Skip to main content

'माया': एक झुंजं संसाराशी!-अंतिम भाग

लेखक सुहास चंद्रमणी बारमासे यांनी गुरुवार, 03/06/2021 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
.........मायाचा छोटा भाऊ 'प्रभाकर' आयुर्वेदामध्ये 'डॉक्टर' होता. त्याला आपल्या दाजींचे दारूचे व्यसन माहित होते. त्याच्याकडे दारू सोडवण्यासाठी काही जालीम औषध होते. 'प्रभाकर' माया ला भेटायला आला आणि औषधाबद्दल मायाला सांगितले. "पण हे औषध द्यायचं कसं दादू?" मायाने विचारले."औषधांच्या गोळ्याची भुकटी करायची आणि खाण्याच्या पदार्थामध्ये द्यायची! जेव्हा दाजी दारू पितील तेव्हा दारूसोबत या गोळ्यांची रासायनिक प्रक्रिया होते आणि उलट्या सुरू होतात. असे दोन-तीनदा झाले की दारू पिणारा माणूस दारू प्यायला घाबरतो.

बुडता आवरी मज (ऐसी अक्षरे...मेळवीन -३)

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 03/06/2021 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक :बुडता आवरी मज लेखक:सुरेंद्र दरेकर . जेव्हा दस्तुरखुद्द लेखकांनी आपल्याला त्यांच्या स्वाक्षरीचे पुस्तक अभिप्रायासाठी दिले असेल तर नक्कीच ते पुस्तक खास असते.आणि खरोखरच बुडता आवरी मज हे पुस्तक माझ्या वाचनाला समृद्ध करणारे खासच ठरले .निर्मोही अध्यात्म,तत्वज्ञान,विज्ञान,मानवी संवेदना व अनुभवांची कथेद्वारे सांगड या माझ्या आवडत्या सर्वच बिंदुना हे पुस्तक लिलया स्पर्शून जाते. पुस्तकामध्ये ‘बुडता आवरी मज’ आणि 'पॉईज’ या दोन दीर्घकथा समाविष्ट आहेत.दोन्ह

कसं पटवावं पोरीला ?

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 03/06/2021 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
कसं पटवावं पोरीला ? शोधत होतो लवगुरु अथक प्रयत्नांनी एक मिळाला ज्याची लफडी होती सुरु माग काढुनी भेट घेतली पण वाटला तो थकलेला प्रेमरसात तो न्हाउनी डुंबुनी असेल कदाचित पिकलेला मी पण होतो आसुसलेलो एक पोरगी पटवण्यासाठी सांगेल ते मी करणार होतो माझ्या मधल्या काठीपोटी पदस्पर्श करून मी त्याला म्हणालो मलापण प्रेम करायचंय तुमच्यावानी रुबाबात पार पोरींना घेऊन फिरायचंय ऐकून माझा उद्देश गुरुचे , हरपले सारे भान जुन्या आठवणींनी रडू कोसळले, कंठाशी आले प्राण रडू आवरून मला म्हणाला यात अवघड नसते काही वायफळ बडबड केली म्हणजे पोरी पटतात कशाही अक्कल यांची गुडघ्यात आणि दिडबुद्ध

हा 'मी' नाही, आपण आहोत.

लेखक अनुस्वार यांनी गुरुवार, 03/06/2021 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
'त्या' विहीरीत दगड टाकून सभोवतालाकडे दुर्लक्ष करत त्याचे कान दगड आणि पाण्याचा मिलनध्वनी ऐकण्यासाठी सज्ज झाले. तळाच्या अंधारात काय झाले कुणास ठाऊक. पण आतून आवाज आला, "विहीर का बुजवताय?" ही वाट नवी नव्हती, पण आता तो जुना 'तो' नव्हता. बदल आणि स्थिरतेच्या वजनकाट्यावर हिंदोळणारं आयुष्य त्याला नकोसं झालेलं. केवळ दोन पारड्यांत सामावतं ते आयुष्य कसलं? आणि दरवेळी वजन तोलूनच का बघायला हवं हो? जे दिसतंय त्यातच भागवून घ्यावं की. निकष बनवणारी ही माणसंच असतील ना कुणीतरी? की ते ही कुणा 'प्रेषितचा संदेश'! मला नाही फरक पडत त्याने. नशिबाचा कपाळमोक्ष करून माझी भाग्यरेषा मीच रेखाटनार.. याच मातीत.

||चाफा..||

लेखक प्राची अश्विनी यांनी बुधवार, 02/06/2021 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण भुइचाफा जो आत लपवता कंद मृण्मयी पहिली सर अन् रुजून येई. तुझी आठवण हिरवा चाफा मोहवणारा खुणावणारा दृष्टीला परि नच दिसणारा. तुझी आठवण पिवळा चाफा मधुगंधाने दरवळणारा सुकला तरिही जाणवणारा. तुझी आठवण कवठी चाफा तिन्हिसांजेला हळू उमलतो रात्रि सुगंधी सोबत करतो. तुझी आठवण खुरचाफ्यासम अपर्ण होउन मूक फुलांनी भरून अंगण तुलाच अर्पण.

कोसळणारा ‘पाऊस’ : १०० वर्षांपूर्वी !

