Skip to main content

वॉल स्ट्रीट वरील काही वर्षे!!

लेखक गोगोल यांनी मंगळवार, 31/03/2009 05:39 या दिवशी प्रकाशित केले.
खालील लेख जरूर वाचा. इंग्लीश मध्ये असला तरी आपल्या रामदसांसारखा सडेतोड लिहिला आहे. http://www.printthis.clickability.com/pt/cpt?action=cpt&title=My+Manhat…

" छाया "

लेखक शितल यांनी मंगळवार, 31/03/2009 03:59 या दिवशी प्रकाशित केले.
जेमतेम ५ फूट उंची असलेली, सावळी, गोल चेह-याची, काळेभोर बोलके डोळे असलेली, खांद्या पर्यंतचे केस कधी मोकळे सोडलेले, कधी एक पॉनीटेल बांधलेली, तिच्या गोड हास्याने अजून गोड वाटणारी, बडबडी "छाया", तिची ही दुर्दैवी कहाणी. एका निष्पाप, गोड मुलीचा एक दुर्दैवी अंत आठवून आजही मन अस्वस्थ होते. त्यावेळी मी शाळेत असेन, आणि ती कॉलेज मध्ये. आमच्या मध्ये ५/६ वर्षाचे अंतर असेल. त्यावेळी आम्ही एका वाड्यात राहत होतो. आमच्या शेजारी दोन मुली राहत होत्या, दोघी बहिणी - बहिणी. एकाच कॉलेज मध्ये एकाच वर्गात होत्या, त्यांची छाया ही मैत्रीण.

सावत्र आई २- चित्रपट प्रसंग

लेखक टायबेरीअस यांनी मंगळवार, 31/03/2009 02:28 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपुर्वी 'Stepmom' नावाचा चित्रपट आला होता. त्यातील एक प्रसंग चटका लावून जातो.. थोडक्यात कथा सांगायची तर नवरा बायको विभक्त होतात.. २ मुलं, - एक मुलगा, एक मुलगी.. मुलगी 'वयात' येऊ घातलेली.. दोघांच्या 'डिवोर्स' नंतर नवरा अजून एकीच्या प्रेमात पडतो आणि ते दोघं लग्न करतात. 'नवीन' सावत्र आई आपल्या परीने मुलांना प्रेम द्यायचा खूप प्रयत्न करते पण मुलगी तिला झिडकारत असते. पहिल्या बायकोलाही ती फारशी आवडत नसते.. दिवस जातात.. पहिल्या बायको ला कान्सर होतो आणि नाईलाजाने ती मुलीची 'जबाबदारी' सावत्र आईवर टाकते.

एक प्रसंग, दोन कवी आणि दोन कलाकृती

लेखक सुनील यांनी सोमवार, 30/03/2009 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे? कचेरीत जाता-येताना गाणी ऐकणे हा माझा एक आवडता छंद. गाण्यांचे दोन संच आहेत. एक संच आहे जलद, उडत्या चालींतील गाण्याचा. अशी गाणी सकाळी कचेरीत जाताना ऐकली की, काम करायला जणू दुप्पट उत्साह येतो! आणि दुसरा संच आहे तो शांत, संथ लयीतील गाण्यांचा, जी रात्री घरी परतताना ऐकायला खूप बरी वाटतात! असंच परवा येताना हे गाणं लागलं होतं. हृदयनाथांचे संगीत आणि आशाबाईंचा आवाज हे दोन्ही श्रवणीयच परंतु त्याहीपेक्षा जास्त भावते ती भटसाहेबांची समर्थ लेखणी. यायला उशीर होणार हे माहीत होतेच.

पृथ्वीची पहाट!

लेखक उमेश कोठीकर यांनी सोमवार, 30/03/2009 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
पहाट झाली! पृथ्वी उठली ! मोहक आळस हसूनी दिला! पक्ष्यांच्या त्या संगीताने आसमंतही स्वर झाला! नादमधुर ती घंटा वाजे! पदर धुक्याचा दूर झाला हलके हलके जाई गारवा सूर्य गुलाबी वर आला! हसला देव! हसली सृष्टी! लाजून रवी तो चूर झाला! ओले पृथ्वीचे लावण्य बघूनी तेजतरूण झाला! जाई गारवा! उब आली! पृथ्वीला किरणांचा शेला अस्फुट कळीचे चुंबन घेण्या भ्रमर आवेगे धावत आला! दाहक स्पर्श! प्रियकराचा स्वेदबिंदू! ते वसुंधरेला आच्छादूनी मेघडंबरी सूर्य सखा तो! खजील झाला! डोलत फुले! डोलत शेते! आसमंतही डोलू लागला सूर्यपृथ्वीचे मिलन होऊनी दिन सोनेरी जन्मा आला!! कविता
Taxonomy upgrade extras

मेड इन चायना-एक समिक्षण

लेखक रम्या यांनी सोमवार, 30/03/2009 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
"मेड इन चायना" बद्दल बरेच एकून होतो. म्हणून काल हा सिनेमा पाहिला. एस. ई. झेड. आणि त्या भोवती चालणारी राजकिय चाके हि मध्यवर्ती कल्पना सिनेमा मध्ये वापरली आहे. आप्पासाहेब जगदाळे हे राजकिय वर्तूळात दबदबा असणारं व्यक्तिमत्व. गल्ली पासून दिल्ली पर्यंत सगळी चाकं पुण्यातील पिंपळगाव मधील आपल्या वाड्यात बसून चालवणारी व्यक्ती. त्यांचा पुतण्या मोहीत जगदाळे हा इस्रायल मध्ये जाऊन शेती संबधी उच्च शिक्षण घेऊन आलेला. परदेशी शिक्षण घेऊन परत आल्या नंतर जगदाळे घराण्याची कित्येक एकर जमीनीचा वापर तुला पाहिजे तसा कर असा सल्ला आप्पासाहेब मोहितला देतात.

सावत्र आई

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 30/03/2009 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
४-५ वर्षाचाच असेल,कोप~यात शांत बसलो होतो, "बाबा तुला नविन आई आणणार आहेत" कोणीतरी बोलत होत. बाबा अन आई घरात आले, गळ्यात हार होते.नविन कपडे. सारे गेल्यावर तिने माझ्याकडे बघुन विचारले..हा कोण? "हा आमचा मक्या",बाबा..

मन

लेखक जागु यांनी सोमवार, 30/03/2009 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
मन... हलक्याश्या फुंकरीने दूर उडणारं दिशाहीन कुठेही भरकटत जाणारं स्वप्नाच्या देहात जगणारं वास्तव्याच्या खडकावर वसणारं ! मन... तप्त निखार्‍यातून पेट घेणारं दूर क्षितीजाला जाऊन भिडणारं सागराच्या लाटांवर फेसाळणारं कधी उंच सिंहासनावर बसणारं! मन... प्रितीच्या पाझरात चिंब भिजणारं भावनांच्या प्रवाहात वाहून जाणारं स्वतःशीच कुजबूजत राहणारं हलकेच बिनस्पर्शी चुंबणारं ! मन... स्वतःच अस्तित्व नसणारं !
Taxonomy upgrade extras