Skip to main content

नाईट मेअर (गूढकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी बुधवार, 19/05/2021 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
नाईट मेअर (गूढकथा) त्या अरण्यात मी कसा पोहोचलो? हा प्रश्न गौण असला तरी, मी आता प्रचंड जखमी झालोय. अंगावर जागोजागी जखमा झाल्या आहेत. त्यातून सारखे रक्त गळत आहे. आणि मी असाच काही वेळ या अवस्थेत राहिलो तर, मृत्यू मला कधीही गाठेल आणि मी गतप्राण होऊन जाईल, ही वस्तुस्थिती मात्र मला नाकारता येणार नव्हती. मी नुसता धावत आहे. किती वेळ झाला, मला माहित नाही. पण मी सलग धावत आहे. तेही प्रचंड वेगाने. अंगात जेवढे त्राण आहेत, तेवढ्या वेगाने. तो मागचा लांडग्यांचा कळप, मला कधी गाठेल याचा नेम उरला नव्हता. ते मोठ्या धुडाचे दहा- पंधरा लांडगे, कधीही माझा फडशा पाडू शकत होते.

श्री अमृतानुभव अध्याय चौथा- ज्ञानाज्ञानभेदकथन

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 19/05/2021 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
आतां अज्ञानाचेनि मारें । ज्ञान अभेदें वावरें । नीद साधोनि जागरें । नांदिजे जेवीं ॥ ४-१ ॥ जागृती , जागेपणा म्हणजे काय ? झोप नसणे म्हणजेच जागेपणा . निद्रेचा अभाव हीच जागृती ! कित्त्ती सोप्पं आहे हे समजायला . तसेच अज्ञानाचा अभाव हेच ज्ञान ! Absence of delusions is the enlightenment. आता आपण आरशात पहातो तेव्हा आपल्याला आपल्या मुखाचे प्रतिबिंब दिसत असते , मुख दिसत नसते , पण तरीही आपल्याला आपले मुख दिसल्याचा आनंद होत असतो. तसेच ज्ञानाने आपल्याला आपले स्वरुप कळते हे म्हणणे आहे. म्हणजे मुळात आपले स्वरुप इतके शुध्द आहे कि तिथे ज्ञान अज्ञान ही भानगडच नाही.

सध्या मी काय पाहतोय ? भाग ६

लेखक मदनबाण यांनी मंगळवार, 18/05/2021 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी बालपणा पासुन अय्यप्पां चे कार्यक्रम मी पाहत आलो आहे... त्यांची पुजा-अर्चना, उभ्या मांडणीने केलेल्या दिव्यांची आरास आणि समई आणि त्याच्या भवती असलेली फुलांची आरास फारच सुंदर दिसते. पुरुष मंडळी संपूर्ण काळ्या कपड्यात त्यांच्या ठराविक काळात राहतात.

ऑनलाईन कट्टा - शनिवार २२ मे २०२१ रात्री ९.३० (भारतीय वेळ)

लेखक मनो यांनी मंगळवार, 18/05/2021 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावकर श्रीरंग_जोशी यांनी सुचवल्याप्रमाणे ऑनलाईन कट्टा हा झूम ऍप द्वारे करण्याचा प्रयोग या विकांताला करणार आहोत. आत्तापर्यन्त प्रचेतस, भक्ती, श्रीरंग जोशी, चित्रगुप्त यांनी जमेल असे सांगितले आहे, श्री. अरविंद कोल्हटकर याना उद्या मी स्वतः विचारून पाहतो. एकंदरीत वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्वान मंडळींच्या भेटीची ही संधी जरूर साधावी. तांत्रिक बाबी - ०) शनिवार दिनांक २२ मे २०२१ रात्री ९.३० (भारतीय वेळ) अमेरिकेत २२ मे, सकाळी ९.०० (pst) आणि १२.०० (est) १) झूम अँप फोनवर किंवा लॅपटॉपवर असेल तर उत्तम. फक्त ब्राऊसरमधून देखील झूम वापरता येते, पण थोडे गैरसोयीचे आहे.

#तू म्हणालास...

