रायगड जिल्ह्यातील पारंपारिक गोकूळ अष्टमी साठी नैवेद्याचे कुट्याचे लाडू/घरगुती कुरमू-याचे लाडू
|| जय श्री कृष्ण ||
गोकूळ अष्टमीला महाराष्ट्रात घरोघरी बालगोपाळाला गोडाचे नैवेद्य दाखविले जाते. रायगड जिल्ह्यात तांदळाची शेती केली जाते त्यामुळे घरगुती तांदळापासून बहुतांशी घरात कुरमुरे तयार करुन ते भरडून, गूळ व इतर जिन्नसे खल-बत्यात कुटून त्यापासून लाडू करून तो नैवेद्या दाखविण्याची परंपरा आहे. खलबत्यात कुटल्याने भरड पीठ व गुळ एकजीव होते. कुटतात म्हणून याला कुट्याचे लाडू असेही म्हणतात.
बरं हे कुरमुरे म्हणजे भेळवाल्याकडे मिळणा-या कुरमु-याप्रमाणे नसून पाण्यात अर्धा दिवस भिजवून तव्यावर अथवा कढईत खमंग भाजून मस्त कुरकुरीत केलेले तांदूळ असतात.
मिसळपाव