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 02/06/2021 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
विदेशी कथा परिचयमाला :१ ... नुकतेच आपल्याकडे चक्रीवादळाच्या प्रभावाने काही जोरदार पाऊस झाले. किनारपट्टीच्या भागातले असे पाऊस म्हणजे निसर्गाचे रौद्र रूप असते. त्याचे कोसळणे हे भयानक असते. त्या तुलनेत माझ्या भागात झालेला पाऊस तसा मध्यमच होता. असाच एक पाऊस खिडकीतून पहात मी खुर्चीवर बसलो होतो. पावसाच्या पडण्याचा आवाज बऱ्यापैकी होता. पाऊस पाहताना मला काहीशी तंद्री लागली आणि मनाने मी कित्येक वर्षे मागे पोचलो. तेव्हाची एक आठवण अगदी डोळ्यांसमोर उभी राहिली. तेव्हा मी वयाची पंचविशी पूर्ण केली होती आणि तो माझा वाढदिवस होता. तेव्हा सहज काकांकडे गेलो होतो.

'माया': एक झुंजं संसाराशी!-भाग २

लेखक सुहास चंद्रमणी बारमासे यांनी बुधवार, 02/06/2021 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
........'चंद्रभान' मायाला आणि आपल्या मुलाला द्यायला सासरी आला. सासऱ्याने जावयाचा खास पाहुणचार म्हणून गावरान कोंबडा कापला. 'रत्नाकर' हा मायाचा मामेभाऊ होता तो पण दारुडा होता. त्याने गावच्या 'मोहाची दारू' चंद्रभानला पाजली आणि नशेमध्ये धुंद झाल्या नंतर 'रत्नाकर' चंद्रभानला विचारू लागला, "काय भाऊजी तुमचं काही लफड-वफडं आहे का बाहेर कुठे? जाता की नाही बैठकीत! 'चंद्रभान' लगेच बरळायला लागला, "आहे ना! आपल्या सारख्या पैलवान गड्याची एकीवर थोडी हौस भागते. आहे 'चंपा' नावाची नाचणारी बाई!"रत्नाकर ने ही माहिती लगेच मायाला दिली.मायाला आधी संशय होता पण आता रत्नाकरने सांगितल्यानंतर पुष्टी झाली.

छद्मवैद्यक आणि पर्यायी, पारंपरिक आणि पूरक उपचार

लेखक Shantanu Abhyankar यांनी मंगळवार, 01/06/2021 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
छद्मवैद्यक आणि पर्यायी, पारंपरिक आणि पूरक उपचार डॉ. शंतनु अभ्यंकर छद्मवैद्यक म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर प्रथम नाव येतं ते होमिओपॅथीचं. त्यामुळे इथे उदाहरणे होमिओपॅथीची घेतली आहेत. शिवाय मी होमिओपॅथीचा(ही) पदवीधर असल्याने या क्षेत्रातला माझा अभ्यास थेट होमिओपॅथीशीच निगडीत आहे. छद्म वैद्यकीचे हे ढळढळीत उदाहरण. बाकी काही प्रमाणात शास्त्रीय, काही प्रमाणात अशास्त्रीय अशी बरीच आहेत. या सगळ्याला मिळून पर्यायी, पारंपरिक आणि पूरक (पपापू) उपचार पद्धती म्हटलं जातं. यांची लांबच्या लांब यादी आहे. जगभरच्या अनेक पारंपारिक उपचार पद्धती यात येतात.

कला अवस्थांतरांचा माध्यम विचार

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 01/06/2021 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे प्रास्ताविक: कला आणि साहित्य यांचे चिंतन करत असताना लिहून झालेले टिपण इथे देत आहे. साहित्य ही एक कलाच असून प्रत्येक कलेचे एक खास वैशिष्ट्य असते, तसे साहित्याचेही आहे. प्रत्येक कलेचे साधन भिन्न असते. साहित्य कलेचे साधन शब्द आहे तर चित्रपट या कलेचे माध्यम कॅमेरा हे आहे. साहित्य एकांतात उपभोगण्याची कला तर चित्रपटाचा आस्वाद समुहाने घेतला जातो. (अलीकडे एकट्यानेही घेता येतो.) चित्रपटात शब्द असतात पण ते वाचावे लागत नाहीत, ऐकावे लागतात; पात्रे डोळ्यांनी पहावे लागतात. म्हणून चित्रपट या कलेला दृकश्राव्य कला म्हटले जाते.

'माया': एक झुंजं संसाराशी!-भाग १

लेखक सुहास चंद्रमणी बारमासे यांनी सोमवार, 31/05/2021 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
......... माया एक ग्रामीण भागातील एक चुणचुणीत अन् चाणाक्षं मुलगी! काळेभोर डोळे, बुटके नाक, लांब केश, सडपातळ बांधा, मध्यम उंची आणि गव्हाळ वर्णाची! तशी तर ती सुखवस्तू कुटुंबातली! घर छान वाड्या सारखे, वडील 'रामराव' गावचे सरपंच! तीस एकर बागायती शेती, नोकर-चाकर, घरी गोदामात धान्याच्या रासा भरलेल्या, मोटार पंप विहीर सर्वकाही सुव्यवस्थित होते. आठ भावंडांमधली 'माया' दुसर्‍या क्रमांकाची! लहानपणापासूनच ती सर्व भावंडांना सांभाळून घेत असे. मोठी बहीण 'छाया' ही नेहमी तिच्या अभ्यासात समरस असे. त्यामुळे घरातील सर्व कामे मायालाच करावी लागत. नोकर होते पण ते शेतातल्या कामासाठी! 'आई' होती पण ती सतत आजारी असायची.