Skip to main content

दिवाळी अंक 2020

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 11/03/2021 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
1992 पासून मी दरवर्षी दिवाळी अंक विकत घेतो. सुरूवातीला काही वर्षे, म्हणजे साधारण 2006 पर्यंत, हवे असलेले सगळे अंक लगेच विकत घेत होतो, पण 2006-07 च्या सुमारास समजले की, डोंबिवली येथे मार्च-एप्रिल मध्ये, हेच दिवाळी अंक, कमी पैशांत मिळतात. त्यामुळे, 2-3 वाचनालयातून हे अंक गोळा करतो. नमनाला, इतके तेल भरपूर झाले. आता मुळ मुद्द्याकडे येतो.... ह्यावर्षी खालील अंक घेतले 1. उत्तमकथा 2. आवाज, पाटकर 3. साप्ताहिक सकाळ 4. लोकमत, दीपोत्सव 5. दीपावली 6. लोकसत्ता 7. जत्रा, मेनका प्रकाशन 8. जत्रा, महाराष्ट्राची 9. किस्त्रीम 10. धनंजय 11. मौज 12. माहेर 13. ऋतुरंग 14. मोहिनी 15. पद्मगंधा 16.

नाईंटीन नाईन्टी - सचिन कुंडलकर

लेखक मालविका यांनी बुधवार, 10/03/2021 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सचिन कुंडलकर यांचं नाईंटीन नाईन्टी हे पुस्तक वाचून पूर्ण केलं. पुस्तक खूपच छान आहे. मीही त्याच काळातील असल्याने या पुस्तकाशी पटकन नातं जोडलं गेलं. यातल्या बऱ्याच गोष्टी एकदम माझ्या मनातल्या आहेत असच वाटलं. काही गोष्टी निःश्चित खटकल्या. पण सगळ्याच बाबतीतआपलं कुणाशी जमू शकत नाही, तसंच काहीस आहे हे. लेखकाने मांडलेल्या सगळ्याच मतांशी आपण पूर्णपणे सहमत होऊ शकत नाही. काही गोष्टी फार टोकाच्या वाटल्या तर काही एकदम मनमोकळ्या आणि जुळणाऱ्या वाटल्या. चित्रपट दिग्दर्शक असल्याने बरेचसे संदर्भ चित्रपटाच्या अनुषंगाने येतात.

१. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : तमिळ अस्मितेचे उद्गाते ?

लेखक चौथा कोनाडा यांनी बुधवार, 10/03/2021 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
चेन्नईच्या मरीना बीचला भटकणं एक विलक्षण अनुभव असतो. चेन्नईला कामानिमित्त राहायला असताना बऱ्याचदा या बीचवर जाणं झालं. चेन्नईकर व पर्यटक यांच्या गर्दीने बीच कायमचा गजबजलेला असतो. १०-१२ किमीची लांबलचक पुळण प्रचंड गर्दीला सामावून घेत असते. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स, छोट्या मोठ्या जत्रा, पर्यटकांचे जत्थे, खेळणारी मुले यामुळे इथलं दृश्य रमणीय असतं. इथं येऊन नुसतं इकडं-तिकडं बघत बसण्यातही भन्नाट टाईमपास होतो.

गुरुदेवांना श्रध्दान्जली

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 09/03/2021 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचा अस्त जणू माझ्या आठवणींचा उदय मी आणि माझ्या आठवणी रंगत जाते महफील नूरानी घेर वाढता अंधाराचा हळूच येते अश्रू घेऊनि कैक आठवणी ताज्या अजुनी पुन्हा परतती नव्या होऊनि वेळेचा मग मी माग काढतो आठवणींवर स्वार होऊनि पुन्हा निराशा हाती येते अश्रुंचे बहू मोल देउनी कधी तिमिर मज सखा भासतो तरीही स्वतःशी एकटा हसतो नेहेमीप्रमाणे तो पुन्हा उगवतो आठणींचा पुन्हा अस्त होतो

