Skip to main content

म्युच्युअल फंड आणि शेअर्स काही निरिक्षणे

लेखक मनिष यांनी बुधवार, 08/10/2008 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या पोर्टफोलीओ आज (घाबरत, घाबरत) बघितला त्यावर आधारीत काही निरीक्षणे - जेव्हा सेन्सेक्स २१००० होता, तेव्हा मला जवळजवळ ४५-५०% नफा होता शेअर्स मधे तर म्युच्युअल फंडात ३५% नफा होता. आज सेन्सेक्स 10800 आहे तेव्हा मला शेअर्स मधे ५०-५५% तोटा आहे तर म्युच्युअल फंडात २५% तोटा -- त्यातील SBI MAGNUM BALANCED FUND सिप मधे केवळ ८.५% तोटा. माझा निश्चय -- म्युच्युअल फंडात जास्त पैसे टाकणार! शेअर्स मधे फक्त मोजके काही चांगले शेअर्स ह्या तोट्यात उचलणार. तुमचे काय मत आहे?

वाईन क्रीम

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 08/10/2008 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या त्सेंटाआजीच्या आजीची ही 'रेशिपी' लिखाळमंडळी आमच्याकडे आले असताना केली होती.तेव्हा चवीसाठी त्यांच्याकडे विचारणा करा,:)
साहित्य - ५०० मिली व्हाइट वाइन, १०० ग्राम ( साधारण १ वाटी भरुन) साखर, एका लिंबाचा रस, १ चिमूट मीठ, २ अंडी, २ चमचे मोंडामिन किवा आरारुट किवा स्टार्च कृती - लिंबाचा रस काढणे. मोंडामिन थोड्या पाण्यात विरघळवून घेणे.गुठळ्या झाल्या तर त्या मोडणे.त्यात चिमूटभर मीठ घालणे.

हे असं का होतंय?

लेखक सरपंच यांनी बुधवार, 08/10/2008 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सर्वात आधी आज मिसळपावच्या सेवादात्याच्या खंडीत सेवेमुळे तुम्हा सर्वांना झालेल्या त्रासाबद्दल मिसळपाव तर्फे दिलगिरी व्यक्त करतो. मिसळपाव दिवसागणीक वाढतं आहे. रोज नवीन सदस्य येत आहेत. आणि हजर असणार्‍या सदस्यांची संख्या सुध्दा वाढती आहे. सध्या खर्‍या अर्थाने सक्रिय असणार्‍या सदस्यांच्या संख्येत दुप्पट किंवा तिप्पट सुध्दा वाढ झाली तरी आपला सेवादात पुरून उरेल एवढी क्षमता आहे. मात्र गेले काही दिवस कधीतरी अचानकच भेट देणार्‍या अतिथींची संख्या खूप वाढते. सेवादात्याला झेपणार नाही एवढ्या मागण्या केल्या जातात. हे नैसर्गीक नाही अशी शंका आहे. असो.

मला भावलेली कविता

लेखक mina यांनी बुधवार, 08/10/2008 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
अजूनही निळया जांभळ्या नदीला आंबेवनाची सावली भेट पहिलीवहिली अकल्पित भेट दुरस्थपणाची गर्भरेशमी क्षणाची सौदामिनीच्या बाणाची देवघेव. गुलबक्षीच्या फुलानी गजबजले कुपण वेचू लागला श्रावण मोरपिसे। ओल्या आभाळाच्या खाली इद्रचापाचे तुकडे तुझा करपाश पडे जीवनास. कधी रेताडीचे रस्ते कधी मोहरली बाग कधी प्रासादास आग कर्पुराच्या। सप्तसुरातुनी गेले माझ्या जीवनाचे गीत तुझ्या सारगीची तात साथ झाली. बर्फवाट शिशिराची आता पुढलिया देशी तुझ्या मिठीची असोशी अजूनही. -कवी कुसुमाग्रज
Taxonomy upgrade extras

अमरवाणी

लेखक घासू यांनी बुधवार, 08/10/2008 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मित्रा॑नो, गेल्या दोन दिवसा॑च्या बातम्या॑मधे सारखे अमरसि॑ग या॑च्याबद्द्ल दाखविण्यात येत आहे. त्या॑नी जी मागणी केली आहे कि, दिल्लीतील एन्काउ॑टर खोट आहे आणी त्याची चौकशी व्हावी त्याला माझा आणी प्रत्येक भारतीयाचा तीव्र निषेध आहे. आज अमरसि॑हाना त्या अतिरेक्याचा पुळका येत असेल पण त्या॑नी केलेल्या त्यात क्रुत्यात जे मरण पावले त्या॑च्या कुटु॑बिया॑च दु:ख अमरसि॑गाना दिसत नसेल. अशा राजकारण्या॑ना उर्फ देशद्रोह्या॑ना भर रस्त्यात उलट टा॑गुन फटकावल॑ पाहीजे. शहिद मोहनच॑द शर्मा या॑च्या कुटु॑बिया॑नी अमरसि॑गानी दिलेली मदत नाकारली त्याबद्द्ल मला त्या॑चा अभिमान आहे.

विनोदी कथा : सळई, साई आणि बाजीगर बीरबल

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 08/10/2008 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना: यात कुठल्याही घडलेल्या घटनेवर टिका करण्याचा तीळमात्र उद्देश नसून, ती घटना प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी ज्या पद्धतीने मांडतात त्यावर टिका करण्याचा हेतू येथे आहे. न्यूज चॅनेलवर खाली पट्ट्या सरकत असतात. त्यावर लिहिलेले असते- थोड्याच वेळात आपण बघणार : 'रॉड आणि गॉड' (सळई आणि साई)..... सळई नाही घेवू शकली जीव..... यमाची सळई, साई माघारी पळवी...... एका माणसाच्या डोक्यातून आरपार गेली सळई..... तो मृत्युला पळवी. ( एक प्रतिनिधी- "श्री आक्रमक बातमीदार" हातात माईक घेवून पळतच येतो.