Skip to main content

बीटी पोर!

लेखक अरुंधती यांनी रविवार, 07/03/2010 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे सध्या नवा वाद रंगलाय. आमच्या ओळखीचे एक शेतकरी दादा परवा तावातावाने घरात शिरले. त्यांच्या व माझ्या भावामधला हा संवाद! "तुम्ही ते बीटी वांग्याचं, बीटी भाज्यांचं आमच्या बायकूकडं येवढं कवतिक का हो करून राहिला भाऊ? " "का? काय झालं? मी तर वर्तमानपत्रातल्या बातम्या मोठ्यानं वाचत होतो!" "अहो, तुमचं वाचन आमच्या बायकूनं आयकलं आन आमच्या 'हिच्या' डोक्यात तवापास्नं किडा वळवळाया लागलाय बघा... म्हनत्ये की भाजीत जर त्या ब्यॅक्टेरियाचा जीन टाकता येतो तर मग मानसात का नाही?" "म्हणजे? मी नाही समजलो... " "अहो, आता बघा, त्यो जीन घालून पिकवल्येलं वांगं म्हने कीड, रोगाला जवळ फटकू द्येत न्हाय...

(मनुष्य विरुद्ध प्राणी !!!)

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी रविवार, 07/03/2010 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
माणसांचा प्रश्न दिवसेंदिवस भारत, अमेरिकेत गंभीर होत चालला आहे. अर्थातच इतर देशांतसुद्धा असेलच. रात्रीसुद्धा आणि विशेषकरून दिवसा उजेड पडल्यावर या माणसांचे साम्राज्य सुरू होते. त्यांच्या दिवसाच्या मोठमोठ्या महत्त्वाकांक्षामुळे जंगलतोडसुद्धा होते. झाडे, पशु-पक्षी, सगळ्यांनाच या माणसांपासून त्रास होत असतो. रात्री दुचाकी वाहनांमागे पळत असल्याने अपघात होऊन प्राण्यांचा मृत्यू होण्याचा संभव असतो. मनुष्यप्राणी सोडून सर्वांनाच माणसांचा त्रास होतो. माणूस (वाहन) चालवून/लचका तोडून प्राण्याला मरण देवू शकतो.

कोलाज

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 07/03/2010 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
चिऊताईला काल नुकतंच तिसरं संपून चौथं लागलं होतं. आज चिऊताईची झोप नेहमीपेक्षा लौकरच उघडली. खरं तर काल रात्री वाढदिवसाच्या भेटी उघडून पहाता पहाता झोपायला बराच उशीर झाला होता. पण स्वप्नात भेटीत आलेल्या वेगवेगळ्या रंगपेट्या, चित्रांच्या वह्या, स्केच पेन यांनी धमाल केली होती, सकाळी उठून कितीतरी चित्रं काढायची ठरली होती. मग वेळ नको पुरायला? चित्रांच्या नादात आज अगदी शहाण्या मुलीसारखं आईला त्रास न देता दात घासून, दूध पिऊन झालं, बाबाच्या आधीच आवरूनही झालं. एरवी जबरदस्तीनं भरवावी लागणारी पालकाची नावडती भाजी पण आज विनासायास पोटात गेली. "मग आज काय, मस्त मस्त चित्रं काढणार तर?" बाबानं विचारलं.

श्वानत्रस्त विरुद्ध श्वानप्रेमी!!!

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 07/03/2010 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस पुणे, मुंबईत गंभीर होत चालला आहे. अर्थातच इतर शहरात सुद्धा असेलच. दिवसा सुद्धा आणि विशेषकरून रात्री अंधार पडल्यावर या भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य सुरू होते. त्यांच्या रात्री च्या मोठमोठ्याने ओरडण्याने झोपमोड सुद्धा होते. लहान-थोर सगळ्यांनाच या भटक्या कुत्र्यांपासून त्रास होत असतो. रात्री दुचाकी वाहनांमागे पळत असल्याने वाहनांचे अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू होण्याचा संभव असतो. पायी चालणाऱ्या सर्वांनाच कुत्र्यांचा त्रास होतो. कुत्रा चावून लचका तोडून व्यक्तीला मरण ओढावू शकते.

अरूणाचल प्रदेश

लेखक विकास यांनी रविवार, 07/03/2010 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच टाईम्स ऑफ इंडीया आणि इकॉनॉमिक टाईम्स मधे वाचलेल्या बातमीप्रमाणे आपल्या तत्पर परराष्ट्रमंत्रालयाने जागतिक बँकेस अरूणाचल प्रदेशसाठी निधी मागणार नाही अशी ग्वाही दिली आहे आणि चीनने हे परराष्ट्रमंत्र्यांचे विधान अधिकृत करण्याची मागणी बँकेकडे केली आहे. श्री.

सूर्याची सावली...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 07/03/2010 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक समर्पित प्रचारक, धुरंधर राजकारणी आणि ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी चित्रकूट येथे निधन झाले. अखेरच्या श्वासापर्यंत समाजासाठी आयुष्य वेचणार्‍या या महान आणि दुर्मिळ जीवनव्रतीचा कौटुंबिक जिव्हाळ्यातून उतरलेला एक सुंदर लेख 'लोकमत' मध्ये प्रसिद्ध झालाय. तो हा लेख : सूर्याची सावली गाढ झोपेत असतानाच अचानक फोन वाजला, आणि झोप चाळवली. इतक्या पहाटे किंवा रात्रीबेरात्री वाजणारे फोन घेणं अलीकडे मी टाळतो. पण त्या दिवशी फोन वाजताच मला जाग आली, आणि मी फोन कानाला लावला. पलीकडे मुंबईहून माझा भाऊ होता... 'रमेश, नानाजी गेले'...

वसई पेटली......

लेखक विकि यांनी रविवार, 07/03/2010 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
नैसर्गिक दृष्ट्या समृध्द असणार्‍या ,अतिशय सुरेख अश्या वसई-विरार महानगरपालीकेतून ५३ गावे वगळावी यासाठी तेथील आमदार विवेक पंडित यांनी बेमुदत उपोषण केले.त्यांचे उपोषण मोडून काढण्यासाठी ५ मार्चला पोलीसांनी ज्या पध्द्तीने बळाचा वापर केला.स्रिया,वृध्द,लहान मुले,तरुण मुले ,मुली यांवर घरात घुसून बघाणार्‍यालाही चीड यावी असा अमानुषपणे लाठीमार केला,त्याचा निषेध करायलाच हवा.दुरचित्रवाणी वाहिन्यांवरून लाठीमाराचे दृष्य पाहताना इतिहासात वाचलेल्या इंग्रज सरकारच्या जुलुमाची आठवण झाली.एखादे आंदोलन चिरडण्यासाठी पोलीस ज्या पध्द्तीने वागतात ते लोकशाहीला धरून आहे का?असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.महाराष