नका अंगचटीला येवू
मंडळी, पुन्यांदा रामराम.
आज परत ही लावनी ऐका.
आजची लावनी लिहूनशान म्या या आयपीएल किरकेट च्या मॅचेमधी जशी हॅट्रीक करत्यात तशी सलग तीन दिवस ३ लावन्या लिहूनशान हॅट्रीकच केलीया. तुमी म्हनाल या सुक्काळीच्या पाषानाला काय लावनी चावली का लावनीवालीनं धरलं.
पन काय सांगू मंडळी, आहो खिशात 'लय शिरीयस' मुक्तछंदी परकृतीच्या ४/५ कवितांचे ड्राफ्ट हायती. पन मन ह्ये लावनीकडंचं वळतया पगा. माझ्यासारख्या दगडफोडी करनार्या मान्साला आसं लय इचार करूं करूं लागलं म्हंजे माझं टाळकं कसं पहार लावल्येल्या कातळागत फुटतंया पगा.
काव्यरस
मिसळपाव