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 18/05/2021 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
तू म्हणालास, पाऊस मला मुळी सुद्धा आवडत नाही. चिखल ओला सगळीकडे, एक काम होत नाही. ऐकून इकडे माझ्या डोळ्यात काळे ढग जमून आले. बरसणार होतेच पण मी निग्रहाने घालवून दिले. पाऊस म्हणजे वेडेपणा, खूप मस्ती तुझ्या कुशीत, पाऊस म्हणजे कटींग चहा अर्धा कप अर्धा बशीत. पाऊस म्हणजे चिंब मी, थोडी धीट थोडी भित्री. पाऊस म्हणजे आशिकीच्या पोस्टरवरची मोठ्ठी छत्री पण तुझ्यासारखं असं कुणी पावसावरती रुसतं का? भिजणं बिजणं सोडून कोरडं पावसात घरी बसतं का? तेव्हापासून रागावून मी एक्कही मेसेज केला नाही वाटलं तुझा येईल ..
काव्यरस

कौतुकाची थाप!

लेखक ॠचा यांनी सोमवार, 17/05/2021 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
आपण करत असलेल्या कामाचे किंवा जोपासत असलेल्या छंदाचे जर कुणी थोडेसे जरी कौतुक केले तरी किती छान वाटते नाही!! एकदम एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला आणि आपल्यात देखील निर्माण होते!! आपल्याला कामाच्या ठिकाणी देखील बढती/पगारवाढ/बोनस यांपैकी कुठल्या ना कुठल्या स्वरुपात आपल्याला कौतुकाची थाप किती हवीशी वाटते किनही... तसंच आपण घरात, कलाकुसरीच्या एखाद्या गोष्टीत जे काही करतो त्यासाठी देखील ती कौतुकाची थाप तितकीच महत्वाची असते, नाही का!!

पॉझिटिव्ह - निगेटिव्ह

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी सोमवार, 17/05/2021 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
पॉझिटिव्ह - निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्हचा खेळ, जणु फुली अन् गोळा, सर्वांच्याच स्वप्नांचा, करतोय चोळामोळा... कोणीही आता कोणाकडे, जराही नाही फिरकत, प्रत्येकाच्या मनात लपलीय, मृत्यूची मोठी दहशत... पशुपक्ष्यांची भरते शाळा, ते करती सारे मजा, बंदिवान झालीत माणसं, भोगतात घरी सजा... कधी सारं संपेल, घेईन मोकळा श्वास, मानवाच्या अंतरीची, ही एकच आस... ह्या नियतीची क्रूर परीक्षा, पुरे झाली आता, देवा लवकर धाव घे, तूच आमचा त्राता.....!! जयगंधा.. १७-५-२०२१.

योगासने…… एक नवा दृष्टीकोन

लेखक पारुबाई यांनी सोमवार, 17/05/2021 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
Yoga is the journey of the self, through the self to the self …The Bhagwat Geeta. त्या दिवशी माझी योगशिक्षिका मला म्हणाली की, “अश्विनी, तुला समवृत्ती प्राणायाम जास्त आवडतो ना, मग तू त्याचा जास्त सराव कर. त्यातूनच तुला तू समजत जाशील.” मला काहीच समजेना. मला मी समजत जाईन म्हणजे? प्राणायाम करून स्वतःची ओळख पटते? योगासनांमुळे शरीराला आणि प्राणायामामुळे मनाला होणारे फायदे मला माहीत होते. पण त्यातून तुम्हीच तुम्हाला उलगडत जाता ही कल्पना माझ्याकरता नवीन होती. हा नवा अर्थ समजून घेण्यास मी अतिशय उत्सुक होते.

श्री अमृतानुभव अध्याय पाचवां - सच्चिदानंदपदत्रयविवरण

लेखक प्रसाद गोडबोले यांनी सोमवार, 17/05/2021 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
हे सगळं अघळपघळ आहे. कोठेही लिनियर फ्लो नाही, एकसंध विचारांची अखंड तैलधारावत कंटीन्युईटी नाही. जसं सुचत गेलं तसं लिहित गेलो. लिहिण्याचा उद्देश नाही हेतु नाही, हां , कधीं कधी आपलेच जुने लेखन वाचुन आपल्या विचारांचा प्रवास कसा झाला हे पाहायला आणि परत अनुभवायला मिळते ते एक भारी वाटते असा काहीसा थोडाफार भोंगळ उद्देश आहे असे म्हणता येईल . पण बाकी काही नाही, हे सारं स्वांन्त:सुखाय आहे ! ______________ आनंद ही फार व्यक्ति सापेक्ष संकल्पना आहे. मान्य अगदी मान्य. ज्याची त्याची आनंदाची व्याख्या भिन्न असते.