मामाच्या गावच्या आठवणी

लेखक सत्य धर्म यांनी मंगळवार, 09/03/2021 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
झुक झुक झुक झुक आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया. सकाळी सकाळी मुलीने मोबाइलला हे गाणे लावले आणि डोळयांपुढे मामाचा गाव उभा राहिला. माझ्या लहानपणी माझ्या मामाचे गाव म्हणजे माज्यासाठी जणु स्वर्गच होता. उन्हाळ्याची सुट्टी, गणपती आणि दिवाळीची सुट्टी याची मी चातकाप्रमाणे वाट पाहत राही. मामाच्या गावावरून आल्यानंतर माझ्या मित्रांमध्ये तिथले वर्णन आठवडाभर चालत राही. माझ्या मामाचे गाव म्हणजे रहिमतपूर असं म्हणतात कि अफझल खानचा सरदार रहिमतखान याच्या नावावरून याला रहिमपूर नाव पडले.

दातही होते, दाणेही होते...

लेखक आजी यांनी मंगळवार, 09/03/2021 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी रेडियोवर नोकरी करत असतानाची गोष्ट. मी माॅर्निंग ड्यूटी करत होते. मी पहाटे चार वाजता उठले. माझं आवरलं. सासूबाईंना बाय करुन आणि झोपलेल्या मुलाचं पांघरूण नीट करुन, पावणेपाचला मी माझी कायनेटिक सुरू केली. अर्ध्या रस्त्यात आले आणि लक्षात आलं की डबा घरीच राहिलाय. परत जाणं शक्य नव्हतं. साडेपाचला ट्रान्समिशन ओपन होणार होतं. त्याआधी मटेरियल चेक करायचं होतं. मी कायनेटिक चा स्पीड वाढवला आणि ऑफिसला पोहोचले. कामाला सुरुवात केली. फक्त एक कप चहा पिऊन मी घरातून निघालेली होते. खूप काम होतं. सकाळी नऊ वाजता कोपऱ्यावरच्या चहावाल्याकडून चहा आणि वडापाव मागवला. प्यून सांगत आला चहा तयार होता.

चेरी इन द ब्रेड

लेखक शब्दानुज यांनी मंगळवार, 09/03/2021 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळची वेळ. घरातले दुध संपल्यामूळे मी दूध पिशवी आणायला शेजारच्या बेकरीकडे निघालो. जाताना " मी पन येणार!" अशी गर्जना सुपुत्राने केली. अशा गर्जनेनंतर आमाच्या सुपुत्राला नेणे भागच पडते. दुकानात सुपुत्र विस्फारलेल्या डोळ्यांनी आजूबाजूला पहात होतेच "पप्पा , ते काय आहे ? " चेरीच्या एका पाकीटाकडे बोट दाखवत माझा मुलगा विचारता झाला. " अरे चेरी आाहे ती. ब्रेड खाताना तू वेगळी काढून खात नाही का ? तीच ती. " मी उत्तरलो. " पण पप्पा ती तर ब्रेडमद्धे तयार होती ना ? आणि तीपण कशीबशी सापडते. या काकांना कितीतरी ब्रेड पॅकेट मधून ती चेरी काढली असणार ना ?

महिलादिन

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 08/03/2021 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
हे वेगवेगळे दिन थोतांड वाटतात, पटत नाही, जर प्रकृती पुरुष एकमेकांना पुरक मग एकाचाच उदोउदो का। माणसाने माणसा सारखे वागावे एवढीच अपेक्षा महिलादिन दाखवण्याचे दात वेगळे जगण्याची ऱीत आगळी जागतीक महिलादिनी मोजा किती आसवं गळली किती चढल्या बोहल्यावरी किती ठरल्या हुंडाबळी असल्या कसल्या रितीभाती कधी तुडवे पायतळी तर कधी घेई डोईवरी सारे दिवस थोतांड उद्दमींचे कुभांड तुबंडी भरण्यासाठी एक दिवसांचे खोटे पण नको दिन नको सण रावा माणसागत सारे नको उत्सव दिनांचा मला माझी जागा द्यारे...... ८-३-२०२१
काव्यरस