Skip to main content

मीरा कहे.......एम्पी३ कुठे मिळेल?

लेखक वेताळ यांनी शनिवार, 03/04/2010 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
मीरा कहे म्हणुन अजय- अतुल चा एक संगीत ध्वनीफित कॉस्मिक म्युझिक ने २००२ ला प्रदर्शित केली होती. सदर ध्वनीफितीत मीरा बाईंची भजने संकलित केली आहेत. ती रिचा शर्मा व इतरांनी गायली आहेत. माझ्याकडे त्याची कॅसेट आहे. पंरतु मला ती गाणी एम्पी३ मध्ये हवी आहेत. कृपया ती कशी व कोठुन मला फ्री उतरवुन घेता येतील,ह्या संदर्भात मार्गदर्शन करा.

नका अंगचटीला येवू

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 03/04/2010 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, पुन्यांदा रामराम. आज परत ही लावनी ऐका. आजची लावनी लिहूनशान म्या या आयपीएल किरकेट च्या मॅचेमधी जशी हॅट्रीक करत्यात तशी सलग तीन दिवस ३ लावन्या लिहूनशान हॅट्रीकच केलीया. तुमी म्हनाल या सुक्काळीच्या पाषानाला काय लावनी चावली का लावनीवालीनं धरलं. पन काय सांगू मंडळी, आहो खिशात 'लय शिरीयस' मुक्तछंदी परकृतीच्या ४/५ कवितांचे ड्राफ्ट हायती. पन मन ह्ये लावनीकडंचं वळतया पगा. माझ्यासारख्या दगडफोडी करनार्‍या मान्साला आसं लय इचार करूं करूं लागलं म्हंजे माझं टाळकं कसं पहार लावल्येल्या कातळागत फुटतंया पगा.
काव्यरस

उमेश कुलकर्णी यांची विहीर - काही प्रश्न, काही उत्तरे

लेखक चिंतातुर जंतू यांनी शनिवार, 03/04/2010 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
या धाग्याचे स्वरूप मुख्यतः पाषाणभेद यांच्या पूर्वीच्या एका धाग्यावरच्या काही प्रश्नांना प्रतिसाद असे आहे, पण प्रतिसाद जरा लांबल्यामुळे त्याचा स्वतंत्र धागा केला आहे. कथानक वगैरे इथे पुन्हा दिलेले नाही. बरेचसे प्रश्न पाषाणभेद यांचे आहेत, पण काही इतर प्रतिसादांमधले आहेत. इथे म्हटले आहे, ते ब्रह्मवाक्य नाही; ते आम्हांस चित्रपट पाहताना जाणवलेले (म्हणजे आमचे रसग्रहण) आहे.

दागे उल्फत का जलाना

लेखक सागरलहरी यांनी शुक्रवार, 02/04/2010 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज आखिर कुछ लहू से, ऐसे गुजर रहा है.. कोइ पूछे तो कहेंगे, जनाजा गुजर रहा है.. बात कुछ ऐसी अनकहीसी, थी कही किसीने .. गूंज लेके अब-तलक, ये दिल संभल रहा है.. कुछ पलों की बस जवानी, कुछ समेटी यादें.. इतनाही सामां बचा था, अब के ये जल रहा है.. दागे उल्फत का जलाना, जुल्मे-फित्रत नही "सागर" जी के जलना, जलके जीना, सिलसिला ये चल रहा है.. --सागरलहरी.

युध्दाचा कलाविष्कार

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 02/04/2010 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
आजच मला एक ईमेल आले. वाचताना टचकन डोळ्यांत पाणीच आले. असे काय होते त्या ईमेलमध्ये? कसली होती ती शोकवार्ता? ती वार्ता होती युध्दाने आक्रसलेल्या जीवनाची..... घायाळ झालेल्या लाखो जीवांची....

मराठी गीते यू-ट्यूब वरुन डाऊनलोड करायची आहेत ... कसे करावे ?

लेखक दिपोटी यांनी शुक्रवार, 02/04/2010 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, मला अत्यंत आवडलेली तीन मराठी गाणी (videos) यू-ट्यूब वरुन डाऊनलोड करायची आहेत. या गाण्यांच्या DVDs बाजारात उपलब्ध नाही आहेत नाहीतर तो पर्याय निश्चितच निवडला असता. तर हे कसे करावे ? यू-ट्यूब वर डाऊनलोड करण्याचा पर्याय मला तरी दिसत नाही आहे. - दिपोटी

हरवलेले सुख - वाढदिवस

लेखक आनंदयात्री यांनी शुक्रवार, 02/04/2010 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
"आई माझा वाढदिवस कधी येणार गं ?" "अजुन दोन महिने आहेत रे" ते "आता उद्याच आहे ना" असा उत्तराचा प्रवास पुर्ण करत वाढदिवस एकदाचा येतो. अवचित एखाद्या वर्षी शाळेला दांडी मारायची पण मुभा असायची, दांडी मारायची नसेल तर आख्ख्या वर्गभर चॉकलेटे वाटायची गंमत मिळणार असायची. आधीपासुनच बाबांच्या मागे लागायचे "बाबा यावेळेस गोळ्या नाही हं वाटायच्या, आपण चॉकलेट आणुयात ना वाटायला !". गोळ्या म्हणजे साध्या आणी चॉकलेट म्हणजे भारी ही समजुत अगदीच पक्की.

..

लेखक प्रियाली यांनी शुक्रवार, 02/04/2010 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
..

दक्षिण भारतातल्या नाडी केंद्रवाल्यावर कोर्टात फिर्याद

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 02/04/2010 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
ना़डीग्रंथांवरील अभिनव विलक्षण किस्से क्रमांक ३ भाग - १ --
किस्सा ३१ मार्चचा - दक्षिण भारतातल्या नाडी केंद्रवाल्यावर कोर्टात फिर्याद .
एका शंकराच्या मंदिरात उद्या जाऊन दोन दीप लावावेत. त्यानंतर अपेक्षित व्यक्ती वाटेत भेटतील.
गोपुराची वेस ओलांडताना एकदम लक्षात आले.

या संज्ञेचा अर्थ काय?

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 02/04/2010 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
फोटॉग्राफित हायलाईट क्लिपींग अशी एक संज्ञा आहे. त्याचा अर्थ काय? कुणाला माहित असल्यास सांगावे ही विनंति.