Skip to main content

सोनसाजिरी पौणिमा..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 30/03/2010 05:46 या दिवशी प्रकाशित केले.
पुनवेवरती राग धरूनी, आवस धुसफ़ुसली काळोखाला घेत साथीला, चंद्रकळा लपविली.. भरात आला खेळ मोडला, अवनी थरथरली अवकाशाला रिक्त पाहूनी, मूकपणे रडली उदास झाल्या अवनीसाठी, 'प्रथमा' मग धावली चंद्रकोर ती नाजूक रेखीव, आकाशी सजली रोज नव्याने पुन्हा पुन्हा ती, कोर नटू लागली संध्याराणी तिच्या दर्शने, गोड हसू लागली नव्या यौवनी चंदाराणी, मोहरूनिया गेली तिला रिझविण्या सागरलाटही, उचंबळू लागली लाटांनी मग शुभ्र फ़ुलांची रांगोळी रेखिली क्षितिजावरती सोनसाजिरी, पौणिमा झळकली - प्राजु
काव्यरस

कसाब - माकडीणीचे पिल्लू

लेखक विकास यांनी मंगळवार, 30/03/2010 00:58 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या काथ्याकुटाची विभागणी मला वास्तवीक विनोद या भागात पण करायची होती. पण २६/११ म्हणले की आजही अस्वस्थता येते म्हणून टाळले... मात्र आज (काल) अंतिम युक्तीवाद संपवताना कसाबचे वकील, अ‍ॅड पवार म्हणाले ते थोडक्यात खाली (दुव्यावर संपूर्ण वाचू शकता.)
लेखक मारुती चितमपल्ली यांच्या एका लघुकथेचा उल्लेख करीत आज पवार यांनी कसाबला माकडिणीच्या पिल्लाची, तर तपासयंत्रणेला लांडग्याची उपमा दिली.

भिकारी

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी सोमवार, 29/03/2010 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी फेरफटका मारताना गल्लीतील भुभ्यांबरोबर थोडस खेळल्यावर पुढे गेलो. भुभ्यांच्या गार गार नाकाचा सुखद स्पर्श मनात रेंगाळत होता. चालता चालता कोपर्‍यावर एक भिकारीसदृष माणुस स्वत:शीच बोलत होता. "हरामखोर साले ....... " अज्ञात व्यक्ति वा समुहाबद्दल मनात विखार होता. भाषा हिंदी वाटत होती. नजर शुन्यात होती. दाढी वाढलेली. अगदी ग्रीक तत्ववेत्यांसारखी. पॆंट शर्ट मेणचट्ट.मध्यम बांधा, उंची अंदाजे पावणे सहा फुट. तिरिमिरीत चालत होता. माझे लक्ष त्याच्याकडेच होते.लोक त्याला टाळत होते. पण त्याला कशाचीच फिकीर नव्हती. त्याला न्हाउमाखु घातले असते व चांगले कपडे घातले असते तर रुबाबदार दिसला असता.

लागा चुनरीमे दाग..

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 29/03/2010 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
बॉलिवूडी सिनेमे पाहण्याचं फ्याड आता इथे चांगलंच रुजलं आहे. हिंदी शिनूमांच्या जर्मन डब्ड डीव्हीडी.. नव्हे डेफाउडे, हो जर्मन मध्ये डेफाउडेच! तर ह्या तबकड्या आता दुकानादुकानांतून दिसायला लागूनही जुन्या झाल्या. पण ह्यातलीच एखादी बया आपल्या घरात भेट द्यायला येईल असं मात्र कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं पण.. आमच्या एका फिरंगी मित्राला आणि त्याच्या कुटुंबाला( बायको आणि दोन मुले वयं अनुक्रमे १४ आणि १८) राणीबाई फारच आवडायला लागल्या आणि 'लागा चुनरीमे दाग' नावाच्या सिनेमाची तबकडी आम्हाला चक्क भेट म्हणून दिली की त्यांनी.. आतापर्यंत लागा चुनरीमे दाग..

ग्रेव्हयार्ड - लिटरेचर

लेखक अनुप्रिया यांनी सोमवार, 29/03/2010 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्यावरून जाताना दिसायच ग्रेव्हयार्ड लक्ष वेधून घेणारी पांढ-या फुलांनी आच्छादित कबर वाटायच आकर्षण त्या नाजूक फुलांच जाव आत लावावा हात उचलून आणावीत ओंजळभर केला धीर गेलेच एकदा उचलली फुल थोडी पलीकडच्या कबरीवर दिसली तितक्यात ------------------------------- एक मुलगी शुभ्र वेश जणू परी अस्मानीची हातात तशीच पांढरी फुल त्या कबरीवर नाव JOHN ANDREWS 15/12/97 आणि माझ्या समोरच्या कबरीवर MERRY JOHN ANDREWS 15/12/97 अंगावर काटा.......... निशब्द सायंकाळ.......... आणि एकच हवेचा झोत............ - सोनाली घाटपांडे

कामणदुर्ग

लेखक बज्जु यांनी सोमवार, 29/03/2010 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
कामणदुर्ग ठाणे जिल्ह्यातील उंचीत माहुलीनंतर दुसर्‍या क्रमांकावर असलेला हा किल्ला (उंची साधारण २२०० फुट). तीन साडेतीन तासांचा खडा चढ, जंगल, कड्यात खोदलेल्या पायर्‍या, सोप्या श्रेणीचे कातळटप्पे या ट्रेकर्सना आकर्षीत करणार्‍या सर्व गोष्टी असुनही, केवळ माथ्यावर पाणी आणि निवारा नसल्यामुळे दुर्लक्षीत राहिला आहे. प्राचीनकाळी उल्हासनदीतुन चालणार्‍या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच कल्याण-भिवंडी मार्गावर ताबा ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती झाली असावी. तर अश्या या दुर्लक्षीत किल्ल्याला भेट देण्यासाठी आम्ही चौघे जण या रविवारी (दि.२८ मार्च, २०१०) सकाळी ६.३० ला बाईकवरुन निघालो.

धन्य ! धन्य ते मरण ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी सोमवार, 29/03/2010 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
धन्य ! धन्य ते मरण ! ! ! आयुष्याच्या वळणावर यम मला भेटला म्हणाला, " कधीचंच भेटायचं होतं तुला, जरा उशीरच झाला.” .” चल आटप लवकर आता, वेळ नाही मला, सख्खे, सोयरे, जमले सारे, आता उशीर कशाला ? " मी म्हटलं, "थांब थोडं नको घाई भेट तिची बाकी, सरणावर वियोगाचे दुखः नको बाकी." प्रतीक्षेवीण भेटण्याची, नसे रीत तिची, वेळेवर आली आज, मला साथ.नशिबाची.