऊ लागल्या होत्या. राजमहालाच्या प्रवेशद्वारांवर आणि गवाक्षांवर असलेली कलाबतूपूर्ण रेशीमवस्त्रे वारंवार विचलित होत होती आणि महालातील सुवर्णदीपांमधील दीपशिखा पवनलुप्त होतात की काय असेच वाटत होते.
निशापती महाराजांनी आपल्या हातातील द्राक्षफलांच्या गुच्छातील अखेरचे पुष्ट रसाळ फळ आपल्या ओष्ठांनीच अलग केले. त्यांच्या दंतपंक्तींची आणि कंठमण्याची सूक्ष्म हालचाल झाली.
मिसळपाव